शोभाताईंनी अनुला बळेच उठवून बसवलं तशी मघापासून खुसुखुसु हसणार्या मुग्धाला त्याने तोंडावर बोट ठेवून गप्प बसायला सांगितले. पण नीलू आणि मुग्धा अधिकच हसायला लागल्या. आता मात्र अनु चिडला. पण सर्वांसमोर त्याला काही बोलता येईना. तसा त्याने मोर्चा त्याच्या सुमाक्का कडे वळवला-
"जेवायला मिळणार आहे का आज?"
त्याच्या प्रश्नाने गडबडून उठली सुमा.
"अगं बाई, हो हो" म्हणाणार्या सुमाला नीलुने पुढे होऊन खाली बसवलं.
"रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाहीये तुमच्या. मी आणि मुग्धा बघतो काय ते. तुम्ही बसा", अशी ताकीद देत ती आणि मुग्धा कामाला लागल्या.
एक १० -१२ वर्षांची चिमुरडी. प्राण्यापक्षांची तिला खूप आवड. घरात एक गोजिरवाणे कुत्रे, एक छोटसं मांजराचं पिल्लू आणि सतत वटवट करणारा एक बोलका राघू. या सगळ्यांनी तिचं आयुष्य अगदी व्यापून टाकलेलं. हे मुके जीव तिच्या लहानश्या विश्वाचा अविभाज्य भाग होते. अशातच तिचा तो प्राणप्रिय मोत्या कुत्रा आजारी पडला. काही खाईना-पिईना, सतत मलूल असा पडून राहायचा. ती शाळेला जाताना तिच्या अंगावर उड्या मारून, "मला पण घेऊन चल" असे मुक्याने विनवणारा मोत्या तिला जाताना पाहून फक्त मान वर करून परत मरगळून झोपू लागला.
'कागद? कुठले कागद रे? मला नाही माहित'
सुमाच्या चेहर्यावरचे प्रश्नार्थक भाव पाहिल्याबरोबर तीरासारखा उठला अनु. जवळ जवळ उडी मारून तो काॅटखाली आणि आजुबाजूला शोधू लागला. कोनाड्यात, दप्तरात, काॅटच्या वर, चादरीखाली शोध शोध शोधलं. सर्वांनी त्याला थांबवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
अनु इरेला पेटून काॅटखाली शिरला शोधायला. परत काही सापडलं नाही म्हणून तो दातओठ खात बाहेर यायच्या प्रयत्नात कुठल्याश्या टोकाला अडकून त्याचा खिसा फाटला. त्यातून भाजलेले शेंगदाणे बाहेर पडायला आणि जयंत आत यायला एकच गाठ पडली! सगळे जण ते पाहून हसायला लागले.
"कसलं आकर्षण वाटतं गं तुला त्या कपड्यांचं?" आईकडे मी दुर्लक्ष केलं. बग्गीकडे कुतूहलाने बघणार्या डोळ्यांकडे एक नजर टाकली पण मला त्या नजरांची आता सवय झाली होती. कुतूहल, आश्चर्य आणि कधीकधी आकर्षणही त्या नजरांमध्ये मी पाहिलं होतं. फारसा बदल यात कधी झाला नव्हता पण आम्हाला बघायला येणार्या लोकांचा पोषाख बघायला मला फार आवडतं. रंगीबेरंगी बाह्यांचे, बिनबाह्यांचे शर्ट, फ्रॉक, जिन्स, स्कर्ट, किती प्रकार. काळ्याभोर डांबरी रस्त्यावर बग्गीत बसलेली मी आणि केवळ आम्हाला बघायला आलेले पर्यटक म्हणजे रस्त्यावर फुललेली रंगाची बाग वाटत राहते ती, कपड्यांमुळे.
मयसभेच्या पायरीवर तो उंचापुरा, बलदंड राजपुरुष उभा होता. आजुबाजुला सेवक प्रणाम करून जात होते. पण त्याचे त्यांच्याकडे लक्ष नव्हते. तो आपल्याच विचारांमध्ये व्यग्र होता. प्रतिपक्षाने काही वर्षातच प्रचंड प्रगती केली होती. राजसूय यज्ञ केला होता. ती आपलीच भावंड असली तरी पुढे केव्हातरी त्यांचा आपल्याशी संघर्ष होणार हे त्याला कळून चुकले होते. त्याने गदा हातात पेलली. ती हातात असली की कसलेच भय नव्हते. जगात कुणीही गदायुद्धात त्याला हरवू शकणार नव्हते. हे सारं वैभव मूळात आपलं आहे हा नेहेमीचा विचार त्याच्या मनात आला. आपला पिता अंध निपजला त्यात आपला काय दोष?