वॉलपेपर कि रंग … ?

Submitted by गुलाम चोर on 25 October, 2013 - 02:05

घराच्या भिंतींना वॉलपेपर लावावा कि रंग याबद्दल मनात संदेह निर्माण झालाय. दोन्हीचे आपापले काही फायदे आहेत आणि काही तोटे आहेत… टिकाऊपणा, देखणेपणा, ट्रेन्ड, परंपरा आणि खर्च या सगळ्याचा उहापोह डोक्यात सुरु आहे … पण कुछ समझ मे नही आ रे ला… क्या करे, क्या ना करे? असं झालय…..

मंडळी… जरा सांगाल का, काय करावं बरं ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्ही ठिकाणी पिगमेंटसच आहेत. रंगाचे दोन गुणधर्म चांगले असावेत. ओपॅसिटी म्हणजे आधीचा सरफेस झाकून टाकण्याची क्षमता आणि स्प्रेडिंग कपॅसिटी. रॉयल, स्पेशल इफेक्ट्स अश्या महाग
व फर्स्ट क्वालिटी लक्षरी इमल्शन चे हे दोन्ही गूण चांगले असतात. सेकंड क्वालिटी, डिस्टेंपर मध्ये कमी कमी होत जातात. रॉ मटेरिल वर आहे. प्रत्येक खोलीच्या आकारमानानुसार किती लिटर रंग लागेल ह्याचा एक फॉ र्म्युला वापरून अंदाज काढता येतो व पेंटरला रंग आणून देता येतो. काही भिंती जास्त प्रायमर व रंग पितात. बांधकामात जे सिमेंट व इतर वापरले आहे. क्युरिन्ग नीट झाले आहेका इत्यादीवर हे अवलंबून आहे. >>>>>>

ईतके टेक्निकल फंडे आणि शब्द ? मामी, कोटिंग/ पेंट ईंडस्ट्री शी संबधीत आहात का?

रच्याकने Theoretical spreading rate मधे किती टक्क्यांचा लॉस विचारात घेता ?

जर भिंतीला ओल नसेल, पपडी निघाली नसेल, जुना रंग बर्‍यापैकी चांगला असेत, भिंत स्मुथ असेल तर खूप घासत बसायची गरज नाही.
जुन्या रंगाचीच शेड परत लावायची असेल तर भिंत ओल्या कपड्याने स्वच्छ करून (जर तेलकट असेल काही ठिकाणी तर त्या थोडं घासून) सरळ प्रायमर न लावता सुद्धा रंग ( दोन कोट) लावला तर तो व्य्वस्थित बसतो.
यापेक्षा चांगला रिझल्ट हवा असेल तर जुन्या रंगावर एक चांगल्या क्वालिटीच्या प्रायमरचा कोट आणि एक रंगाचा कोट पण देता येतो. (यशिवाय याच प्रकारे प्रायमरमध्ये आपल्याला द्यायच्या असलेल्या एंगाची शेड मिक्स करुन प्रायमर लावून त्यावर एक कोट रंगाचा दिला तरी चालतो.) Happy

जुना रंग कोणत्या प्रकारचा (टेक्श्चर) आहे यावर पण सँडींग करायचं का? किती करायचं? का नुसतं साफ करायचं हे ठरतं. जर ग्लॉसी टेक्श्चर असेल तर थोडं घासलेलं बरं.

वापरानंतर रंगावर धुळ साचते, तेलकटपणा असतो. अशा सरफेसवर डायरेक्ट रंग लावणं योग्य नाही. रंग टिकणार नाही. फक्त याकरताच घासायचं असतं. Happy

जुन्या भिंती बद्दलः री पेंटिन्ग करताना वॉटर बेस्ड प्रायमर लावावा लागतो. कधी खरवडून काढावे लागते जेव्हा आधीचा रंग / भिंत खराब झाला असेल तर. वॉटर डॅमेज असेल तर. आधीचा रंग डार्क आणि नवी शेड लाइट असेल तर आधीचा रंग दिसून चालणार नाही. नव्या शेडचा इंपॅक्ट जाइल. प्रत्येक केस वेगळीच असते. जितक्या भिंती तितके प्रश्न वेग वेगळे असतात.

