अतुल्य! भारत - भाग १६: केरळ

Submitted by मार्को पोलो on 27 June, 2011 - 07:37

२००७ च्या नाताळच्या सुट्टीत कुठे जावे ह्याचा शोध सुरु होता. केरळ, तामिळनाडू, उडीशा, काश्मिर असे ऑप्शन्स होते. शेवटी केरळ नक्की झाले. केरळला जाण्याचा सर्वात योग्य सिझन म्हणजे हिवाळा. डिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यात कोची ला पोहोचलो.
उतरल्या-उतरल्या पहिली जाणीव झाली की भाषा ही एक प्रमुख अडचण आहे. तरी बरे की कॅब आधीच बुक करून ठेवली होती. आमची प्रवासाची व रहाण्याची सोय कोची मधल्या एका डॉक्टर ने केली होती. त्याचे केरळभर बरेच फार्म हाऊसेस होते आणि तो आता टुरिझम मध्ये आपला हात आजमावत होता. आम्ही त्याचे पहिलेच गिर्‍हाईक होतो. गाडीने आम्ही त्याच्या फार्म हाउस वर आलो. हे फार्म हाऊस शहराबाहेर एका बॅकवॉटर किनारी होते. अतिशय सुंदर परिसर होता पण रात्री निरव शांतता.

दिवस १: सकाळी आवरुन मुन्नार च्या वाटेला लागलो. २३ डिसेंबर ला सकाळी ९ वाजता पण अंगातुन घामाच्या धारा लागल्या. मुन्नार, कोची पासुन ३ तासांवर (१३०किमी) आहे. केरळ मधली ही अंतरे फसवी असतात. केरळ मध्ये दाट लोकवस्ती आहे त्यामुळे प्रवासाचा वेग पण बराच कमी असतो. आमच्या कन्याकुमारी ते कोची ह्या ३०० किमी च्या प्रवासात एकदाही वस्ती संपलेली नव्हती. गाडी पुर्णपणे बाजारातुन आणि वस्त्यांमधुनच जाते. असो. मुन्नारला जाताना मध्ये एलिफंट ट्रेनिंग सेंटर लागते. ते पहायला विसरू नका. कोथामंगलम च्या पुढे घनदाट जंगल लागते. वस्ती तुरळकच आहे. ईथे मजा म्हणजे जंगलात सुद्धा दागिन्याच्या दुकांनाचे मोठ्-मोठे होर्डिंग्ज लागले आहेत. एकवेळ खायला-प्यायला मिळणार नाही पण हे बोर्डस् दिसतील. कोची मध्ये तुम्हाला ३-४ मजली फक्त दागिन्यांची अशी बरीच दुकाने दिसतील. ईथे लोक दागिने खातात का काय काही कळत नाही. असो. दुपारी मुन्नारला पोहोचलो. ईथे बरीच थंडी होती. ईथले फार्म हाउस अगदी जंगलात लपलेले होते. एका बाजुने जंगल, एका बाजुला चहाचे मळे व समोर रस्ता ओलांडुन दरी असे फार्म हाउस होते. जेवण आवरुन मुन्नार गाव पाहिले. गाव तसे साधेच होते.
कॅमेरा: Canon Powershot S2 IS
प्रचि १
फार्म हाऊस समोरील जंगल

-
-
-
दिवस दुसरा: दुसर्‍या दिवशी site-seeing साठी बाहेर पडलो. ईथली बघण्यासारखी ठिकाणे म्हणजे मट्टूपेटी धरण, अनामुडी शिखर, चिन्नाकानल धबधबा, अनायीरांगल धरण, राजमला अभयारण्य, एको पॉइंट, चहाचे संग्रहालय. आम्ही आधी मट्टूपेटी धरण पहाण्यास निघालो. धरणामध्ये बर्‍याच प्रकारच्या बोटिंग्ज चालतात. धरणाच्या दोन्ही बाजुला जंगल व चहाचे मळे आहेत. कधी कधी बाजुच्या जंगलात हत्ती पण दिसतात. आम्ही नशिबवान होतो म्हणुन एक दिसला. मुन्नारमध्ये जागा मिळेल तिथे चहा लावला आहे. अगदी रस्ता-दुभाजकावर सुद्धा. ईथले चहाचे संग्रहालय पण पहाण्यासारखे आहे. अगदी चहाच्या ईतिहासापासुन, आज चहा कसा बनविला जातो, त्याचे प्रकार कुठले हे सर्व दाखविले जाते. ईथे चहा विकतही मिळतो. धरण, चहाचे मळे व बाकिची काही स्थळे पाहुन संध्याकाळी परत आलो.
प्रचि २
चहाचे मळे

-
-
-

प्रचि ३
अनायीरांगल धरणाचे बॅकवॉटर

-
-
-

प्रचि ४


-
-
-

प्रचि ५

-
-
-

प्रचि ६

-
-
-

प्रचि ७

-

प्रचि ८
चहाचे म्युझियम व फॅक्टरी.

