घर

वॉलपेपर कि रंग … ?

Submitted by गुलाम चोर on 25 October, 2013 - 02:05

घराच्या भिंतींना वॉलपेपर लावावा कि रंग याबद्दल मनात संदेह निर्माण झालाय. दोन्हीचे आपापले काही फायदे आहेत आणि काही तोटे आहेत… टिकाऊपणा, देखणेपणा, ट्रेन्ड, परंपरा आणि खर्च या सगळ्याचा उहापोह डोक्यात सुरु आहे … पण कुछ समझ मे नही आ रे ला… क्या करे, क्या ना करे? असं झालय…..

मंडळी… जरा सांगाल का, काय करावं बरं ?

विषय: 

भाडं किती घ्यावं?

Submitted by डीडी on 22 August, 2013 - 10:31

नमस्कार,

थोडी माहिती हवी होती.
माझा पुणे बावधन (चांदणी चौक पासून १ साधारण १ किमी) येथे परांजपे स्कीम मध्ये २ बीएचके फ्लॅट आहे. त्यात कोणतंही फर्निचर नाही आहे. तर मला एक ओळखीचा भाड्याने घेण्यासंदर्भात विचारात आहे..
तर मी किती भाडं सांगावं?
डेपॉज़िट किती घ्यावं?

मी पुण्यात रहात नसल्याने मला तितका अंदाज नाही.
धन्यवाद!

शब्दखुणा: 

घरामधे पैशांची गुंतवणूक करणे

Submitted by शर्मिला फडके on 20 August, 2013 - 05:53

गुंतवणुकीच्या दृष्टीने सध्याचे 'हॉट डेस्टीनेशन' कोणते आहे?
वांगणी, नेरळ, कर्जत हे पर्याय रिसेल व्हॅल्यू, व्यवहारांची सुरक्षितता या दृष्टीकोनातून कसे आहेत?

शब्दखुणा: 

इन्व्हेस्टमेंट ऑप्शन - घर की दुकान?

Submitted by मेधावि on 26 June, 2013 - 23:04

सध्या पुण्यात बावधनच्या आसपास व कोथरुडमधे "मोक्याच्या ठिकाणे नसलेल्या" दुकानाची किंमत जवळपास ३५ ते ४० लाखाच्या आसपास आहेत. तेवढ्याच किमतीत साधारणपणे रिसेलचा वन बिएच्के फ्लॅट मिळतो. मी व नवरा नोकरीत आहोत व सध्या तरी नोकरी सोडायचा कोणताही प्लॅन नाही. पण अजून काही वर्षांनी बरे होईल म्हणून दुकान घेऊन ठेवावे का असा विचार करतो आहोत. एजंट च्या मते दुकान घेऊन ठेवण्यापेक्षा "दुसरे" घर घेऊन ठेवणे जास्त चांगले कारण घरातली गुंतवणूक दुकानापेक्षा जास्त परतावा देते. लगेचच्या लगेच चालवायचे असेल तरच दुकान घेउन ठेवावे असे त्याचे मत. तर घर की दुकान ? कोणी अनुभवी मार्गदर्शन करू शकतील का ?

शब्दखुणा: 

घर घेताना

Submitted by मनी on 1 March, 2013 - 17:56

हा प्रश्न कुठे विचारावा समजले नाही म्हणून इथे विचारतेय. आधीच असा धागा असेल तर हा धागा डिलीट करावा किंवा मी करेन. Happy

माझ्या बहीणीला अमेरिकेत घर घ्यायचे आहे. तीला जे घर मिळतंय त्यात एका वृद्ध जोडप्याचं निधन झालंय. जागेचा मालक २००९ ला अणि मालकीण बाई २०१२ ला स्वर्गवासी झाले.
तर हे घर घ्यावं की नाही हा प्रश्न आहे कारण बराच पैसा गुंतवायचा असल्याने जाणकारांना विचारूनच निर्णय घ्यावा. घेतलंच तर काही पूजा वगैरे करून घेता येइल कां?
घर अगदी छान आहे आणि मोक्याच्या जागी आहे पण या प्रश्नावर सगळं घोडं अडतंय.

श्रद्धा- अंधश्रद्धा हा प्रश्न उपस्थित करू नये प्लीज.

घर .......बदलून

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 15 December, 2012 - 12:36

आता ते घर
वाट पहिल्या विन
उघडे दार.