हे अर्थात हौसेने व शास्त्रीय पद्धतीने रंगविण्याचे आहे. इमल्शन पेंटबाबत. डिस्टेंपर वगैरे बजेट मामला आहे. ब्रश डुबाओ चालू हो जाओ. पण डिस्टेंपर वर ओइल पेंट म्हणजे भिंतीवर अन्याय आहे. शास्त्रानुसार ओईल पेन्ट इनॅमल रंग वॉल ला लावत नाहीत. मेटल व लाकडाला लावतात.
इमल्शन पेंट्स भिंतीसाठी. मला पण भिंती रंगवायला फार आवडते.

आणि एक, महाग रंग सिलेक्ट करण्या आधी पेंटरला त्याची भिंतीवर ट्रायल जरूर मागा. नाहीतर रंग शेड कार्ड वर छान दिसतो व प्रत्यक्षात वाइट. घरात प्रकाश किती ह्यावर भिंत कशी दिसणार ते ठरते.

एशिअन पेंटस हाउस मेकओवर वर्कशॉप्स घेतात. त्याला जाता येइल. त्यांचे रूमच्या कलरस्कीमचे बुकलेटही मिळते. मुलांच्या खोलीच्या छताला तार्‍यांचा इफेक्ट देता येतो - अगदी बारकी स्व् प्नाळू मुले असतील तर खर्च करयला हरकत नाही. टीनएजर्स च्या रूमला कलर त्यांना विचारूनच पक्का करा नाहीतर नंतर रोज कट्कट करतात.

काही पेंटर्स व्हाइट रंग आणून टिंट्स मिसळून युनिक शेड्स करतात. त्याला जबरी अनु भव आवश्यक आहे. व्हाइट पेंट्स इतर शेड पेक्षा पर लिटर हिशोबाने महाग असतात. व्हाइट न लावल्यास पैसे बचेंगे.

अश्विनीमामी,
खूप छान माहिती दिलीत. मलाही हॉलमधल्या एका भिंतीला(टीव्ही च्या मागे) वॉलपेपर की हायलाईट करणारा रंग असा प्रश्न पडला होता.वरचे वाचून इमल्शन पेंटस द्यायचा हे ठरवले आहे. अश्विनीमामी, बाकीच्या ३ भिंती फिक्कट क्रीम रंगाच्या असतील तर या भिंतीला कुठला कलर द्यावा ? मस्टर्ड केशरट कसा वाटेल ?
गुलाम चोर धाग्याबद्दल धन्यवाद.

ते ही नव्या घरात एक पावसाळा होऊन गेल्यावर मगच महाग रंग लावावा. >>हे खरंय. नव्या घरात बिना रंगाचं शिफ्ट व्हायला आवडत असेल तर चुना वैगरे न लावता चांगल्या क्वालिटीचा प्रायमर लावावा. प्रायमर मध्ये रंगाची ट्य्ब म्सळून हवा तो शेड तयार करता येतो. तश्या प्रायमर लावला की नंतर वर्ष -दीड वर्षानी अ‍ॅक्चुअल रंग लावताना सोप्पं पडतं

माशा, एक बर्न्ट सिएना नावाची शेड असते ती बघा. किंवा केशरी मध्ये थोडा चॉकोलेटी मिक्स. फोकस वॉल वर तुम्ही काय शोपीस लावनार? जर एखादे पेंटिंग असेल तर त्याला शोभेल असा वॉलचा कलर हवा. किंवा शिल्प, लाकूड काम असेल तर वरील कलर मस्त दिसतील. वॉल ट्रीट मेंट पण उपलब्ध असतात त्याचाही विचार करता येइल म्हणजे वॉल ला थोडे टेक्स्चर देतात रंगवताना.
त्यावर चित्र फोटो पोस्टर चांगले दिसेल. पूर्ण डिझाइन्ड खोली आधी मनात उभारून बघा. मग त्याप्र माणे निर्नय घ्या. तुमच्या पार्ट्नरचा, मुलांचा विचार अवश्य घ्या. घरातल्या रंगांचा मनःस्थितीवर परिणाम होतो त्यामुळे सुख शांती नांदेल असे सुरेख कलर सर्वांच्या विचाराने घ्या.
विरुद्ध असे पोपटी/निळे कलर पण सुरेख दिसतील.

अमा धन्यवाद.
बर्न्ट सिएना शेड आत्ताच गुगलून बघितली.छानच आहे.
फोकस वॉल वर मध्ये टीवी व टीवीच्या कडेने __I अशा शेपचे लाकडी वॉल युनिट ( टीव्हीच्या खाली आडवा रनर व त्याला लागून उभे वॉल युनिट आहे.)

