मुक्ती

मुक्ती

Submitted by राजेंद्र देवी on 6 June, 2019 - 22:53

मुक्ती

चंदनापरी झिजलो मी
सुगन्ध कधी दरवळला नाही
खूप वेडे वाकडे चाललो मी
परी, रस्ता कधी वळला नाही

ध्येय उचित होते,
पुण्य पण संचित होते,
प्रारब्धाला कळले नाही
वांछिल ते लाभले पण
वेगळे काहि मिळले नाही

सुख चोहोबाजूंनी धावून आले
दुःखाला वाट मिळाली नाही
मुक्ती साठी तळमळे आत्मा
परमात्मा अजुन भेटत नाही

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 

मृत्यूचे ठिकाण आणि आत्म्याची मुक्ती

Submitted by एक मित्र on 6 March, 2017 - 10:27

काही वर्षांपूर्वी वडिलांचा मृत्यू झाला. आमच्या मूळ गावापासून दूर शहरात असणाऱ्या मोठ्या इस्पितळात आयसीयूमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ती त्यांची अखेरची रात्र होती हे त्यांना कळून चुकले होते. ते त्यांनी आम्हाला डोळ्याच्या खुणेने सांगायचा प्रयत्न केला पण आम्हाला ते कळले नाही. पोक्तपणाने सल्ला देणारे मोठे असे कोणी आमच्याजवळ नव्हते. आईच्या मनाला हि गोष्ट फार लागून राहिली आहे. इतक्या वर्षानीही तिला असे वाटते कि त्यांना त्या रात्री आपण गावाकडे हलवले असते तर बरे झाले असते. एकटेपणी आयसीयूमध्ये त्यांचा शेवट झाला.

Subscribe to RSS - मुक्ती