जॅझ संगीत

जॅझ संगीत आणि खाद्यसंस्कृती - एका चवीचं जन्मरहस्य उलगडताना

Submitted by आशयगुणे on 27 October, 2016 - 14:25

दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मुंबईत, ‘मरिन लाईन्स’ला ‘ग्रीन ओनियन’ ( Green Onion) नावाचे एक रेस्तरॉ आहे. त्या वेळेस मी एका ‘ऑनलाईन ट्रॅव्हल मार्केटप्लेस’ असलेल्या कंपनीत कामाला असल्यामुळे या रेस्तरॉशी संबंधित असलेल्या ‘हॉटेल सपना मारिन’शी माझा व्यावसायिक संबंध येत असे. तिथल्या भेटीच्या वेळी माझ्या लक्षात आलं की, या रेस्तरॉमध्ये नायजेरियन पद्धतीचं जेवण मिळतं. त्यामुळे बरेच नायजेरियन लोक इथे ‘घरचं’ जेवायला म्हणून येतात आणि हॉटेलमध्ये राहायला देखील! आपण ‘रिसेप्शन डेस्क’ला जाऊन उभं राहिलो की हमखास कुणीतरी नायजेरियन व्यक्ती दिसतेच दिसते.

Subscribe to RSS - जॅझ संगीत