राजकारण

तरुण मतदार, अपेक्षा आणि सत्यस्थिती!

Submitted by कौस्तुभ बंकापुरे on 15 April, 2014 - 00:09

हा लेख लिहिण्याचे कारण म्हणजे गेले काही दिवस निवडणुकीच्या निमित्ताने विविध गोष्टी बघायला मिळत आहेत. विविध प्रकारचे, विचाराचे लेख समोर येत आहेत. विनोदी, मार्मिक आणि अगदी गालीच्छ sms पण येत आहेत. या सगळ्यामध्ये 'तरुण मतदार' हा एक विशेष भाग आहे. 'हा तरुण मतदार यंदाच्या निवडणुकीचे चित्र बदलणार' वगैरे घोषणा होत आहेत. चित्र बदलेलही कदाचित पण तरुण मतदाराच्या मनात नक्की काय चाललंय?

काय घडतंय मुस्लिम देशांत? भाग ४ इस्लामिक कायदा - काही विचार

Submitted by शबाना on 14 April, 2014 - 17:37

या आधीचे मायबोलीवर प्रकाशित झालेले लेखांचे दुवे इथे क्रमाने दिले आहेत.

http://www.maayboli.com/node/48375
http://www.maayboli.com/node/48417
http://www.maayboli.com/node/48419
http://www.maayboli.com/node/48436


इस्लामिक कायदा - काही विचार

काय घडतंय मुस्लिम जगात? भाग २- मुस्लिम राजवटींचा संक्षिप्त इतिहास आणि आधुनिकता

Submitted by शबाना on 6 April, 2014 - 17:27

नमनाला घडाभर तेल घालून झाले आहेच आता पुढील विषयाकडे वळूयात.

या आधीचे मायबोलीवर प्रकाशित झालेले लेखांचे दुवे इथे क्रमाने दिले आहेत.

http://www.maayboli.com/node/48375
http://www.maayboli.com/node/48417

मुस्लिम राजवटींचा संक्षिप्त इतिहास

काय घडतंय मुस्लिम देशांत? प्रस्तावनेचा समारोप -

Submitted by शबाना on 6 April, 2014 - 14:39

या आधीचे मायबोलीवर प्रकाशित झालेले लेखांचे दुवे इथे क्रमाने दिले आहेत.

http://www.maayboli.com/node/48375

सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. उत्तर इतके मोठे झाले की नवीन पोस्टच लिहिली गेली.

काय घडतंय मुस्लिम जगात? लेखमाला -१ प्रस्तावना

Submitted by शबाना on 3 April, 2014 - 09:37

या प्रस्तावनेवर आणखी पुढे लिहिले गेले. हा दुवा वाचल्यावर हा दुवा ही वाचावा

http://www.maayboli.com/node/48417

प्रस्तावना

शब्दखुणा: 

उद्धरली कोटी कुळे.....

Submitted by शबाना on 3 April, 2014 - 08:29

उद्धरली कोटी कुळे.....

( तीन वर्षाआधी लिहिलेला हा लेख आज पुन्हा सापडला . इथे पोस्ट करते आहे. खरं १४ एप्रिलला करणार होते पण तेव्हा प्रवासात असेन आणि भारतात आणि भारतीयांच्या मनात पण फार रणधुमाळी असणार आहे १० तारखेनंतर -- त्यामुळे आजच टाकते. )

नेहमीप्रमाणे आज सकाळी मेल बॉक्स उघडला. कोणाचे काय स्टेटस अपडेट्स बघत होते--महेश च्या नावाखाली मराठीत ---उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे!

हं, आज १४ एप्रिल, आंबेडकर जयंती!

आधुनिकता आणि मुस्लिम राष्ट्रे

Submitted by शबाना on 2 April, 2014 - 09:58

काय घडतंय मुस्लिम देशांत -- या आगामी लेख मालिकेतून.

आधुनिकता म्हणजे नक्की काय?

काळा घोडा

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 27 March, 2014 - 07:25

आधी Dark Horse ही काय संकल्पना आहे ते ठाऊक नसणार्‍यांकरिता:- घोड्यांच्या शर्यती प्रेक्षक दुरून पाहत असता त्यांना काही घोडे विजयाच्या टप्प्यात आल्यासारखे आढळतात. त्यांच्यापैकीच एखादा विजयी होणार यावर ते अंदाज बांधून पैजदेखील घेतात. असे चर्चेत असणारे किमान पाच सहा घोडे असतात आणि बहुतेकवेळा त्यापैकीच एखादा विजयी होतो. कधी कधी मात्र या चर्चेत नसणारा एखादा घोडा विजयी होतो. हा घोडा अचानक कुठून येतो? सुरुवातीपासून तो कधीच पहिल्या पाचात नसताना अचानक एकदम मागून पुढे येतो का? तर तसे नाही.

विषय: 

आणि धर्मराज युधिष्ठिरानेही अधर्माचीच साथ दिली

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 27 March, 2014 - 01:27

२००९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांमध्ये कॊंग्रेसने मिळविलेल्या यशाला पंतप्रधानांनी केलेले मतदारांचे ब्लॆकमेलिंग कारणीभूत?

अंतर्गत लाथाळ्यांनी त्रस्त झालेल्या कॊंग्रेस - राष्ट्रवादी कॊंग्रेसला आपण पुन्हा निवडून येऊ शकू का ही चिंता सतावत होती पण ऒक्टोबर २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये महाराष्ट्रात या आघाडीत गेल्या वीस वर्षात मिळाल्या नाहीत इतक्या भरघोस जागा मिळविल्या आणि पुढच्या पाच वर्षांकरिता एका अतिशय स्थिर सरकारची स्थापना झाली पण त्यांच्या यशामागचे रहस्य तसे दुर्लक्षितच राहिले.

शाई

Submitted by नितीनचंद्र on 27 March, 2014 - 00:10

मुंबईच्या माथाडी कामगारांच्या मेळाव्यात उडालेली शाई वाळायला कदाचित वेळ लागेल पण शाईचे डाग रहाणार हे नक्की. शाई बरोबर बोगस मतदानाचे अनेक हुकमी डाव आज प्रचलीत आहेत्. आज हेड्मास्तर चुकुन काही बोलले असे समजण्याचे कारण नाही हे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला माहित आहे.

ते चुकुन बोलले, चेष्टेच्या सुरात बोलले हे निवडणुक आयोगाला पटेल कारण निवडणुक आयोगात माणसेच असतात आणि ती माणसे कधी कधी चुकलेली असतात याचा पंचनामा हेडमास्तरांनी आधीच करुन ठेवलेला असतो.

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - राजकारण