-
-
-

प्रचि ९


-
-
-

प्रचि १०
जंगलात दिसलेला एक हत्ती

-
-
-

प्रचि ११
ईथे नजर जाईल तिथवर चहाचे मळे पसरले आहेत.

-
-
-

दिवस तिसरा: आज सकाळीसच थेक्कडी कडे प्रयाण केले. थेक्कडी, मुन्नार पासुन ३ तासांवर (९२किमी) आहे. जातान वाटेत परत चहाचे मळे, धबधबे, धरण असे बरेच काही लागले. घनदाट जंगल हे नेहमीचेच झाले होते.
प्रचि १२
पच्शिम घाटाचे जंगल

-
-
-

थांबत्-थांबत, निसर्गाची मजा लुटत दुपारी थेक्कडी ला पोहोचलो. थेक्कडी पण छोटेसेच गाव आहे. थेक्कडी मध्ये पेरीयार अभयारण्य, मसाल्यांच्या बागा, मसाले व केरळी मसाज प्रसिद्ध आहे. दुपारी जेवण आटोपुन मसाल्यांची बाग पहायला बाहेर पडलो. अशा बागा खास पर्यटकांसाठी तयार केलेल्या असतात. एकाच बागेत लवंगा, दालचिनी, वेलदोडे, काळी-मिरी, तमालपत्र, कोको, व्हॅनिला असे बरेच काही पहायला मिळते. संध्याकाळी घरी जायच्या आधी ईथला प्रसिद्ध केरळी मसाज घेतला. मसाज झाल्यावर काय झोप आली म्हणुन सांगता. सर्व अंग सैल पडले होते. घरी येऊन फ्रेश होऊन जेवायला बाहेर पडलो. ईथे पेरियार अभयारण्याच्या वाटेवर अंबाडी म्हणुन एक हॉटेल आहे. तिथल्या रेस्तराँ मध्ये अतिशय सुंदर जेवण मिळते.

प्रचि १४
मसाल्यांची बाग.

-
-
-

दिवस चौथा: आज अगदी भल्या पहाटे ऊठुन पेरीयार अभयारण्याकडे निघालो. पेरीयार अभयारण्य पेरीयार नदिच्या बॅकवॉटर च्या भोवताली वसलेले आहे. हे अभयारण्य पहाण्यास बोटीने जावे लागते.
ईथे पक्षी, हत्ती, कोल्हे, लांडगे, हरीण, सांबर, गवे, तसेच ऑटर्स (मराठी शब्द?) कासवे बर्‍याच संखेने आढळतात. नशिब असेल तर वाघही दिसतो असे म्हणतात.
प्रचि १५
पेरीयार नदीचे बॅकवॉटर

-
-
-

प्रचि १६

-
-
-

प्रचि १७

-
-
-

प्रचि १८

-
-
-
प्रचि २०

-
-
-
प्रचि २१

-
-
-

दुपारपर्यंत अभयारण्याची भेट संपवुन मसाल्यांची खरेदी केली. ईथे पेरीयार अभयारण्याच्या प्रवेशद्वाराबाहेरच बरीच मसाल्यांची दुकाने आहेत. ईथे मसाले आपल्यापेक्षा बरेच स्वस्त आणी दर्जेदार मिळतात. जर का तुम्ही ठोक मध्ये घेणार असाल तर भावही बरेच कमी करतात.
खरेदी आवरून कन्याकुमारी (३५०किमी) ला निघालो. थेक्कडी अगदी केरळ व तमिळनाडू च्या सीमेवर येते. आम्ही तमिळनाडू राज्यातुन कन्याकुमारी ला निघालो. कन्याकुमारी बद्दल माहिती तामिळनाडू च्या भागात येईल.

