नव्या पिढीतील संस्कारक्षम गीते:- भाग २, डोन्ट टच माय बॉडी

Submitted by विहम on 25 August, 2016 - 07:57

गीत:- डोन्ट टच माय बॉडी व मेरे सैयां
चित्रपट:- बुलेट राजा
गीतकार:- संदीप नाथ

गाण्याचे बोल:-

नज़रों की स्याही से मोहर लगाए
मुंह मे बतासे का रस घुलता जाए
ओ दीवाने तू बड़ा कंफ्यूज है
तूने सोचा क्यूं मेंरा करैक्टर लूज़ है
अरे प्यार जताईके बतियां बनाइके
हमको बुलाइके हां डोंट टच माय

अरे डोंट टच माय बॉडी ओ मोरे सैयां
हाय डोंट टच माय बॉडी ओ मोरे सैयां
अरे डोंट टच माय बॉडी ओ मोरे सैयां

तेरा जला दूंगी गद्दा और तकिया
अरे डोंट टच माय बॉडी ओ मोरे सैयां
मैं भोली इनोसेंट थी समझ ना पायी
तेरे बुलाने पे मैं तो चली आई
दिल में थी इमोशन की नयी अंगडाई
पर निकला सनम तू तो बड़ा हरजाई
अरे प्यार जताइके बतियां बनाईके
हमको बुलाइके हां डोंट टच माय

तू समझा के दिल हमरा है रबड़ी-मलाई
सस्ते में फट से इसको हजम कर जाई
मुहब्बत में सनम तुम हो बड़े टिपिकल
प्यार करो आंखों से ना हो फीसिकल
अरे प्यार जताइके बतियां बनाईके

हमको बुलाइके हां डोंट टच माय
ओये होए ओये होए ओये होए ओये होए
अरे डोंट टच माय बॉडी ओ मोरे सैयां
डोंट टच माय बॉडी ओ मोरे सैयां
अरे डोंट टच माय बॉडी ओ मोरे सैयां
तेरा जला दूंगी गद्दा और तकिया
अरे डोंट टच माय बॉडी ओ मोरे सैयां

या गाण्यामध्ये खरेतर आम्हाला लिहिण्यासारखे काहीच नाही. अतिशय सरळसोट पद्धतीने लिहिलेलं गीत आहे. कुठल्याही उपमा न वापरता नायिका सरळ सरळ नायकाला सांगते आहे डोन्ट टच माय बॉडी! या गाण्याचा अर्थ न कळणाऱ्या लोकांना एक तर हिंदी येत नाही किंवा ते माठ आहेत. या दोन्ही प्रकारच्या लोकांसाठी खालचे स्पष्टीकरण.

मुलीचे मुलावर प्रेम आहे म्हणूनच तर ती त्याला सैयां म्हणत आहे. पण स्त्रीचे प्रेम आहे म्हणून काय पुरुषाला 'सगळा' अधिकार मिळाला का? स्त्रीचे जरी तुमच्यावर प्रेम असेल, जरी तुमचे तिच्याशी लग्न झाले असेल तरी तिला तिच्या परवानगी शिवाय स्पर्श करायचा हक्क तुम्हाला नाही. प्रेम, लग्न झाले आहे म्हणून तिला गृहीत धरून तुम्ही अंगाशी सलगी करू शकत नाही. खरेतर विवाहांतर्गत बलात्कार या विषयाचे हे थीम सॉन्ग असायला हवे.

नवीन पिढीचे, त्यांच्या अधुनिकपणाचे हे गाणे एक द्योतक आहे. (काही)पुरुष स्त्रीला भावनेच्या भरात अडकवून तिचा फायदा उचलायला बघतात. खोटे खोटे प्रेम दाखवून, गोड बोलून भलताच उद्देश साध्य करतात. स्वार्थ साधून झाल्यावर स्त्रीला वाऱ्यावर सोडून रिकामे होतात. आपली एकंदर समाजरचनाच अशी आहे की पुरुषाने काही केले तरी तो जबाबदारी झटकून उजळ माथ्याने फिरू शकतो आणि स्त्रीचे मात्र नाव आयुष्यभरासाठी बदनाम होते. लग्न झाल्यावर पण पती अनेकदा पत्नीच्या मनाविरुद्ध तिच्याशी शरीरसंबंध करतो.

आता काळ बदलतोय, स्त्रियांना त्यांच्या हक्काची जाणीव होत आहे. या गाण्यातली नायिका आजच्या काळातली डॅशिंग आणि बोल्ड स्त्री आहे. उगाच 'नहीं नहीं अभी नहीं' असले नाजूक/ भिडस्त काम नाय, सरळ स्पष्टपणे ' डोन्ट टच माय बॉडी'. 'लडकी के ना में भी हां होती है' वगैरे लॉजिक जे पुरुषांच्या मनात रुजले आहे, त्यांना हीच भाषा कळते.

पुरुषांसाठी संस्कार:- तुमची मैत्रीण, प्रेयसी, बायको किंवा अजून कोणतीही स्त्री असो तिला तिच्या परवानगी शिवाय सहेतुक स्पर्श करण्याचा अधिकार/हक्क तुम्हाला मिळत नाही. ती स्त्री आहे म्हणून तुम्हाला तिला गृहीत धरायचा तुम्हाला काडीमात्र अधिकार नाही. नाही या शब्दाचा अर्थ नाहीच असतो. मर्यादा ओलांडू नका. लिमिट मध्ये रहा !

स्त्रियांसाठी संस्कार:- तुमची इच्छा नसेल तर पुरुषांच्या गोड बोलण्याला, लाडात येण्याला, लबाडीला बळी पडून तुमच्याशी सलगी करू देऊ नका. समोरचा पुरुष कोणीही असो तुमच्या इच्छेशिवाय मर्यादेबाहेर जात असेल तर त्याला सरळ तसे ऐकवा किंवा फटकवा. तुम्हाला कायद्याचे संरक्षण आहे.

(गाण्याविषयी लिहिताना मनात आले ते सरळ लिहीत गेलो. लिहून पूर्ण झाल्यावर संपादित करून काही ठिकाणी जमतील तसे विनोद पेरायची इच्छा झाली होती. पण ती पूर्णपणे टाळतो आहे. चुकभुल माफ असावी)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिहिताना विनोदी लिहायचे असे ठरवून सुरुवात केली होती पण लिहिता लिहिता मधेच सिरीयस झालो. त्यामुळे ना धड गंभीर ना धड विनोदी असं काहीतरी भलतंच झालेलं आहे. Happy

चालते हो, इथे लोक स्वतःला पाहिजे तसे वाचतात. उगाच गंभीर समिक्षकाचा आव आणून काव आणण्यापेक्षा तुम्ही बरे!
लेख उत्तम आहे!