देणं - भाग ८

Submitted by jpradnya on 3 May, 2020 - 06:00

देणं सीझन २ – भाग १
https://www.maayboli.com/node/73996
देणं सीझन २ – भाग २
https://www.maayboli.com/node/74043
देणं सीझन २ – भाग 3
https://www.maayboli.com/node/74080
देणं सीझन २ – भाग ४
https://www.maayboli.com/node/74117
देणं सीझन २ – भाग ५
https://www.maayboli.com/node/74153
देणं सीझन २ – भाग ६
https://www.maayboli.com/node/74194
देणं सीझन २ – भाग ७
https://www.maayboli.com/node/74308

आता पुढे..
यश खरंतर शनिवारीच परतला होता पण दीप्ती सोमवारी येते म्हणाली. रविवारी जरा अनिच्छेनेच यश ने तिला फोन करणे टाळले. काहीतरी घाटतंय ह्याची त्याला कल्पना आली होती पण जास्त स्पेकयूलेट न करता तो शरलॉकशी खेळत शांतपणे सोमवारची वाट पहात बसला.
ठरल्याप्रमाणे बरोबर ११ वाजता इंटरकॉम वरून त्याला दीप्ती आल्याची वर्दी मिळाली. तिला मुद्दामून चिडवायला लाल गुलाब तोंडात आडवा धरून त्याने दार उघडले आणि त्याला काटाच टोचला. समोर सुषमाताई सुद्धा उभ्या होत्या. पटकन गुलाब तोंडातून काढून ओशाळे होऊन त्याने त्यांचे स्वागत केलं. गालातलया गालात हसत सुषमाताई आणि त्याची पोज पाहून डोक्यावर हात मारत दीप्ती अशा दोघी आत आल्या.
पहिल्यांदाच दीप्ती आणि सुषमाताई यशच्या घरी येत होत्या. अपेक्षेपेक्षाही त्याचं पेंट हाऊस जास्तच हाय फाय निघालं. प्रशस्त लिविंगरूमच्या फ्रेंच खिडकीतून अरबी समुद्र दूरवर दिसत होता. दीप्ती तर पहिली खिडकीपाशीच गेली आणि समुद्राकडे बघत राहिली. सुषमाताईंच्या नजरेतून यशची बाल्कनी आणि त्यात लावलेली सुंदर टेरेस गार्डन सुटली नाही. खिडकीतून समुद्र स्वच्छ दिसेल इतक्या अंतरावर, अख्खा पाय आत बुडेल असा गुबगुबीत लेदरचा सोफासेट, खाली रुजामयचा मखमली गालीचा, सोफ्यासमोरच्या चकाचक काचेच्या कॉफी टेबलवर एक जेडचा हिरवागार चायनिज वाघ दिमाखात बसलेला. एका साइड टेबलवर हस्तिदंती बुद्धिबळाचा सेट आणि दुसऱ्या साइड टेबलवर यश आणि केएलचा यशच्या कॉनव्होकेशनच्या वेळचा फोटो हाताशी येईल असा ठेवलेला. छपरावरून खाली झेपावणारं लखलखीत ऊंची झुंबर. एका बाजूला काळंभोर शिसवी डायनिंग टेबल आणि वरती चकचकीत कॅन्डल स्टँड. दारातून आत आल्यावर वरच्या मजल्यावर जायला जिना आणि दुसरीकडे सरव्हंटस क्वार्टरस् अशी चक्क पाटी.
समुद्रावरून नजर हटल्यावर दीप्ती इकडेतिकडे पहातच राहिली. म्हात्रे हाऊसपेक्षाही उजवं असं दिमाखदार वातावरण तिने कंपनी कॉनफरन्सच्या वेळी ५ स्टार हॉटेल्स मध्ये पहिले होते पण इतक्या श्रीमंती मिरावणाऱ्या घरी ती कदाचित पहिल्यांदाच येत होती. जरा बावरूनच ती सोफ्यावर बसली. सुषमा ताईंची अवस्था काही फार वेगळी नव्हती.
मिसेस व्हेरगिस हळूच किचन मधून डोकावल्या आणि यशनी खूण केली तेव्हा आतून पाण्याचा ट्रे घेऊन आल्या. कॉफी चालेल ना तुम्हाला? मिसेस व्हेरगिस खूप छान फिल्टर कॉफी बनवतात.