दिवस पाचवा : हा दिवस आम्ही कन्याकुमारी मध्ये घालविला. दुपारी थिरुअनंतपुरम कडे निघालो.
दुपारी उशिरा थिरुअनंतपुरमला पोहोचलो. ईथे शेषशायी विष्णुचे पद्मनाभस्वामी हे १५व्या शतकातले मंदिर आहे. ईथे स्त्रियांना फक्त साडी असेल तरच व पुरुषांना फक्त पांढरी लुंगी असेल तरच प्रवेश दिला जातो. ईथे तसे कपडे भाड्याने देण्याची व कपडे बदलण्याची सोय आहे. ईथली विष्णुची मुर्ती तुम्हाला ३ दरवाजांमधुन दिसते. एका दरवाजातुन फक्त पाय दिसतात, दुसर्‍या दरवाजातुन फक्त नाभी व पोटाकडचा भाग दिसतो व तिसर्‍या दरवाजातुन फक्त चेहरा दिसतो.
ह्या मंदिरात भाविकांना थोडेसे लुटले जाते. जसे तुम्ही आत शिरता तसे तुमच्या हातात एक तेलाचे भांडे दिले जाते. कोणी काही बोलत नाही. तुम्हाला वाटते ही काहितरी ईथली प्रथा आहे. पुढे गेल्यावर एका ठिकाणी ते तेल तुम्हाला ओतायला सांगितले जाते व पैसे मागितले जातात. तेव्हा सावधान!
दर्शन करुन ईथल्या कोवालम किनार्‍याजवळच होम स्टे घेतला.

दिवस सहावा: आज सकाळी थिरुअनंतपुरम च्या कोवालम समुद्रकिनार्‍याला भेट द्यायला निघालो. कोवालम च्या ईथले पाणी अगदी निळेशार आहे. रेस्तराँ व पर्यटकांची गजबज असुनसुद्धा घाण आणी कचरा कुठे दिसला नाही.
प्रचि २१

-
-
-

प्रचि २२

-
-
-

प्रचि २३

-
-
-

प्रचि २४
माशाचे जाळे ओढणारे मच्छिमार.

-
-
-

प्रचि २५

कोवालम वरुन दुपारी अलेपुझ्झा ला जायला निघालो व संध्या़काळी ६ वाजता पोहोचलो. अलेपुझ्झा ला तुम्हाला हॉटेल किंवा हाऊसबोट असे २ पर्याय आहेत. सुट्ट्यांच्या काळात मात्र हाऊसबोटीला आधीच बुकिंग करावे लागते. गेल्यावर हाऊसबोट मिळेलच असे नाही. आम्हाला तरी नाही मिळाली त्यामुळे हॉटेलवर मुक्काम करावा लागला.

दिवस सातवा: आज अलेपुझ्झा चे प्रसिद्ध बॅकवॉटर्स पहायला निघालो. अलेपुझ्झा ला पुर्वेचे व्हेनिस म्हणतात. ईथे सर्वत्र समुद्राचे पाणी जमिनीमध्ये आत शिरल्यामुळे नैसर्गिक कालवे तयार झाले आहेत.
ईथले जवळपास सर्व व्यवहार बोटीने चालतात. रस्ते असे नाहीतच. घरे, शाळा, गावे सर्व काही कालव्यांच्या किनारी वसलेले आहे.
ईथे तुम्ही यांत्रिक किंवा वल्हवता येणारी बोट घेऊ शकता. आम्ही वल्हवता येणारी बोट घेतली. ईथे कालव्यांच्या दोन्ही बाजुला गावे किंवा भात-शेती आहे. अवर्णनिय हिरवागार असा हा परिसर आहे. ईथेच एका कालव्याच्या बाजुला असलेल्या एका साध्या उपहारगृहात दुपारच्या जेवणात लॉबस्टर घेतला. आहाहा! काय सुंदर चव होती त्याची. केरळात येऊन सी-फूड न खाण्यासारखे दुसरे पाप नाही. Happy केरळमध्ये आलात तर केरळी पराठा आणी त्याबरोबर ईथली सी-फूड ग्रेव्ही जरूर चाखा. दिवसभर त्या कालव्यांतुन सफर करुन संध्याकाळी कोची साठी रवाना झालो.

प्रचि २६
बॅकवॉटर मधल्या हाऊसबोटी

-
-
-

प्रचि २८
बॅकवॉटरच्या किनारची भातशेती

-
-
-

प्रचि २९

-
-
-

प्रचि ३०

-
-
-

प्रचि ३१

-
-
-

प्रचि ३२
एक शाळा

-
-
-

प्रचि ३३

-
-
-

प्रचि ३४
कालव्यांशेजारील घरे.

-
-
-

प्रचि ३५

-
-
-

प्रचि ३६

-
-
-

शेवटचा दिवस : आज संध्याकाळची फ्लाईट होती. तत्पुर्वी कोची फोर्ट पहायचा ठरले. कोची फोर्ट मध्ये कुठलाही किल्ला वगैरे नसुन त्या भागालाच कोची फोर्ट असे म्हणतात. कोची फोर्ट ला जायला बोट मिळते. हिच बोट तुम्हाला पुर्ण कोची बंदर फिरवुन आणते. ईथे एक जुने चर्च आहे व कोळ्यांचा बाजार भरतो. ईथे अगदी ताजे व विवीध प्रकरचे मासे, झिंगे, लॉबस्टर, शिंपले मिळतात.
कोची फोर्ट आणी कोची बंदर पाहुन आम्ही आमच्या केरळ ट्रिप ची सांगता केली.

