शाई

Submitted by नितीनचंद्र on 27 March, 2014 - 00:10

मुंबईच्या माथाडी कामगारांच्या मेळाव्यात उडालेली शाई वाळायला कदाचित वेळ लागेल पण शाईचे डाग रहाणार हे नक्की. शाई बरोबर बोगस मतदानाचे अनेक हुकमी डाव आज प्रचलीत आहेत्. आज हेड्मास्तर चुकुन काही बोलले असे समजण्याचे कारण नाही हे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला माहित आहे.

ते चुकुन बोलले, चेष्टेच्या सुरात बोलले हे निवडणुक आयोगाला पटेल कारण निवडणुक आयोगात माणसेच असतात आणि ती माणसे कधी कधी चुकलेली असतात याचा पंचनामा हेडमास्तरांनी आधीच करुन ठेवलेला असतो.

पुर्वी जेव्हा मतदान कागदाच्या मतपत्रीकेवर केल जायच तेव्हा मतपत्रीकेच्याच आकाराचर, रंगाचा आणि तश्याच घड्या घातलेला एक कागद खिशातुन नेला जायचा आणि त्याच्या बदल्यात अधिकृत मतपत्रीका बाहेर आणुन त्यावर हव्या त्या उमेदवाराच्या चिन्हावर शिक्का मारुन पुन्हा दुसर्‍या मतदाराच्या हातात दिली जायची. हा मतदार मतदान के़द्राच्या बाहेर शिक्का मारलेली मतपत्रीका मतपेटीत टाकायचा व त्याला मिळालेली कोरी मतपत्रीका मतदान केंद्राच्या बाहेर पक्षाच्या/उमेदवाराच्या कार्यकर्त्याकडे आणुन द्यायचा. अर्थातच यासाठी काही नोटा मतदाराला मिळत.

ही बोगस मतदानाची पध्दत ग्रामपंचायत/ पंचायत समिती/ नगरपालिका/महानगर पालिका यात अतिशय पॉप्युलर होती. महापौर/ स्थायी समितीच्या निवडणुकात तर जास्तच प्रसिध्द होती.

पुढे सार्वजनिक निवडणुकात मतपत्रीकाच्या ऐवजी इलेट्रॉनिक मशिन आल्यावर ही पध्दत बंद पडली.

जर एखाद्या नेत्याला खात्रीने निवडुन आणायचा असेल तर मतदारांच्या मनात निरुत्साह असताना ते मतदानाला बाहेरच पडलेले नसताना आणि प्रबळ विरोधी पक्षाचा/नेत्याचा किंवा उमेदवाराचा अभाव असताना ग्रामीण भागात मतदानाच्या दिवशी शेवटच्या तासात जो चमत्कार घडतो त्यात सरकारी सेवकांची फळी उभारुन मतांचा पाऊस पाडुन विक्रमी मतांनी निवडुन येण्याचा प्रकार बिहार मध्ये नाही तर खास करुन पश्चिम महाराष्ट्राला नविन नाही.

बाकी इलेट्रॉनीक मतदान यंत्राला रिमोटच्या सहायाने मतांची अदलाबदली करण्याचा आरोप केला जातो हा तांत्रीक बाबींचा विचार करता खरा नाही.

या ऐवजी एक वेगळाच प्रकार रुढ असावा.मतदानाच्या सुरवातीला इलेट्रॉनीक मतदान यंत्र बरोबर चालते आहे किंवा नाही याचे प्रात्यक्षिक करुन दाखवले जाते. एकदा सर्व पक्षाच्या प्रतिनीधींची खात्री झाली म्हणजे रिसेट चे बटन दाबुन काउंटर शुन्य आहे असे दाखवले जाते. मग मशिनच्या काऊंटर झाकला जातो. पण रिसेटचे बटन आतच अडकवुन ठेवले जाते. दिवसाच्या शेवटी अपेक्षीत मतदान रिसेटचे बटन मोकळे करुन केले जाते व मग मशिन सील होते. अर्थातच हा प्रकार सरकारी सेवकांना आपलेसे करुनच केला जातो. बर्‍याच वेळा ग्रामिण भागात विरोधी पक्षाचे प्रतिनीधी सुध्दा विकले जातात.

२००४ च्या निवडणुकीत केंद्र सरकारच्या नोकरीत असलेल्या सेवकांना गाफिल ठेउन हा प्रकार घडला. विषेश म्हणजे हे कर्मचारी प्रथमच या कामाला खेड्यापाड्यात पाठवले होते.

एक ना दोन आणखीही प्रकार पुढे येतील. ज्या पध्दतीने दोनदा शाई लावायचे विधान केले गेले यावरुन शेषनसाहेबांच्या काळात जी जरब होती ती आता राहिली नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.