मायबोली गणेशोत्सव २०११

चित्रांगण - २ (सांस्कृतिक कार्यक्रम, रिक्षा आणि जाहिरात ) - मायबोली गणेशोत्सव २०११

Submitted by संयोजक on 18 September, 2011 - 09:37

संयोजकांचे मनोगत - मायबोली गणेशोत्सव २०११

Submitted by संयोजक on 15 September, 2011 - 20:04

संयोजनाकरता नावं दिलेल्या आम्हा पाच अतिउत्साही आणि मायबोलीवर बर्‍यापैकी नव्या अशा सदस्यांना उचलून रूनीने 'मायबोली गणेशोत्सव संयोजन २०११' च्या मैदानात सोडून दिले, मार्गदर्शन केले आणि मग आमच्याकरता सुरू झाली एक अनोख्या अनुभवांची जंगी मालिका!

विषय: 

चित्रांगण - १ (आरास, नांदी, दवंड्या आणि स्पर्धा फलक) - मायबोली गणेशोत्सव २०११

Submitted by संयोजक on 14 September, 2011 - 08:58

|| श्री गणेशाय नम: ||

गणेशोत्सव २०११ : श्री गणेश प्रतिष्ठापना

आरास १:

Aaras 1 Final .jpg

पोस्टर: दिव्या

**************************************************************
आरास २: अष्टविनायक दर्शन अ‍ॅनिमेशन

पोस्टर: दिव्या, श्लोक: झाशीची राणी
**************************************************************

विषय: 

किलबिल - तन्वी (मनस्विता)

Submitted by संयोजक on 11 September, 2011 - 10:37
विषय: 

मायबोली गणेशोत्सव २०११ - सांगता आणि कानोसा

Submitted by संयोजक on 11 September, 2011 - 08:21

नमस्कार मंडळी,

यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता झाली आहे. जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या गणपतीबाप्पांना निरोप देऊन आता पुढल्या वर्षीपर्यंत वाट बघायची.

गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपण सर्वांनी समरसून भाग घेतलात याबद्दल आपले सर्वांचे आभार. स्पर्धांचे निकाल लवकरच जाहीर करू. त्याकरता पुन्हा एकदा आपल्याकडून भरभरून मतदानाची अपेक्षा आहे.

यंदा, काही उपक्रमांत खूप भरघोस प्रतिसाद मिळाला तर काहींना अपेक्षेपेक्षा फारच कमी (मायबोली शीर्षकगीत स्पर्धा, आमंत्रण लेखन स्पर्धा). कलाकुसरीसारख्या विषयाकरता तर एकही प्रवेशिका आली नाही.

विषय: 

प्रवासवर्णन स्पर्धा - "सारे प्रवासी घडीचे" - बागेश्री

Submitted by बागेश्री on 11 September, 2011 - 08:18

स्पर्धेचा मी निवडलेला विषय- लग्न : खोलीपासून ते बोहल्यापर्यंतचा प्रवास!
--------------------------------------------------------------

".....दिदे, सरळ उभी रहाय की गं, कित्ती हलायलीस, आणि साडी पण असली घेतली आहेस ना ही, एक पण मिरी उघडून पुन्हा घडी जर घातली ना, तर त्या घड्या पडलेल्या दिसतात, अन् तू हलतीस ना इतकी, कश्या पाडू सांग, मी एकसारख्या मिर्‍या??"

अनघा 'नांदेडी' ठसक्यात फणकारलीच...

"अगं अनु, मग तो मोबाईल दे ना, बघु नवर्‍याचा मेसेज आलाय का ते?"

विषय: 

किलबिल - सृजन (रूणुझुणू)

Submitted by संयोजक on 11 September, 2011 - 07:40
विषय: 

किलबिल - वेद (साक्षी )

Submitted by संयोजक on 11 September, 2011 - 04:48
विषय: 

किलबिल - श्रीया (प्राजक्ता३०)

Submitted by संयोजक on 11 September, 2011 - 00:41
विषय: 

मायबोली शिर्षकगीत स्पर्धा - "ज्योतीने तेजाची आरती" - शाम

Submitted by -शाम on 10 September, 2011 - 12:51

अमुची मायबोली

मायमराठी नव्या युगाचा
साज नवा हो ल्याली
रंग मराठी उधळत आली
अमुची मायबोली.....||धृ||

गुलमोहराचे बहर जणू हे
कथा कविता गझला
रंगबिरंगी लेखमालिका
अवघा धागा सजला
हितगुज करती एकमेकीशी
कला गुणांच्या वेली....||१||

कुणी दाखवी पाककला तर
कुणी दाखवी किल्ले
कुणी चालवी अपुला धागा
इथे झेलुनी हल्ले
लुटूपुटूची शब्द लढाई
हसू उमटते गाली......||२||

Pages

Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०११