“अंम? हो चालेल.. थॅंक्स “
“प्लीज बी कॉमफरटेबल .. एसी लावू का?” त्या दोघींची अस्वस्थता यश ला जाणवत होती
“छे छे .. इतका सुंदर वारा येतोय समुद्रावरून ..” सुषमाताई म्हणाल्या
“हा वारा खायला छान वाटतो इतका खारा आहे की घरातल्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची पार वाट लावतो..” यश म्हणाला
“ओह इज इट? ही कल्पना नव्हती”
“बट आय डोन्ट माइंड... सी व्यू असलेलं घर घ्यायचं ही मी मुंबईला आल्याआल्याच ठरवलं होतं”
“ओह ओके म्हणून तू म्हात्रे हाऊस मध्ये रहात नाहीस...” सुषमाताईंनी हलकेच टटोलले
“नाही. म्हात्रे हाऊस केएलचं घर आहे. आय नीडेड माय ओन स्पेस.” यश स्पष्टपणे म्हणाला. त्याचा पवित्रा सुषमाताईंना आवडला. आजचं बोलणं यशस्वी होण्यासाठी सर्वांच्या स्पष्ट आणि प्रामाणिक मतांची देवाणघेवाण होणं अतिशय आवश्यक होतं.
“त्याच संदर्भात आम्ही आज तुझ्याशी बोलायला आलोय यश”
यशने संभ्रमात दीप्तीकडे पहिले. ती अजूनही त्या ऐश्वर्यात रुळलेली नव्हती. आणि गहन विचारात पडली होती.
तेवढ्यात मिसेस व्हेरगिस नी सर्वांना कॉफीच्या सुगंधाने दरवळणारी कॉफी आणि खमंग कुकीस सर्व केली.
“हम्म रीफ्रेशिंग” दीप्ती ने पहिला घोंट घेतला. तिला कॉफी आवडल्याचं पाहून यशला बरं वाटलं. खरं म्हणजे त्याचं लक्ष आज तिच्याकडेच होतं. पण ती अजून काहीच बोलत नव्हती.
“कूकीस? स्टॅनली ने मगाशीच याईदान मधून फ्रेशली बेक्ड आणल्या आहेत.. “
“व्वा! खरंच मस्त दिसतायत. थॅंक्स! “ सुषमाताईंनी यशच्या मेहमाननवाजी चा मान राखण्यासाठी एक बिस्किट उचललं.
“तर तुम्ही काही बोलायचं म्हणत होतात .. “
“हो.. त्या आधी एक विनंती आहे. आत्ता होणारं सगळं बोलणं हे आपण सगळ्यांच्या भल्यासाठी करणार आहोत इंक्लुडिंग यू यश. इथे जितका मी आदी आणि दीप्तीचा विचार करते आहे तितका आणि तितकाच तुझाही करते आहे एवढा विश्वास ठेव. काही गोष्ट तुला पटली नाही अथवा आवडली नाही तर तसं स्पष्ट सांग. ऑब्लीगेशन म्हणून काहीही मान्य करू नकोस कारण त्याने काहीही साध्य होणार नाही.” सुषमाताई कळकळीने म्हणाल्या
“तुम्ही काळजी करू नका मॅsम. बिनधास्त बोला. आय ट्रस्ट यू मोअर दॅन मायसेल्फ.”
“ठीक आहे. लेट मी टेक द लीड अॅट धिस पॉइंट. तुम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलं, आदीला लीगली अडॉप्ट करायचं ठरवलं हयात तुमचा उद्देश अत्यंत प्युअर आणि जेन्यूइन आहे हयात कोणतीही शंका नाही. परंतू प्रॅक्टिकल्ली ते कसं करायचं ते तुम्ही ठरवलं आहे का? त्याच्यावर तुम्ही बोलला आहात का?”
दोघंही गप्प. “हम्म.. ठीक आहे. हरकत नाही. आज बोलूयात. तुम्ही लग्नानंतर कुठे राहावं असं तुम्हाला वाटतं? यश तू सांग कुठे आणि का ते..”
“कुठे म्हणजे? इथे .. माझ्या घरी ..लग्नानंतर तसंच होतं ना आय मीन.. बायको सासरी जाते अँड ऑल..” यशला ह्या प्रश्नाचा रोखंच कळला नव्हता
“हिंदू कॉलनी.. आपल्या घरी.. आदी आत्तापर्यन्त तिथेच वाढलाय आणि बाबाला माझ्या सपोर्ट ची गरज आहे...”
पहिल्याच महत्त्वाच्या मुद्द्यावर दोघांची मतभिन्नता उभी ठाकली. स्वभावाप्रमाणे यशने आई बाबांचा विचार केला नव्हतां आणि दीप्तीने तिचा आणि यशचा. तिघेही जरा चरकलेच.