सर्व घराला लावण्यापेक्षा १ भिंत , t v unit च्या मागे असा लावा. मस्त दिसतो.
ज्या भिंती जवळून वावर खूप आहे तिथे नका लावू कारण कोपरे घासले जावून लवकर फाटतो.
१ च भिंत करणार असाल तर plain पेक्षा textured लावा.खूप वेगवेगळे texture मिळतात .अगदी कापड , दगडी, लाकडी फील देणारे सुद्धा मिळतात.
वापरून उरलेला पेपर ठेवून द्या. नंतर उपयोगी पडतो.
मोठ्या दुकानात जाण्यापेक्षा होलसेल मार्केट मध्ये पण जावून या. सेम पेपर मध्ये खूप फरक पडू शकतो.
I always prefer wall paper for high lighting . Same texture in colouring costs too much. Textured wall with a single mirror on it gives beautiful effect.

टीनएजर्स च्या रूमला कलर त्यांना विचारूनच पक्का करा नाहीतर नंतर रोज कट्कट करतात. - अगदी स्वानुभव आहे.टीन एज च्या सुरवातीला एक पेपर लावला होता १-२ वर्षात आवड एव्हडी बदलली की पेपर फाडून काढला आहे आम्ही. अडनिड्या वयाच्या मुलाच्या खोलीवर जास्त खर्च करू नका.

भारतात मिळतात की नाही माहिती नाही , पण इथे चॉक बोर्ड पेंट मिळतात - भिंतीला दोन कोट लावले की ती भिंत फळ्यासारखी वापरता येते. तसले जर मिळत असतील अन मुलं लहान असतील तर अवश्य विचार करावा.
इथे काळा, ग्रे, गडद हिरवा, चॉकलेटी , अन शिवाय आठ दहा शेड्समधे असे रंग मिळतात.

ड्राय इरेझ मार्कर्स ने लिहिण्याजोगे वॉलपेपर्स पण मिळतात. मोठी मुले असतील, घरातून काम करणे होत असेल तर असे वॉलपेपर्स सुद्धा विचारात घेऊन शकता.

फार उत्साह असेल तर छोट्या ( ४-६-७ इन्च) फोटो फ्रेमची चित्रे असलेले वॉलपेपर्स मिळतात. ते लावून प्रत्येक फ्रेम मधे घरच्या लोकांचे फोटो लावता येतील . या खालच्या लिंका पहा

http://www.amazon.com/Graham-Brown-52050-Frames-Wallpaper/dp/B002WGIKH0
http://www.houzz.com/picture-frame-wallpaper

मेधा
चॉकबोर्ड बद्दल +१
माझ्या घरात मी कन्येसाठी केला होता. पूर्ण भिंत नाही, पण व्यवस्स्थित ३x५ फुटाचा चौकोन. तिने ५वी पासून ११वी पर्यंत वापरला. मग व्हाईटबोर्ड दिला करून.
खूऽपच उपयोगी गोष्ट आहे.

भारतात मिळतात की नाही माहिती नाही , पण इथे चॉक बोर्ड पेंट मिळतात - भिंतीला दोन कोट लावले की ती भिंत फळ्यासारखी वापरता येते. >>> माझ्या शाळकरी वयात आईने भींतीच्या एक कोपर्यात साधारण ४*६ चा चौकोन काळ्या रंगाने रंगवून घेतला होता. तो आम्ही फळ्यासारखा वापरायचो.

आम्ही तर मुलाच्या रूम मध्ये
१ भिंत ८ *६ चा सोफ्ट बोर्ड लावला आहे. हव ते लावा त्यावर
१ भिंती वर व्हाईटबोर्ड अंदाजे ८*६ लावला आहे

संपूर्ण घराला वॉलपेपर का बरे लावू नये? आम्ही विचार करत आहोत रंगाऐवजी वॉलपेपर लावण्याचा (रीसेलचं घर आहे - १० वर्ष जुनं - डिस्टेंपर आहे सध्या. रहायला जायच्या आधी पेंटिंग किंवा वॉलपेपर लावून घ्यायचा विचार आहे). इथे शोधल्यावर हा धागा मिळाला. वॉलपेपर लावणं लवकर होईल शिवाय रंग लावण्यापेक्षा जरा वेगळं काहीतरी ट्राय करावं असं वाटतय.