आमच्या शेतावर काम करणार्या पार्वतीमावशींच्या घरी गेले होते. पार्वतीमावशी तशी काळी, बुटकी, सुमार अंगकाठी त्यात काळ्या कुळकुळीत केसांना चोपडलेल्या तेलाला उन्हात काम करताना चेहर्यावर ओघळावे वाटायचे त्यामुळे एकदम तेलाची देवी दिसायची. हातात चमचम करणार्या बांगड्या, नाकात चमकी, कपाळावर दारू पिणार्या, दुसर्या बाईशी राजरोस संबंध ठेवणार्या नवर्याच्या नावाचे कपाळभर कुंकू, अंगावर बहुतेक हिरवी किंवा जांभळी किंवा गडद लाल अशा मळखाऊ रंगाची साडी. गळ्यात काळी पोत नि चार सोन्याचे मणी. अशा अवतारात कायम वावरणार्या पारवतीचं घर कसं असेल याची कल्पना करता येत नव्हती.
मला होम लोन ईएमआय चे २० वर्षाचे टेबल करायचे आहे. बँकेने दिलेले आहे पण त्यात त्यांनी interest change झाल्यावर जो EMI दाखवला आहे तसा माझा येत नाहि. Ineterest Rate Change झाल्यावर Tenure पण बदलतात का? मी केलेले टेबल खाली देत आहे आणि बँकेकडुन आलेले हि देत आहे माझे कुठे चुकते आहे कोणी सांगणार का?
मी केलेले टेबल

Int. Num. 6 मधे Int. Rate 8.75% झालाय.
Red Colour मधे बँकेने दिलेले रेट दिले आहेत.
माझे काय चुकते आहे. कोणी सांगेल का?
ह्या धाग्याच्या मूळ उद्देशात मी गृप बूकिंगसाठी लोक जमतात का हे पहायचं असं लिहिलं होतं..
पण काही प्रतिसादांमधे असे गृप ऑल्रेडी आहेत आणि त्यांना अनुभवही आहे असे प्रतिसाद आले - त्यांचं म्हणणं पटल्यानं आणि चर्चेचं मूळ स्वरूप हळूहळू बदलून "पुण्यातल्या चालू प्रोजेक्ट्सची/लोकेशन्सची माहिती/घर विकत घेताना लक्षात घ्यायच्या गोष्टी" - असं झाल्यानं माझं हे मुळच पोस्ट मी बदलतेय.
--- पुण्यात घर विकत घेऊ इच्छिणार्यांना शक्य ती माहिती मिळावी - म्हणून हा बाफ!
मी जेंव्हा केंव्हा भारतात परत जायचा विचार करतो तेंव्हा आणि तेंव्हा मला हाच प्रश्न भेडसावतो की नक्की आपण कुठे स्थित व्हायचे. कारण छोट्या शहरात नोकर्या मिळत नाही. आपल्याला हवी असलेली जीवनशैली लाभत नाही, आपल्या भविष्याचा विकास होत नाही, आपण मेहनतीने घेतलेल्या शिक्षणाचे चीज होत नाही! मग प्रश्न पडतो --- आपण मुंबईत की पुण्यात की दिल्लीत की बंगलोर की आणखी कुठल्या तरी मोठ्या शहरात स्तित व्हावे. मला इथे लहान शहरातून पुढे आलेल्या मुलामुलांची मते वाचायला आवडतील की त्यांना भविष्यात कुठे स्थिर व्हायचा आवडेल? आणि का? त्यांच्याचं शहरात का नाही... म्हणजे जेथून ती आलेली आहेत? धन्यवाद!
आता जवळ्पास सगळ्या मित्रांनी घर घेवुन झालय. प्रत्येकाचं बजेट कमीत कमी ४० ते ५० लाखाच आहे. (नवी मुंबई आणि पुणे). उरलेले पण आता शॉपिंग करताहेत. काहिजण एकटे कमावणारे तर थोडेफार दोघे कमावणारे... ५ ते ८ लाख डाउन पेमेंट आणि बाकि हप्ता.
मित्रांनो, ह्या मध्ये आपण सेफ्टी डोअर, इतर घरगुती उपकरणे, घरच्या माहितीची गुप्तता, घरात कामाला येणारे व बिल घ्यायला येणारे यांच्याशी कसे वागावे, वाहन असेल तर त्याची सुरक्षितता इत्यादी बद्दल चर्चा करूया. सिक्युरिटी गार्ड किंवा एजन्सी वगैरे इथे अपेक्षित नाही. आणि घर म्हणजे अगदी सदनिकेपासून ते बंगल्यापर्यंत अभिप्रेत आहे. चला कुणीतरी सुरवात करा बरं 