“सो वी हॅव अ कॉन्फलिकट ऑलरेडी. लेट्स सॉर्ट इट आउट.” सुषमाताई अतिशय पद्धतशीरपणे एक एक गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत होत्या.
“टु क्लॅरीफाय यॉर पॉइंट यश, तुमचं लग्न हे “नॉर्मल” नाहीये. सो नॉर्मल लग्नां मधले नॉर्मस तुम्हाला बंधनकारक नाहीत. बायकोनेच सासरी जायला हवे अशी गरज नाही.
तसंच टु करेक्ट यॉर पॉइंट दीप्ती, ह्या लग्नानंतर तू, आदी आणि यश एक स्मॉलर यूनिट बनणार आहात. त्यामुळे गरजेला तू बाबा आणि मला मदत नक्की कर पण डेली रूटीन मध्ये आय कॅन् वेरी वेल हॅंडल हिम अॅट लीस्ट धिस पॉइंट ऑफ टाइम. टॉकिंग अबाऊट आदी स्टेइंग एल्सव्हेअर, चिल्ड्रेन आर मोअर अडॉप्टेबल दॅन यू कॅन् एवर इमाजिन, त्यामुळे आमच्यासाठी तुम्हाला हिंदू कॉलॉनी मध्ये थांबायची अजिबात गरज नाहीये.”
दोघेही आता पुरे गोंधळले. संभाषणाचं सारथ्य अजून सुषमाताईंकडेच होतं.
“आता मी काय सांगते ते नीट ऐका. आतापर्यंत ही स्पष्ट झालंच असेल की हे वाटतं तितकं सोपं नाही. दीप्ती, तुला सगळे निर्णय स्वतः घेण्याची सवय आहे तशीच ती यश ला सुद्धा आहे. यू बोंथ आर वेरी पुअर अॅट अॅडजस्टमेन्ट अँड ट्रस्ट मी व्हेन आय से धिस, दॅट मॅरेज अँड पेरेंटहूड इज अ डिसअॅस्टर विदाउट अॅडजस्टमेन्ट. जर तुम्ही ते मनापासून आणि आनंदाने करू शकला नाहीत, तर कुठून ह्या भानगडीत पडलो अशीच अवस्था तुम्हा तीघांची ही होईल. अँड द वरस्ट पार्ट इज दॅट विल बी अ पॉइंट ऑफ नो रिटर्न.. “ सुषमाताई खंबीरपणे म्हणाल्या
“आर यू परसुएडिंग अस टु कॉल इट ऑफ मिसेस दीक्षित?” यश ने विचारले. त्याच्या आवाजात ऑलरेडी बगावत डोकावत होती.
“नो यश. हियर मी आउट फर्स्ट बिफोर कमिंग टु एनी कॉनक्लूजन. “ सुषमाताईंनी त्याला शांत केलं. दीप्ती मात्र शांतच होती. तिला माहीत होतं की तिची आई जेव्हा हा अवतार धारण करते तेव्हा तिची इतकी प्रचंड तयारी आणि विचार झालेला असतो की कोणत्याही मुद्द्यावर तिच्याकडे उत्तर तयार असतं.
“ मी एक प्लॅन प्रपोज करणार आहे. मी पूर्ण विचारांती तो बनवला आहे तसंच तुम्ही सुद्धा घाईगडबडीने त्याच्यावर लेबलं न लावता त्याचा नीट विचार करावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. “
कॉफीचा कप टेबल वर ठेऊन सुषमाताई सावरून बसल्या आणि शेवटी त्यांनी गौप्यस्फोट केला
“तुम्ही तिघांनी १ वर्ष लिव इन रिलेशनशिप मध्ये राहावं आणि एक वर्षा अखेर तुम्हाला खरंच एक कुटूंब म्हणून राहणं आनंददायी आणि सगळ्यांच्या दृष्टीने श्रेयस्कर झालं असेल तर आणि तरंच कायदेशीर रित्या ह्या नात्यांचा स्वीकार करावा असं माझं म्हणणं आहे. वर्ष अखेर तुम्हा तीघांपैकी जर कुणीही नाखूश किंवा रिलकटंट असेल तर आपण आपली मैत्री कायम ठेवू परंतू ओफफीशियली कुटुंब होण्याचा विचार सोडून देऊया.
