देणं सीझन २ – भाग ४

Submitted by jpradnya on 12 April, 2020 - 08:30

देणं सीझन २ – भाग १
https://www.maayboli.com/node/73996
देणं सीझन २ – भाग २
https://www.maayboli.com/node/74043
देणं सीझन २ – भाग 3
https://www.maayboli.com/node/74080

आता पुढे..
देणं सीझन २ – भाग ४
शिलथॉर्नच्या माथ्यावर दिमाखात उभारलेल्या पिझ् ग्लोरिया मध्ये पाऊल टाकताच दीप्ती हरखली. तशी ती स्वित्झर्लंड मध्ये आल्या पासून ठायी ठायी हरखतच होती. भारताबाहेर तिची पहिलीच वेळ असल्याने वरून कितीही कूल असण्याचा आव आणला तरीही परदेश प्रवास करणाऱ्या प्रत्येक पहीलटकर भारतीया प्रमाणे दीप्ती सुद्धा अंमळ बावरलीच होती. त्यातून तिने भारताव्यतिरिक्त पदस्पर्श केलेली पहिली भूमी म्हणजे स्वित्झर्लंड... जे इतर कोणत्याही देशाच्या तोंडात मारणारी स्वच्छता आणि सौंदर्याने मुसमुसलेलं आहे. त्यामुळे अजी म्या स्वर्ग पाहिले अशीच अवस्था दीप्तीची झाली होती. हावरटासारखे फोटो घेऊन तिच्या डिजीकॅम (त्यावेळी स्मार्ट फोनस् ने कॅमेराला रीप्लेस केलेलं नव्हतं अजून) ची मेमरी ४ दिवसांतच फुल्ल झाली होती. शिलथॉर्न च्या माथ्यापाऱ्यांत नेणाऱ्या केबल कार मध्ये दीप्ती ने किमान दहा वेळा तरी आपली जागा म्हणजे खिडकी बदलली होती. आपल्या बरोबर यश आहे ही सुद्धा ती विसरून गेली असावी. तिचं हे भाबडं रूप एकदम सीझन्ड ट्रॅवलर असलेल्या यशला नवीन होतं. तो एखाद्या बॉडी गार्ड सारखा कोणताही प्रश्न न विचारत तिच्या मागे मागे फिरत होता. तिला वाटणाऱ्या अप्रूपाचं त्याला अप्रूप वाटत होतं. आणि कुठेतरी आकर्षण ही !
“अनफॉर्चुनेटली देअर इज नो सीटीन्ग अव्हेलेबल बाय द विंडो सर. बट यू आर वेल्कम टु ऑकयुपाय द टेबल नियर द सेंट्रल बॅन्ड ..” हेल्पडेस्क वरील मदतनिसाने सुचवले पण दीप्ती कसली ऐकणारी
“त्याला सांग नानाची टांग! रिवॉलवींग रेस्टॉरंट मध्ये काय बॅन्ड बघायला आलोय आपण? “
“पण तिथूनही दिसतंच ना बाहेरचं...” यशला भूक लागायला लागली होती
“पण विंडोसीट सारखा व्यू नाही दिसत यशम्हात्रे “ ट्रीप ची सुरुवात झाल्या पासून दीप्ती यशला यशम्हात्रे ह्याच टोपण नावाने संबोधत होती आणि त्याला त्याने विरोध दर्शवून सुद्धा तिने तेच संबोधन कंटिन्यू केलं होतं
“ आरे ही काय ट्रेन आहे विंडो सीट साठी भांडायला”
“तू कधी रे बसला आहेस ट्रेन मध्ये की तुला विंडो सीटचं महत्त्व कळलंय”
“यू आर फोरगेट्टिंग डार्लिंग दॅट ईव्हन आय अॅम ए मुंबई बॉय ... ”
“अँड स्टिल यू आर गिविंग अप ऑन द प्रीमियम व्यू. तू थांब इथेच मी जरा बघून येते”
ही ‘नेमकं काय’ बघून येणार आहे हे तो विचारायच्या आत दीप्ती ‘ते’ बघायला पुढे गेली सुद्धा होती जाताना मागे वळून तिने त्याला तेवढ्यात सुनावलंच
“ अँड डोन्ट कॉल मी डार्लिंग “
“आता तर हिला डार्लिंग च म्हणणार.. मला “यशम्हात्रे” म्हणते काय.. तोंड वेंगाडत यश पुटपुटला आणि त्याने आसपास बघितले
