पत्रक

'आऊट ऑफ द बॉक्स' - हर्षा भोगले

Submitted by चिनूक्स on 9 August, 2011 - 13:40

भारतीय क्रिकेटचा चेहरा आणि आवाज म्हणून जगन्मान्य असलेल्या हर्षा भोगलेनं पहिल्यांदा क्रिकेट सामन्यांचं धावतं समालोचन केलं, त्याला आता एकवीस वर्षं होतील. उणीपुरी पाच वर्षं हर्षानं रेडिओवर समालोचन केलं. मग भारतात उपग्रह वाहिन्यांनी पाय पसरायला सुरुवात केली, आणि ’भारतीय क्रिकेटचा चेहरा’ अशी नवी ओळख हर्षाला मिळाली. टीव्हीवरची त्याची समालोचनं गाजलीच, शिवाय ’हर्षा की खोज’ हा त्याचा कार्यक्रम, त्याचे प्रश्नमंजूषेचे कार्यक्रमही प्रेक्षकांनी उचलून धरले. क्रिकइन्फोनं २००८ साली त्याला ’सर्वोत्तम समालोचक’ हा किताब बहाल केला. त्यामुळे खेळाडू नसलेला हा क्रिकेटमधला तसं पाहिलं तर पहिला सेलिब्रिटी.

आनंदवनासाठी 'समाज प्रगती सहयोग निधी' - जाहीर आवाहन

Submitted by चिनूक्स on 8 August, 2011 - 07:40

बाबा आणि साधनाताईंनी आनंदवनाची स्थापना केली, त्याला आता बासष्ट वर्षं पूर्ण झाली. चौदा रुपये, सहा कुष्ठरुग्ण, एक लंगडी गाय आणि दुर्दम्य इच्छाशक्ती एवढीच संपत्ती या दोघांकडे तेव्हा होती. ’येथे सेवेचे रामायण लिहिले जाईल’ असा आशीर्वाद विनोबा भाव्यांनी बाबांना आणि साधनाताईंना आनंदवनाच्या पायाभरणीच्या वेळी दिला होता. आज सहा दशकांनंतर विनोबांचं आशीर्वचन किती खरं ठरलं, याचा प्रत्यय येतो.

Picture1.jpg

'लिटील बॉय' नावाचे ब्रह्मास्त्र - ६६ वर्षे

Submitted by सावली on 3 August, 2011 - 21:48

'लिटील बॉय' नावाचे ब्रह्मास्त्र - ६६ वर्षे

गुलमोहर: 

उद्योजक आपल्या भेटीला- मिहीर राजगुरु

Submitted by Admin-team on 2 August, 2011 - 02:45

"गुरुकृपा"- अप्पा बळवंत चौकात असलेले लहान मुले व जेन्ट्सच्या तयार कपड्यांचे दुकान. गुरुकृपा हे फक्त दुकानाचे नाव नसून शर्टसचा एक ब्रँड कसा झाला त्याची हकीगत मालक 'मिहीर राजगुरु' यांच्याकडून खास मायबोलीकरांसाठी.

mihir.jpg

प्रश्न- प्रवास कसा सुरू झाला तुमच्या व्यवसायाचा?

विषय: 

मायबोली - कृषीवल रसग्रहण स्पर्धा - २०११

Submitted by Admin-team on 29 July, 2011 - 14:29

krushival-maayboli-big.jpgनवनवीन पुस्तकं वाचली जावीत, त्यांवर चर्चा व्हावी, हे वाचनचळवळीच्या दृष्टीनं अत्यावश्यक असतं. लेखक, वाचक आणि प्रकाशक यांच्यातलं नातंही अशा देवाणघेवाणीतून दृढ होतं. सध्याच्या काळात ते महत्त्वाचंही आहे. मायबोली.कॉम हे संकेतस्थळ वाचनचळवळ जोमदार व्हावी, यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतं. मायबोली - कृषीवल रसग्रहण स्पर्धेचा हा उपक्रमही या प्रयत्नांचाच एक भाग आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

अनिवासी भारतीय (एन. आर. आय.) विवाह : संबंधित धोके, शक्यता, खबरदारी व मदत

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 29 July, 2011 - 09:46

वर्तमानपत्रात छोट्या जाहिरातींमध्ये एक ठळक अक्षरातील जाहिरात लक्ष वेधून घेते : वधू पाहिजे, वर सुशिक्षित/ उच्चशिक्षित, परदेशात कायमचे वास्तव्य / ग्रीन कार्ड, स्वतःचे घर, गाडी इत्यादी इत्यादी, कोणतीही जबाबदारी नाही.... वधूबद्दल अपेक्षा....

आणि मग एवढ्या माहितीच्या आधारे अनेक वधुपिते त्या स्थळाच्या मागे लागतात. भराभर सोयीच्या तारखांना भेटीगाठी ठरविल्या जातात, चट मंगनी पट ब्याह होतो, नवरा-नवरी परदेशी त्यांच्या घरी रवाना होतात, किंवा नवरा अगोदर जातो - नवरी काही कालाने व्हिसा वगैरे औपचारिकता पूर्ण करून मग जाते. सारे काही आलबेल होते. पण ते तसे खरेच होते का?

मायबोली गणेशोत्सव २०११ घोषणा

Submitted by रूनी पॉटर on 28 July, 2011 - 16:53

मायबोली गणेशोत्सव २०११ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपापली नावे कळवावीत. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी संयोजक संपर्क साधतील.
गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, त्या कलाकृती सादर करणे वा स्पर्धा घेणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.

बी एम एम २०११ शिकागो अधिवेशन कसे वाटले?

Submitted by admin on 26 July, 2011 - 23:01

बी एम एम २०११ शिकागो अधिवेशन कसे वाटले? त्यासंबंधी आपल्या प्रतिक्रीया इथे लिहा.

medium_BMM2011_logo3.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी — मायबोली वर्षाविहार २०११ (क्षणचित्रे)

Submitted by जिप्सी on 24 July, 2011 - 23:49

झिम्माड पाऊस, चिंब मायबोलीकर, प्रवासातील नॉनस्टॉप गाणी, उडीबाबाचा पारंपारीक कार्यक्रम, स्विमिंग पूल आणि कृत्रिम धबधब्यात केलेली फुल्ल टु धम्माल, गिरीचा मनसोक्त जलविहार, रेस्क्यु ऑपरेशन :-), चिंब पावसातील समुहनृत्य :-), चमचमीत जेवण, संयोजकांचे "जरा हटके" स्पर्धा आणि बक्षिसे, अशा तर्‍हेने मायबोलीकरांचा लाडका वर्षोत्सव दणक्यात पार पडला. टिशर्ट/कॅप समिती, सुलेखनकार आणि उत्तम संजोयनाबद्दल संयोजकांचे आभार.

दिवसभर कोसळणारा "मुसळधार पाऊस" आणि "बंधारा" हे यावर्षीच्या वविचे खास आकर्षण होते. :-).

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - पत्रक