दीप्ती आणि यश बऱ्यापैकी धककयात गेले होते पण सुषमाताईंनी इतक्या व्यवस्थित त्यांचं म्हणणं मांडलं होतं की त्यावर विचार करणं त्यांना भाग होतं. त्यांचा प्रथमदर्शनी पहिल्या फटक्यात विरोध न दिसल्यामुळे सुषमाताई पुढे समजावू लागल्या
“तुम्ही म्हणाल एक वर्ष का? तर माझ्या शिक्षिका म्हणून अनुभवातून मी ही खात्रीलायक रित्या सांगू शकते की एका वर्षात साधारणपणे सगळ्या चांगल्या वाईट रेग्युलर टिपिकल सीचुएशन्स समोर येतात. सगळे ऋतु पार होतात. दोन चार महीने आपण उसनं आवसान आणून दिवस रेटू शकतो पण वर्षभरात आपल्या आतल्या आत काही गोष्टी उमगायला लागतात. “
“तुम्ही म्हणाल लग्न करून मग एकत्र नाही का राहता येणार? तर माझं म्हणणं आहे त्यातून बाहेर पडावसं वाटलं तर केवळ त्यासाठी लागणाऱ्या किचकट तांत्रिक आणि कायदेशीर प्रक्रिया टाळण्यासाठी कुणीही न रुजलेल्या नात्यांचं ओझं आयुष्यभर बाळगू नये... जितक्या सहजपणे आपण आत शिरलो तितक्या सहजपणे परिस्थिति स्वीकारून आपण बाहेर पडू शकतो”
दोघेही विचारमग्न होते. सुषमाताईंचं म्हणणं त्यांना निश्चितपणे पटत होतं तरीही त्यांच्या स्वभावानुसार त्यांच्या मनात शंका कुशंका उत्पन्न होत होत्या. दीप्ति कडे बघत सुषमाताईंनी जरा ऑकवर्ड विषयाला हात घातला..
“ माझा पुढचा मुद्दा. ह्या काळात तुम्हाला फिजिकलि क्लोज यायचं असेल तरीही माझी काहीही हरकत नाहीये दीप्ती. फक्त तो तुमचा दोघांचा निर्णय असावा आणि त्यातून आत्तातरी प्रेग्ननसी उद्भवू नये ह्याची तुम्ही चोख काळजी घ्यावी म्हणजे वर्षा अखेरीस निर्णय कॉम्प्लिकेटेड होणार नाही. ”
“आई ! ..” दीप्तीचा कानावर विश्वास बसेना आणि यशचा ही!
“मी इंग्लिश बरोबर सायकॉलॉजीचा ही अभ्यास केलाय मुलांनो आणि अठरा ते वीस वयाच्या मुलांना २५ वर्षं शिकवलं आहे. इथे मी तुम्हा दोघांची आई म्हणून बोलते आहे तेव्हा प्लीज ऑकवर्ड वाटून घेऊ नका आणि रागही मानून घेऊ नका ..”
“पण तुम्हाला लोकांची काही भीती नाही वाटत मॅsम? “ आता मात्र यश ला विचारल्याशिवाय राहावलं नाही. इतके पुढारलेले विचार असणारी साठीची भारतीय स्त्री तो पहिल्यांदाच पहात होता
“आपल्यावर जेव्हा आभाळ कोसळतं ना यश, तेव्हा कोणी लोक बिक ते सावरायला मदत करत नसतात. माझे आत्ताचे विचार खरंतर माझ्या संस्कारांच्या विरुद्ध आहेत. पण मी जे काही भोगलंय आणि ज्या अनुभवातून गेले आहे त्यातून माझं पर्सपेकटीव्ह मी निश्चयाने बदललंय. उद्या आदीच्या कॉलेज ची फी भरायला किंवा दीप्ती म्हातारी झाल्यावर तिला सोबत करायला लोक येणार नाहीयेत. आपलं ओझं आपल्यालाच उचलावं लागतं यश लोक काय चार दिवस येतात. त्या लोकांच्या म्हणण्याची काय परवा करायची? हां त्यातून कुणी दीप्तीवर किंवा तुझ्यावर काही चुकीचे आरोप केले तर तुम्हाला त्याचं काही वाटून घ्यायचं आहे का हे तुमचं तुम्ही ठरवावं. पण माझ्याकडून माझं मन मला हयात काहीही अनैतिक किंवा चुकीचं नाहीये असंच सांगतं आहे एवढं नक्की.” सुषमाताईंनी डोळे पुसले.
“ह्या सगळ्या वर्षभरात तुम्ही दोघांनी खर्च सुद्धा वाटून घ्यायचा आहे म्हणजे कुणाला कुणी वापरलं अशी भावना यावी नको. आदीच्या शाळेची फी आणि इतर माहीत असलेले खर्च मी करणार आहे.”