देशोदेशीच्या टूरिसट्स नी भरलेले भले मोठे रेसटॉरंट. तऱ्हेतऱ्हेचे कॉन्टिनेन्टल फूड सर्व करणारया वेटर्सची लगबग. काटे-चमच्यांची अन् ग्लासांची किणकिण. हास्यविनोद, गप्पा गोष्टींचा गजबजाट , रेस्टॉरंटचा मध्यवर्ती आधारस्तंभ वेगवेगळ्या निसर्गचित्रांनी मढवलेला आणि पलिकडची बाजू लपवणारा, लाईव बॅन्ड वर वाजणारे कंट्री म्युझिक, आणि तिथेच समोरच्या छोट्याश्या मोकळ्या जागेत संगीताच्या तालावर उत्स्फूर्त पणे नाचणारी तरुण थोर जोडपी! यश ची तबियत खूश झाली एकदम! फ्रेंच पर्फ्यूमस्, इटालियन स्पायसेस, बेकरीत नुकताच जन्मलेले खरपूस खमंग जर्मन बागेत् अन त्यावर वितळलेले स्विस चीझ असे आसमंतात दरवळलेले नानाविध वास घेऊन यश ची रसना आता पुरती चाळवली होती पण दीप्ती चा काही पत्ताच नव्हता. जरा वैतागूनच त्याने पुन्हा नजरेने तिचा शोध घेतला तेव्हा ती मागच्या बाजूने धापा टाकताच येऊन पोचली.
“चल लवकर “ त्याला हाताला धरून जवळ जवळ ओढत दीप्ती म्हणाली “टेबल मिळालं आपल्याला पण लवकर गेलो नाही तर क्लेम जाईल”
“क्लेम?” यश ला काही कळेना पण तो पटापटा तिच्या मागे चालू लागला
“ सांगते गंमत. एका अमेरिकन कपल मी नुकताच रिकामं झालेलं टेबल धरून बसवलंय आपल्यासाठी.”
“आर यू किडीन्ग मी? ट्रेन ची स्ट्रॅटजी वापरलीस तू इथे ?”
“मग काय. स्ट्रॅटजी स्ट्रॅटजी होती है. काही पे भी इस्तेमाल करो! “
पार दुसऱ्या टोकाला असलेल्या टेबलावर ते बिचारे अमेरिकन आज्जी आजोबा गोंधळलेल्या चेहेऱ्याने बसून होते. दीप्ती आल्यावर त्यांना हायसं वाटलं. टेबल धरणे, रुमाल टाकणे वगरे रिजर्वेशन च्या पद्धती खास भारतीय असल्यामुळे त्या अमेरिकन जोडप्याला आपण नक्की काय करतो आहोत ही सुद्धा कळलं नव्हतं. परंतु दीप्ती ने त्यांनाल पटवलं होतं खास !
“हाहाहा यू आर टू मच दीप्ती दीक्षित. तू आयटम आहेस आयटम ! “
“थॅंक यू सो वेरी मच मिस्टर अँड मिसेस फिशर! “ तिने त्यांचं परिचय सुद्धा करून घेतला होता तेवढ्यात !
“शुअर डियर ! एंजॉय यॉर हनीमून! “ असं मिश्किलपणे म्हणत ते दोघे निघून गेले आणि यशची भुवई आपसूक वर गेली !
“हनीमून हां!”
“इंडियन कपल्स इथे हनीमून लाच येतात माहित होतं त्यांना. आणि ह्या प्राइम टेबल साठी इतना झूठ तो बनता है ना... जस्ट लुक अॅट द यूनियन यंु ग फ्राऊ अँड आयगर...असा व्यू मिळाला असता तुला..?” खिडकीबाहेरच्या देखाव्यात हरवलेल्या दीप्तीला यश तिच्या कडे टक लावून बघतो आहे ह्याचं ही भान नव्हतं
आणि दीप्तीच्या चहेऱ्यात हरवलेल्या यशला वेटर शेजारी येऊन उभा राहिला आहे ह्याचं भान नव्हतं
|| क्रमशः ||

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

@सायो - करेक्शन डन
@ वावे - माझ्या अल्पशक्ती नुसार जमेल तसं लिहिते झालं. पण मलाही जाणवलं आहे की भाग छोटे होताहेत. पुढील भागात जास्त मॅटर आणण्याचा प्रयत्न करते .
प्रतिक्रिया आणि उत्तेजनासाठी पुनः पुन्हा धन्यवाद सगळ्यांना

Nice

मस्त Happy
Next time थोडा मोठा भाग प्लीज !!