प्रकाशचित्र

टाकाऊतून टिकाऊ.

Submitted by शोभा१ on 30 July, 2012 - 04:06

मी ही पर्स,खूप घाईत असताना ही शिवली आहे. ती कशापासून बनवलेली आहे ते तुम्ही सांगा. Happy

DSCN3731.jpg

गुलमोहर: 

चिंब भिजलेले "किल्ले पुरंदर-वज्रगड"

Submitted by जिप्सी on 29 July, 2012 - 09:54

कश्मिरहुन परत येऊन दोन आठवडे झाले आणि एक अख्खा विकांत घरीच बसुन घालवला. पण पावसाळ्यातला "महाराष्ट्र" साद घालतच होता. तेंव्हा २८ जुलै च्या विकांताला कुठे तरी जायचे नक्की करतच होतो. शेवटी पुरंदर-वज्रगडचा बेत ठरला. मायबोलीकर आशुचॅम्प, दिपक डी आणि दिपकचा मित्र गणेश असे चौघे ठरलो. बाकीचे तिघे पुण्याचेच असल्याने मुंबईतुन मी एकटाच ठाण्याहुन वाकडला आलो आणि तेथुन दिपकच्या बाईकने आम्ही वार्जेला आशुला भेटलो. पुढे आशुबरोबर कात्रज, कापूरहोळ-सासवडमार्गे नारायणपूरला जाऊन पुरंदर वज्रगड ट्रेक संपन्न केला :-). झिम्माड पाऊस यामुळे ट्रेक सोपा असला तरी वाट बरीच निसरडी झाली होती.

गुलमोहर: 

"हुस्न-ए-कश्मीर" (१) — श्रीनगर (दल सरोवर)

Submitted by जिप्सी on 26 July, 2012 - 00:43

सराय रोहिला स्टेशनच्या धावपळीत जाम थकलो, नंतर थोड्या गप्पा मारल्या आणि आपआपल्या बर्थवर जाउन झोपी गेलो. सकाळी जाग आली आणि खिडकीतुन बाहेर पाहिले असता सुजलाम सुफलाम पंजाब राज्यातुन गाडी धावत होती. साधारण अर्ध्या तासाने पंजाबातील शेवटचे स्टेशन माधोपूर आले आणि काहिवेळातच बाजुला रस्त्यावर "काश्मिरमध्ये स्वागत आहे" अशा आशयाचा बोर्ड दिसला आणि आम्ही काश्मिरमध्ये पोहचल्याची चाहूल लागली. साधारण अर्धा-पाऊण तासातच गाडी जम्मुतवी स्टेशनवर पोहचली. स्टेशनबाहेर आलो. मी आणि अजय श्रीनगरला जाणार्‍या गाड्यांची चौकशी करण्यासाठी निघालो. येथे श्रीनगरला जाणार्‍या प्रायव्हेट गाड्यांची मोठी युनियनच आहे.

गुलमोहर: 

फ्रान्स-पॅरीस-आईफेल टॉवर

Submitted by यशस्विनी on 25 July, 2012 - 04:16

आम्ही ज्यावेळी पॅरीसला पोचलो त्यावेळी वातावरण थोडे ढगाळ झाले होते, बारीक बारीक पाउस पडत होता त्याचे प्रतिबिंब खालील प्रचिंमध्ये दिसत आहे.....

१.

गुलमोहर: 

कृष्णकमळ

Submitted by अवल on 23 July, 2012 - 10:18

माझ्या टेरेसमध्ये सध्या कृष्णकमळं उमलताहेत. मला फार आवडणारे एक फुल. थोडा रानवट पण फार गोड सुवास असणारे आणि बालपणीच्या खुप आठवणी जोपासणारे हे फुल.
त्याच्या नावाची कथा ऐकली असेलच तुम्ही. बाजूला १०० कौरव ( जांभळ्या बारीक पाकळ्या), मध्ये पाव पांडव ( पिवळी पाती ) आणि मध्ये तीन मोरपिसं खोचलेला कृष्ण ( तीन पराग असलेला पिवळा मणी) !