यश च्या चेहेऱ्यावरचे भाव बदललेले दिसताच सुषमाताई गडबडीने म्हणाल्या
“आम्ही मध्यमवर्गीय लोक आहोत यश. तुझ्या पाकीटाला कदाचित अश्या खर्चांचं वजन जाणवणार सुद्धा नाही पण आमच्या मनः शान्ती साठी असं करणं गरजेचं आहे. गैरसमज करून घेऊ नकोस. आणि मुख्य म्हणजे प्रीती भरतच्या लाईफ इन्शुरेंसचे पैसे आदिसाठीच वापरतो आपण. तेवढीच त्यांच्या आत्म्याला समाधान. ”
ह्यावर यश काहीच बोलू शकला नाही. त्याने दीप्ती कडे पहिले. ती दूरवर समुद्राकडे टक लावून बघत होती.
“आता ह्यावर विचार करा आणि तसं एकमेकांशी बोलून ठरवा. मला वाटतं माझे मुद्दे मूळ आशयासकट तुमच्या लक्षात आले आहेत. त्यावर कोणती आणि कशी अॅक्शन घ्यायची ते तुमचं तुम्ही ठरवा. मी निघते आता..” म्हणत सुषमाताई सोफ्यावरून उठल्या.
“मला मान्य आहे मॅsम” यश ठामपणे म्हणाला आणि सुषमाताईंना आश्चर्य लपवता आलं नाही.
“मला पहिल्यांदाच कुणीतरी आई म्हणून काही सांगितलं आहे. आणि ते सुद्धा इतकं व्यवस्थित की मला ते मान्य नसण्याचं काही कारणच नाहीये..”
सुषमाताईंचे डोळे भरून आले.
“मग आजपासून मला आई म्हण. म्हणशील?”
“.... ” यशला शब्द फुटत नव्हते. त्याने मानेनेच हो म्हटलं.
“मी आता निघते आदी शाळेतून येईल थोड्या वेळाने. तुझं झालं की ये गं दीप्ती घरी”
“स्टॅनली .. मॅडम को घरपे छोडदो ..”
“अरे त्याची काही गरज नाही ..”
“ प्लीज .. आई!”
“बरं ठीक आहे. थॅंक यू”
सुषमाताई निघाल्यावर यश हलकेच दीप्ती च्या शेजारी जाऊन बसला.
“यू ओके?”
मानेने दीप्ती ने नकार दिला
“आय नो .. ऑल धिस वॉज टू मच टु टेक ना .. तू काळजी करू नकोस .. टेक यॉर टाइम”
“देअर इज मोअर टु इट”
“आता अजून काय ?”
“आशु आलाय इंडियाला परत. मी भेटले परवा त्याला”
“ओह आय सी !” यश दीप्तीकडे रेललेला होता तो एकदम मागे झाला
“आय होप तुला असं वाटत नाहीये की आई ने जे काही सांगितलं त्याच्याशी ह्याचं काही संबंध नाहीये”
“नाही तसं काही मला वाटत नाही कारण तसं असतं तर मॅsम ने स्पष्ट सांगितलं असतं..”
“ही इज सॉरी ही लेफ्ट ..”
“ही शुड बी ..”
दीप्ती ने चमकून यशकडे बघितलं. यशची नजर स्थिर होती.
“सो तू काय ठरवते आहेस?
“ ... “
“ दीप्ती? व्हॉट हॅव यू डिसायडेड ?”
“.. टु गिव अस अ फेअर चान्स.. पण विल यू ट्रस्ट मी आफ्टर नोइंग धिस?”
“ईवन मोअर आफ्टर नोइंग धिस ...
“थॅंक्स ..” म्हणत दीप्ती ने यशच्या हातात हलकेच हात घातला, त्याच्या जवळ सरकून तिने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि ती दोघं समोरच्या अथांग सागराकडे बघत बसली ...
|| क्रमशः ||

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ प्रज्ञा, मानले तुम्हाला. दरवेळी नवीन गुगली. कस कस कस जमतं हो तुम्हाला. :विचारात पडलेला बाहूला:
बाकी पकड छान आली आहे. पकडे रेहना छोडना नही. शुभेच्छा पुभाप्र

छान.
मायबोलीवरच्या खऱ्याखुऱ्या दिप्तीच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत!

मस्त सुरुये कथा...
दिप्ती च्या आईचे रोखठोक आणि स्पष्ट विचार सॉलिड पटलेत...
पुढील भागाच्या प्रतीक्षेत!!
शुभेच्छा!!