मायबोली शीर्षक गीत

स्वयंसेवक हवेत - मायबोली शीर्षक गीत

Submitted by रूनी पॉटर on 5 December, 2011 - 14:47

यंदाच्या मायबोली गणेशोत्सवात "मायबोली शीर्षक गीत" स्पर्धा घेतली होती आणि त्यात श्री. उल्हास भिडे यांनी लिहीलेल्या गीताची शीर्षक गीत म्हणून निवड झाली. जगभरातल्या मायबोलीकरांनी मिळून हे गायले आहे आणि लवकरच मायबोलीवर प्रदर्शित केले जाईल.

या उपक्रमासाठी वेगवेगळ्या कामांसाठी स्वयंसेवक हवे आहेत.

या गीताबरोबरच "मेकींग ऑफ मायबोली शीर्षक गीत" स्वरुपाचा छोटा व्हिडीओ अथवा पॉवर पॉइंट प्रेझेंट्रेशन तयार करायचे आहे. याचा कच्चा आराखडा तयार आहे त्याच्यावर योग्य ते काम करून एक चांगले प्रेझेंटेशन तयार करायचे आहे. या कामासाठी तांत्रिक मदत करू शकतील असे काही मायबोलीकर हवे आहेत.

विषय: 

मायबोली शीर्षकगीत स्पर्धा (नियम) : "ज्योतीने तेजाची आरती..." - मायबोली गणेशोत्सव २०११

Submitted by संयोजक on 18 August, 2011 - 08:54

jyotine_0.jpg

भारताचे राष्ट्रगीत ..... महाराष्ट्राचे महाराष्ट्रगीत ........ मग मायबोलीचं आपलं स्वत:चं मायबोलीगीत का बरं नाही???

आपल्या मायबोलीवर कितीतरी प्रतिभासंपन्न कवी-कवयित्री आहेत. त्या सगळ्यांना यंदा ही सुवर्णसंधी आहे. आपल्या लाडक्या मायबोलीचं सुंदर वर्णन, तिचं तत्वज्ञान, तिचे पैलू उलगडून सांगणारं, छानसं चालीवर बसवता येईल असं गीत तयार करायचं... खास "मायबोली शीर्षकगीत".

Subscribe to RSS - मायबोली शीर्षक गीत