शेअर सर्टीफिकेट

Submitted by झंपी on 1 January, 2014 - 11:58

१)भारतातील स्वतःच्य घराचे शेअर सर्टीफिकेट हरवले असेल तर नक्की काय प्रोसेस आहे?

२)कोणी सांगेल का की ह्यात किती वेळ जाइल?

३)घर जर दुसर्‍या कोणाच्या नावावर करायचे असेल तर शेअर सर्टीफिकेटची गरज लागेल ना?

(प्लीज अंदाजे माहिती नको. तशी बरीच उलटी सुलटी माहीती मिळालीय.)

पन लवकरात लवकर सर्टीफिकेट मिळवायचे असेल तर काय करावे ते सांगा.

आधीच धन्यवाद.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वतःच्य घराचे शेअर सर्टीफिकेट हरवले असेल तर सोसायटीला लेटर देऊन डुप्लिकेट शेअर सर्टीफिकेट मिळू शकते.
फारतर पोलीसांमधे सर्टीफिकेट हरवल्याबद्द्ल कम्प्लेंट करायला सांगतील.
घर जर दुसर्‍या कोणाच्या नावावर करायचे असेल तर शेअर सर्टीफिकेटची गरज लागणारच.

.

.

to get duplicate share certificate Nc is must. U also hv to give ad in paper that your share cert is lost. affidavit that you have really lost the original and have not taken loan against it, undertaking that you will return the first share cert to society in case you find that. - all must

Days to get new certi is minimum 15 days after u produce adv in newspaper abt loss of share cert to society along with affidavit, undertaking

Giving u duplicate share cert is upto society, if they feel there is cheating or fraud they may deny also.

Authentic info as hubby works as society secretary. however also ask ur society as they may have added some more clauses.

घर जर दुसर्‍या कोणाच्या नावावर करायचे असेल तर शेअर सर्टीफिकेटची गरज लागेल ना?>> हो .
त्याच सर्टिफिकेट वर मागच्या बाजुला जागा असते तिथे नवीन मालकांची नावं लावतात.

१)भारतातील स्वतःच्य घराचे शेअर सर्टीफिकेट हरवले असेल तर नक्की काय प्रोसेस आहे?>>> ताबडतोब पोलिसांत तक्रार करून सर्टिफिकेट हरवल्याचे तपशील (जागा, वेळ इत्यादी ते विचारतील त्याप्रमाणे) द्यावे लागतात, तसेच स्थानिक वृत्तपत्रामधे शेअर सर्टिफिकेट हरवल्याची जाहिरात द्यावी लागते. ह्या दोन्हीच्या प्रती सोसायटीकडे सादर कराव्या लागतात. तक्रार केल्यामुळे मूळ सर्टिफिकेट मिळण्याची शक्यता असल्याने मधे काही कालावधी जाऊ द्यावा लागतो. त्यानंतर सोसायटीच्या एजीएममधे ठराव पास करून सर्व सदस्यांची संमती घेऊन डुप्लिकेट सर्टिफिकेट दिले जाते.

याविषयीची अधिक तपशीलांत आणि कायदेशीर माहिती मायबोलीकर मुग्धानंद देऊ शकतील.

आमच्या सोसायटीत डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेटसाठी एजीएममधे ठराव पास करावा लागत नाही. मॅनेजिंग कमिटीच निर्णय घेते. तसेच कोणतेही डुप्लिकेट डॉक्युमेंट इश्यु करण्यासाठी अ‍ॅफिडेव्हिट लागतेच.

ट्रान्स्फरसाठी मात्र एजीममध्ये ठराव पास करावा लागतो. अगदी मृत सभासदाच्या नॉमिनीच्या नावे ट्रान्स्फर असले तरी.
मॉडेल बाय-लॉज अनुसार पोलिस कंप्लेंट+ अ‍ॅफिडेव्हिट पुरेसे आहेत.
http://sahakarayukta.maharashtra.gov.in/SITE/PDF/Rules_Acts_Bylaws/Model...
पान ८ नियम ९ब.
The committee of the society shall issue a duplicate
share certificate, on application, to its members on production of following documents
-
1 . If the share certificate is lost – the copy of Police Complaint lodged and affidavit.
2 If the share Certificate soiled/ burnt/ torn / misfigured etc - affidavit along with the original share certificate.

खूप धन्यवाद सर्वांना. खूपच मदत होइल.

(हे इथे तिथे सामान मूव करायच्या धांदलीत कुठे गेले देवास ठावूक.. आणि आता हा उप्द्व्याप).