मायबोली गणेशोत्सव २०११ घोषणा

Submitted by रूनी पॉटर on 28 July, 2011 - 16:53

मायबोली गणेशोत्सव २०११ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपापली नावे कळवावीत. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी संयोजक संपर्क साधतील.
गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, त्या कलाकृती सादर करणे वा स्पर्धा घेणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे, त्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल. तसेच ज्या लोकांच्या घरी इंटरनेट सुविधा आहे अश्यांनी अवश्य मंडळात सहभागी व्हावे.
धन्यवाद.
*****
मायबोली गणेशोत्सव २०११ संयोजक मंडळ तयार झाले आहे.
मुख्य संयोजक - मामी
संयोजक मंडळ - लाजो, प्रज्ञा९, वैद्यबुवा, प्रमोद देव.
सगळेजण पहिल्यांदाच काम करत आहेत. सर्व संयोजक मंडळाचे अभिनंदन व कार्यास भरघोस शुभेच्छा.
मोरया!!!
*****

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाजो संयोजक म्हणून तुम्हीच स्पर्धा ठरवणार ना? मग तुम्हाला माहिती असलेल्या, तुम्हीच ठरवलेल्या स्पर्धांमधे तुम्हीच भाग घेऊन कसे चालेल? Happy

मिनोती, मी जर सांस्कृतिक कार्यक्रमांमधे संयोजक म्हणुन काम केले तर त्याचा आणि स्पर्धांचा संबध नाही अस मला वाटलं म्हणुन माझा प्रश्न.

लाजो,
अगं गणेशोत्सवात स्पर्धा, सां कार्यक्रम वगैरे सर्वकाही सगळे संयोजक मिळूनच आयोजित करतात. त्यामुळे सां कार्यक्रमांचे वेगळे संयोजक, स्पर्धांचे वेगळे संयोजक असं नसतं.

धन्स गं अंजली Happy

मला आवडेल यंदा संयोजन करायला.

कधी पर्यंत कळवायचे आहे? मी जरा कामाचा अंदाज घेते आणि नक्की सांगते Happy

देवकाका आणि संयोजनात भाग घेऊ इच्छिणारे - गणेशोत्सव संयोजनाविषयी परागचा हा लेख वाचा http://www.maayboli.com/node/18506
त्या लेखातच लालूच्या लेखाचीही लिंक आहे.

दुवा दिल्याबद्दल धन्यवाद मंजूडी.

या वर्षी भाग घेऊ इच्छीणार्‍या सर्व संभाव्य संयोजकांनी वरील दुवा जरूर वाचावा.

धन्यवाद मंजुडी.
संबंधित दोन्ही दुवे वाचले...थोडीफार कल्पनाही आली...आता बाकी प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाल्यास प्रात्यक्षिकांमधूनही शिकता येईलच.
तस्मात, मी तयार आहे.

अरे वा, ज्याची वाट पाहात होते ती घोषणा झाली (एकदाची).

संयोजक मंडळात भाग घेऊ इच्छिणार्‍या सर्व मेंब्रांना आगाऊ शुभेच्छा

अरे वा! नेहमीप्रमाणे मला प्रतिक्षा आहे ती छायाचित्रांच्या झब्बूची. माझा प्रच्चंड आवडता प्रकार. Happy

मला संयोजन समितीमधे भाग घ्यायला आवडेल. या आधी काम केलेले नाही, मात्र घरी इंटरनेट आहे ( आणि रिकामटेकडा भरपूर वेळ आहे)

मला आवडले असते. पण माझ्या वेळेचे निश्चित नसते.

स्पर्धांच्या घोषणा करा लवकर. कोणत्या स्पर्धा आहेत यंदा ?

मायबोली गणेशोत्सव २०११ संयोजक मंडळ तयार झाले आहे.
मुख्य संयोजक - मामी
संयोजक मंडळ - लाजो, प्रज्ञा९, वैद्यबुवा, प्रमोद देव.
सगळेजण पहिल्यांदाच काम करत आहेत. सर्व संयोजक मंडळाचे अभिनंदन व तेव्हा कार्यास भरघोस शुभेच्छा.
मोरया!!!

Pages