जेम्स ब्लडवर्थ या ब्रिटिश पत्रकाराने ठरवून, प्लॅन करून सहा महिने ब्रिटिश कामगार वर्गाप्रमाणे तुटपुंज्या पगाराच्या नोकर्यांसाठी अर्ज करून चार प्रकारच्या नोकर्या केल्या. त्या त्या नोकरीच्या ठिकाणी त्याचे सहकारी, स्थानिक ज्या प्रकारे राहायचे तसंच तो देखील राहिला. (गलिच्छ वस्त्या, एका घरात दाटीवाटीने राहणारे कामगार) त्यांच्यासारखंच जेवण, ट्रान्स्पोर्ट, त्यांच्याप्रमाणेच महिन्याच्या कमाईत(च) कशीबशी गुजराण करून, त्याच लोकांच्यात मिसळून, त्यांच्याशी गप्पा मारून त्या सर्व अनुभवांवर त्याने हे पुस्तक लिहिलं आहे.
पाच दिवसांच्या कॉर्नवॉलच्या कंडक्टेड टूरमध्ये आमच्या टूरगाईड स्टीवनं आम्हाला खूप सुरेख सुरेख ठिकाणं दाखवली. त्यातलंच हे एक झळाळतं रत्नं - मिनॅक थिएटर!
जुनच्या शेवटी १० दिवसांसाठी इंग्लंड-स्कॉटलंड करत आहोत. २ फॅमिलीज आहेत - ऐकूण ७ जणं.
तर खालील विषया संदर्भात सल्ले हवे आहेत.
१. इथलं ड्रायव्हिंग लायसन्स तिथे चालतं ना? लंडनमध्ये पब्लिक ट्रान्स्पोर्ट वापरणार आहोत. पण लंडनहून स्कॉटलंडला जाताना कार हायर करून घेऊन जाण्याचा विचार आहे.
२. लंडनहून हायर केलेली कार पुढे ग्लासगो अथवा एडिंबरो ला सोडून देता येईल ना? कारण परत येताना वेळ वाचवण्यास ट्रेननं येण्याचा विचार आहे.
३. स्कॉटलंड कारनं करावं ना? आम्हाला जी ठिकाणं बघायचीयेत त्याकरता कार असल्यानं फ्लेक्सिबिलिटी राहील ती बरी पडेल असं वाटतंय.
"लॉर्ड्स" शब्द उच्चारले की अनेक प्रतिमा डोळ्यासमोर उभ्या राहतात. शाळेत असताना ब्रिटिशांबद्दल ऐकलेल्या गोष्टी (ते साम्राज्यावर सूर्य न मावळणे वगैरे), तेव्हाचा बलाढ्य इंग्लिश संघ, परंपरा पाळण्याची त्यांची सवय यामुळे पूर्वी या सर्वाचा एक दरारा वाटायचा. त्यामुळे जेव्हा १९८३ मधे कपिल च्या संघाने तेथे वर्ल्ड कप जिंकला तेव्हा त्या समारंभाकडे व तेथील लोकांकडे बघताना एखाद्या हुशार विद्यार्थाला शाबासकी देणारे शिक्षक लोक असा आविर्भावच जाणवत होता. नंतर हळुहळू ते कमी झाले. भारताने ते दडपण झुगारून दिले - राजकीयदृष्ट्या आणि क्रिकेटमधे सुद्धा.
भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास शिकत असताना लहानपणी पुस्तकात इंडिया हाउस बद्दल खूप वाचले होते...यावर्षी Onsite इंग्लंड मध्ये यायची संधी मिळाली...भारतीय स्वातंत्र्य आणि एकूणच क्रांतिकारी समाजाबद्दल मनात खूप कुतूहल होते...आणि ठरविले ..भारतीय स्वातंत्र्याबद्दल असणारी ठिकाणे न चुकता बघून यायची...तसे बघितले तर इंग्लंड मध्ये तुम्हाला भारताबद्दल खूप काही गोष्टी बघायला मिळतील..सर्वसाधारणपणे पर्यटक London Eye, Big Ben ,Madam Tussades Museum, Lords Cricket stadium,Westminster Palace इत्यादी ठिकाणे अगदी बघतातच...आणि सध्या भारतीय पारपत्र (Passport) ऑफिस चे नाव पण इंडिया हाउस आहे..त्याचा आणि मी भेट दिलेल्य
शेरलॉक होम्स हा विषय बर्याच दिवसांपासून मनात घोळतो आहे. विषय इंटरेस्टींग आहेच; त्याबद्दल असंख्य ठिकाणी छापून, लिहून आलेलं वाचूनसुद्धा शेरलॉकबद्दल मला लिहावं वाटत आहे - सखोल कायसं म्हणतात ते करायचा भुंगा डोक्यात गुईंगुईं करतोय. म्हणजे आंघोळ करताना नाही का एका कानात पाणी जातं आणि कितीही काही केलं तरी कानात सुईंफूईंबीईंईं असा आवाज चालुच राहातो तसं. हो..हो..शू:क्क्क्क..विषय गंभीर आहे..हे आवाज बिवाज बास आता. पण थोडंसं बेअरींग येई पर्यंत असे आवाज काढावे लागतात - तंबोरा तबला जुळवताना ते वाजवणारे पहिल्यांदा अर्धा-पाऊण घंटा बेजार होतात ना तसं. ह्याट!!