प्रचि ३९
कोळ्यांची जाळी

-
-
-

प्रचि ४०
कोची बंदर

-
-
-

प्रचि ४१
कोची स्कायलाईन.

-
-
-
------------------------------------------------------------------------------

अतुल्य! भारत - क्रमशः
आगामी आकर्षण - तामिळनाडू

"अतुल्य! भारत " मालिकेतील मागील प्रदर्शित भाग पहाण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर क्लिक करा:
http://www.maayboli.com/node/15407

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

हे फोटो बघून केरळला न जायचा निर्णय घेतला.
कारण माझ्या डोळ्यांनाही ते इतके सुंदर दिसणार नाही.
सी ओटर्सना चितमपल्लींनी, हुदाळ्या, असा शब्द वापरल्याचे आठवतेय.

छान फोटो Happy

केरळ आहेच खुप सुंदर Happy अलेप्पी, मून्नार , कुमारकोण, पेरीयार बघीतल्यावर कोचीन बघायला ज्याम वैताग आला Sad

अप्रतिम!!!!!!

मी २००८ च्या हिवाळ्यात केरळ दर्शन करुन आले... खुप छान अनुभव.... मज्जा आली Happy

केदार१२३

कोचीन ला जास्त बघण्या सारखे नाहीये तरी पण ते फिशींग नेट आणी कोचीन शहर फिरायाला मस्त आहे... [कदाचीत टुर चा शेवट असल्याने थकवा जाणवत असेल ... कारण मला जाणवला होता Happy ]

टी सी एस मधल्या ट्रेनिंगच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. तेव्हा त्रिवेंद्रमहून दर वीकेंडला कुठल्या ना कुठल्या ठिकाणी भटकंती करताना हे बघितले आहे सगळे..

वा! सुरेख. पाहून डोळे निवले. आता जायलाच हवे एकदा.

अतुल्य भारत. खरे तर अवर्णनीय भारत.
तो तुम्ही प्रचिंमधून साकार केलात त्याखातर मनःपूर्वक धन्यवाद
आणि पुढील प्रवासाकरता हार्दिक शुभेच्छा!

मस्त रे चंदन ... नेहमी प्रमाणेच अप्रतिम Happy
विशेषतः एक शाळा अन कालव्याशेजारची घर खुपच आवडल.

नेहमीप्रमाणेच सुपर्ब!!! सगळेच फोटो आवडले Happy

चंदन, तू टिपलेल्या फोटोत मनाला सगळे विसरून काही क्षण गुंतवून ठेवण्याची ताकद असते.>>>>>गजाननला भरपूर मोदक. Happy

प्रतिसादांबद्दल खुप खुप धन्यवाद लोक्स...

दिनेशदा,
केरळ ला नक्की जा. ह्या फोटोंपेक्षा कितीतरी पटिंनी केरळ अधिक सुंदर आहे.

अरे वा, हे बघितलंच नव्हतं.

नेहमीप्रमाणेच मजा आली. काही काही फोटो खूपच आवडले. उ.दा.१, ३, ६, ७, ११, १५,२२ ३९.

२२ व्या फोटोत पाण्याचा रंग खासच दिसतोय.

फोटो आणि वर्णन अप्रतिम .........
त्यामुळे केरळचे सुरेख दर्शन झाले......
माझी अगदी बालपणापासीनची इच्छा आहे केरळ पाहण्याची आणि असे वर्णन आणि फोटो
पाहील्यावर ती आणखीनच बळावते........
लवकरच मी जाईन......त्यावेळी तुमचे जरूर मार्गदर्शन घेईन........

मार्को दिनेशना माझे अनुमोदन आहे. तुम्ही लोक असे सुंदर फोटो काढून अपेक्षा उंचावून ठेवता.. Happy
प्रामाणिकपणे सांगते, माझी खात्री आहे की खुद्द केरळची महती सांगणार्‍या पुस्तकात सुद्धा इतके सुंदर फोटो नसतील.
मार्को तुझ्या फोटोग्राफिला सलाम..
माझ्याकडे कौतुक करायला शब्द नाहीत.. Happy

आवडत्या १०त..

मनःपुर्वक आभार लोक्स...
तुम्हा सर्वांच्या प्रतिसाद व प्रोत्साहनामुळेच तर आणखिन काहितरी करायला बळ मिळते.

माझी खात्री आहे की खुद्द केरळची महती सांगणार्‍या पुस्तकात सुद्धा इतके सुंदर फोटो नसतील.>>>>दक्षिणाला अनुमोदन. Happy

Pages