संगीत-नाटक-चित्रपट

झिरो परीक्षण

Submitted by अज्ञातवासी on 23 December, 2018 - 11:59

गणेशोत्सवात गावोगावी खूप देखावे उभारलेले असतात.पण प्रत्येक गावाचं आकर्षण असतो, तो एक देखावा, जो सगळ्या देखाव्यात उठून दिसतो. आपल्याला माहिती असतं, हा एक देखावा आहे, मूळ घटना यापेक्षा खूप भव्यदिव्य आहे. पण तरीही आपण तो देखावा मनापासून एन्जॉय करतो, त्या देखाव्यातील सत्यतेत कितीही भगदाडे असली तरी!

....

Submitted by अज्ञातवासी on 22 December, 2018 - 12:37

एका हलकट, मनोरुग्ण आणि निर्लज्ज व्यक्तीसाठी हे कुरण मोकळं सोडलंय. त्याने जी घाण करायची ती इथेच करावी. मी त्याच्या एकाही प्रतिसादाला उत्तर दिलेलं नाही, आणि देणारही नाही.
तुमचा नंगानाच चालू दयावा ही विनंती.
ऍडमिनने कृपा करून हा धागा उडवू नये.

‘कॅलस इन कन्सर्ट’ - मी पाहिलेला एक अप्रतिम ‘ऑपेरा’

Submitted by दीपा जोशी on 2 October, 2018 - 17:15

callas-in-concert 2_1.jpg

‘ऑपेरा’ ही एक इटालियन रंगमंचाची संगीतमय कलाकृती.

चित्रपट परिक्षण – tc.gn – टेक केअर गुड नाईट - साइबर गुन्हा आणि वास्तव

Submitted by भागवत on 1 September, 2018 - 09:07

मी पाहिलेले दशावतारी नाटक!

Submitted by निमिष_सोनार on 21 August, 2018 - 06:32

दशावतारी नाटक ही मालवणी मुलूखातील एक प्रसिद्ध आणि प्राचीन लोककला. भगवान विष्णूंच्या दहा अवतारांतील तसेच इतर पौराणिक व्यक्तिरेखा घेऊन रामायण, महाभारत आणि विविध पुराणे यांतील कथा या नाटकांत रंगमंचावर सादर केल्या जातात.

मला अलीकडेच म्हणजे 2018 च्या ऑगस्ट महिन्यात 11 तारखेला दशावतारी नाटक बघण्याचा योग आला. तसा मी व्यवसायाने इंजिनियर म्हणून एका खासगी कंपनीत मी कार्यरत आहे पण सर्व प्रकारच्या कलेची तसेच अध्यात्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक गोष्टींची लहानपापासूनच मला आवड आहे आणि छंद म्हणून मी विविध विषयांवर लिहीत असतो. लिखाणाची मला प्रचंड आवड!

शब्दखुणा: 

ये दिन क्या आये लगे फूल हँसने ...

Submitted by विशाल कुलकर्णी on 6 August, 2018 - 02:44

त्या दिवशी जेवण झाले आणि मी हात धुवुन येईपर्यन्त मित्राने हॉटेलच्या काउंटरवरुन त्याची सिगरेट विकत घेतली आणि बाहेर जावून सिगरेट ओढ़त उभा राहीला.

"सम्या, यार एक गोष्ट सांग मला. तुला दर तासा-अर्ध्यातासाला सिगरेट लागते, मग पिक्चरला थिएटरमध्ये गेल्यावर कसा बसून राहतोस इंटरव्हलपर्यन्त. Movie is also your passion." मी मुद्दाम खोड काढली.

"अबे सिगरेट सॉंग्स असतात ना प्रत्येक चित्रपटात. "

आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ८

Submitted by कृष्णा on 4 August, 2018 - 01:14

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -७- https://www.maayboli.com/node/64144

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

चंदा कि किरनोंसे लिपटी हवायें, सितारों की महफिल जवां, आके मिल जा….!

Submitted by अतुल ठाकुर on 24 June, 2018 - 00:27

chanda_ki_kirno_se.jpg

दिवस १९७३ चे होते. जीवन आजच्या तुलनेने साधे होते. अंगभर साडी नेसलेली, एक वेणी घातलेली आणि ती वेणी उजवीकडून पुढे आणलेली तरुणी साधी असली तरी नायिका म्हणून शोभत होती आणि सुंदरही दिसत होती. बलदेव खोसाचा भोळा भाबडा चेहराही नायक म्हणून पडद्यावर स्विकारला जात होता. आणि या सर्वात माधुर्य आणत होते ते त्याकाळचे संगीत. चित्रगुप्त यांना नौशाद, सी रामचंद्र, मदनमोहन यांच्याप्रमाणे नावाजले गेले नसले तरी त्यांनी जी मोजकी गाणी दिली ती मात्र जबरदस्त होती. "चंदा की किरनोंसे" हे त्यातीलच एक गीत.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - संगीत-नाटक-चित्रपट