त्याचीच ही रुपे :

१. हे झाडावर झुलणारे
1 copy.jpg

२. घरभर त्याचा सुवास फुलावा म्हणून एक घरात आणले

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

माझी डोंगरचढाई

Submitted by Kiran.. on 23 July, 2012 - 04:08

अनेक जणांचे डोंगरचढाईचे, पर्वतचढाईचे आणि दुर्गभ्रमणाचे प्रव वाचून भयंकर निराशा येत चालली होती. कुठे तरी चढाई केली पाहीजे असा विचार मनात येत होता. माबोवर प्रवासवर्णनही लिहीलेलं नसल्याने हे करणं देखील भागच होतं. त्यातच बायको घरचे सगळे आणि मित्रमंडळी यांनीही लकडा लावला कि विचार चांगला आहे अंमलात आण. कसा होतास आधी ? आं ! सिंव्हगडावर दर रविवारी जात होतास, हिमालयात जात होतास आणि आता सदा न कदा त्या मायबोलीसमोर बसलेला असतोस फावल्या वेळात. नाहीतर षिणेमा ! ते काही नाही ! जायचंच.

गुलमोहर: 

साद देती हिमशिखरे : भाग-६ : सुवर्णमंदिर, जालियनवाला बाग, वाघा सीमा.

Submitted by शोभा१ on 23 July, 2012 - 03:23

http://www.maayboli.com/node/30435
http://www.maayboli.com/node/30957
http://www.maayboli.com/node/31336
http://www.maayboli.com/node/34708
http://www.maayboli.com/node/35870
http://www.maayboli.com/node/35871

दिनांक २८.१०.११. नेहमीप्रमाणे लवकर ऊठून प्रथम काही फोटो काढले.
१.

गुलमोहर: 

गोडुली

Submitted by मानुषी on 23 July, 2012 - 01:29

Photo0142.jpgपुतणीच्या लग्नात घेतलेले नणंदेच्या नातीचे फोटो. ती इतकी अस्थीर आणि चंचल आहे की फोटो इतकेही बरे आणि स्पष्ट येतीलसं वाटलं नव्हतं.
आर्मी एरियातील एका हॉलमधे हे लग्न होतं. बाहेर पार्कमधे लहान मुलांसाठी सीसॉ, घसरगुंडी याबरोबरच एक छोटंसं घरही होतं समस्त बालकलाकार या घरामुळे वेडे झाले होते. सगळी मुलं सारखी आतबाहेर करत होती. या घराला छोट्या खिडक्या दारं होती त्या खिडक्यातून लपाछपी खेळत होती. आणि नुसता दंगा!

Photo0135.jpg

गुलमोहर: 

"राजधानी दिल्ली"

Submitted by जिप्सी on 22 July, 2012 - 10:51

खरंतर आमचा बेत "लेह-लडाख" चा ठरला होता. त्याप्रमाणे तयारीही सुरू झाली होती. मायबोलीकर चंदन, सेनापती आणि प्राची यांच्याकडुन बरीच माहिती गोळा केली. मायबोलीवर बाफही काढला त्यातुनही भरपूर माहिती मिळाली. मी आणि माझी तीन मित्र असे आम्ही चारजण जाणार होतो. जाताना ट्रेनने जम्मु आणि त्यापुढे श्रीनगर आणि परत येताना श्रीनगरहुन विमानाने थेट मुंबई असा एक रफ प्लान तयार केला. आता फक्त जाण्याच्या दिवसाची वाट पहात होतो. पण मध्येच माशी शिंकली आणि एका मित्राला लग्नाच्या बेडीत अडकवण्याचा त्याच्या घरच्यांनी घाट घातला.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - प्रकाशचित्र