स्पर्श बालग्राम

स्पर्श प्रेमाचा, विश्वासाचा आणि मुहुर्तमेढ एका शुभकार्याची : "मैत्र जिवांचे" सामाजिक संस्था.

Submitted by विशाल कुलकर्णी on 12 July, 2011 - 02:32

दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती !

जो जे वांछिल तो ते लाहो ! संत ज्ञानेश्वरांनी परमेश्वराजवळ सकळ चराचरासाठी असे व्यापक पसायदान मागितले होते. जगात आजुबाजुला पसरलेली विषमता, गरीबी पाहून कधी कधी असे वाटायला लागते की ज्ञानदेवांची मागणी त्या सर्वव्यापक परमेशाजवळ पोहोचलीच नाही की काय कोण जाणे? पण जसजसे आपण समाजाच्या अधिकाधिक जवळ जायला लागतो, त्याच्याशी एकरुप व्हायचा प्रयत्न करतो तसतसे त्या परमेशाची कारगुजारी लक्षात यायला लागते आणि मग लक्षात येते की नाही..., तो जागाच आहे आणि आपल्या लेकरांवर लक्ष ठेवून आहे. आत्ता सगळीकडे एकाच वेळी असणे त्यालाही कार्यबाहुल्यामुळे जड जात असेल कदाचित Wink

विषय: 
Subscribe to RSS - स्पर्श बालग्राम