तसे पाहता
या रस्त्यावर नच
कुणी कुणाचे .

नुरले प्रेम
तरीही व्यवहार
असे शाबूत .

समोर येते
दोन वेळचे धड
रोज जेवण .

थोडे छप्पर
गॅलरीत त्या एक
जाड चादर .

ठरल्या वेळी
पण द्यावा लागतो
पैका मोजून .

जो तो आपुल्या
जगात हरवून
प्रेमावाचून .

होता बहाणा
ते खोटे खेचणे नि
सुटणे गाठी.

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

एकर...

Submitted by मुकुंद भालेराव on 30 April, 2012 - 02:32

इथं पेग पेग विस्की रिचवत
विस्कटलेलो असताना,
आणि घराच्या हप्त्यांच्या
कोंदटलेल्या धुरात
घुसमटलेलो असताना…
आबा, तुझी आठवण येते.

भेंडीखालच्या गुत्त्यावर
पावशेर झोकून,
पारापाशी पडून राहायचास तू
निपचीत… सूद हरपून…

आणि तुझ्या ठिगळं लावलेल्या संसाराचे
सारेच्या सारे अडाणी प्रश्न,
निदान तेवढ्यापुरते तरी
तू विसरून जायचास साफ.
तुझ्या भाबड्या मेंदूभोवती
सदा न् कदा घोंगावणाऱ्या
त्या सावकाराच्या तगाद्याला,
आणि तुझ्या घामेजलेल्या
चेहर्‍याभोवती घोंगावणार्‍या
त्या नादान माशांनादेखील
तू करून टाकायचास माफ…

इथं बाटलीभर विस्की ढोसूनही
सहा सहा अंकी आकड्यांचे

गुलमोहर: 

घरातील महत्वाचे पेपर्स कसे लावावेत

Submitted by साक्षी१ on 13 January, 2012 - 00:01

माझ्या घरात सगळे पेपर्स वेगवेगळ्या फाइल मध्ये आहेत ,आता मला ते व्यवस्थीत लावायचे आहेत. पण कुठुन सुरवात करु समजत नाहीये. काहीतरी सुचवा ना. कशी वर्गवारी करु यासाठी काही स्पेशल प्रकारच्या फाइल आहेत का? किंवा तुम्ही कसे फाइल करता.

विषय: 
शब्दखुणा: 

हे घरी असतात

Submitted by पाषाणभेद on 7 September, 2011 - 21:20

हे घरी असतात

हे घरी असतात तर किती बरे असते
मला कसली कसली काळजी नसते

मुलांचा सकाळचा डबा
त्यांच्या शाळेची तयारी
रिक्षावाल्याची वाट पाहणे
पेपरवाल्याची उधारी
झालेच तर नळाचे पाणी
ते तर तेव्हाच येत असते
हे घरी असतात तर किती बरे असते
मला कसली कसली काळजी नसते

त्यानंतरचा आमचा नाष्टा
कधी होतो रवा, पराठा
कधी उतप्पा, ईडली डोसा
ह्यांच्या हाताला मस्त चव असते
हे घरी असतात तर किती बरे असते
मला कसली कसली काळजी नसते

कामवाल्या मावशी धुणी भांडी करून जातात
साबण, सर्फ, पितांबरी ह्यांचा हिशेब हेच पाहतात
वाळलेल्या कपड्यांना इस्त्री कशी छान करतात

शब्दखुणा: 

OC - Occupation Certificate घरासाठी गरजेचे आहे का?

Submitted by तनू on 26 April, 2011 - 07:10

आम्ही सध्या नविन किवा resale flat शोधत आहोत. एक resale घर आम्हाला आवड्ले होते, पन जेव्ह लोन साठी बन्केत कागद्पत्र दाखवले तेव्हा त्यानि Occupation Certificate नसल्यामुळे loan मध्ये problem येईल असे सान्गितले. Occupation Certificate नसेल तर तो flat illegal होतो का? Occupation Certificate नसेल तर in future काहि अडचन येउ शकते का? एजंट म्हनतो काहि अडचन येनार नाहि, तुम्ही tokan amount द्या, मि तुम्हाला दुसर्या banketun लोन करुन देतो.

जाणकारांनी प्रकाश टाकावा.

Pages

Subscribe to RSS - घर