कथा
चिठ्ठी भाग 7
चिठ्ठी भाग 6
चिठ्ठी भाग 5
चिठ्ठी भाग 4
चिठ्ठी भाग 3
चिठ्ठी भाग 2
चिठ्ठी भाग 1- https://www.maayboli.com/node/72811
"एखादं छानसं भजन म्हण ना मुग्धा", वाती तुपात बुडवत शोभाताई म्हणाल्या.
"कुठलं म्हणु?"
"कुठलंही म्हण अगं ", अनुला जवळ घेऊन कुरवाळत शोभाताई म्हणाल्या.
"किती वेळ लावशील? मी असतो तर आतापर्यंत म्हणून देखील झालं असतं आणि प्रसाद देखील खाऊन झाला असता..देवाचा", अनुच्या बडबडीकडे दुर्लक्ष करून मुग्धाने गायला सुरवात केली.
"तुझी पदकमले मज शतकोटी
सोडवी जन्ममरणाच्या गाठी||
चिठ्ठी भाग 1
"काक्कुआज्जी!"
ती चिरपरिचीत हाक हवेत विरते न विरते तोच फाटक सताड उघडे टाकून तो धापा टाकत आत पळत आला. फाटकाच्या कडीला त्याचा हात जेमतेमच पुरत असे. तरी तो प्रयत्न करून फाटक उघडायचाच. ती हाक शोभाताईंनाच उद्देशून आहे हे ताडले तरी मुग्धा बैठकीत आली.
"कोण आहे? "
अंगावर जेमतेम कपडे घालून त्याच्यापेक्षा मोठ्या टाॅवेलला सावरत उभ्या त्या बटूला बघून तिला हसू आलं. तरी तिने वरकरणी सरळ चेहरा ठेवत पुन्हा विचारलं, "कोण बरं?"
"अण्ड्राग"
"काय? Android?!", नव्यानेच अभ्यासक्रमात समाविष्ट झालेला course आठवला मुग्धाला.
"नै कै. अ..न..रा..ग"
शोध (अंतिम भाग)
विनित ने कंप्लेंट केल्यानंतर त्याची केस मी वरिष्ठांना सांगून माझ्याकडेच घेतली. आता मला त्या आय पी ॲड्रेस चा शोध लावायचा होता. ते आय पी ॲड्रेस आत्ता तरी ॲक्टीव्ह दाखवत नव्हते. मी सिस्टीम वरून सर्च केलं तर त्यांचं लोकेशन मुंबईपासून खूप लांब एका घनदाट जंगलात दाखवत होतं. असेलही त्यांची एखादी गुप्त जागा किंवा एखादं घर. न जाणो ते आय पी ॲड्रेस आता अस्तित्वात असतील की नाही. या केसचं सारं काम मी घरूनच करत होतो. विनितला मी स्वतः सांगितलं होतं. केस सोडविली की मी स्वतःहून भेटेन तोपर्यंत लॅपटॉप वापरू नको असंही सांगितलं.
इबोला (भाग-१)
त्या दिवशी माझी फर्स्ट शिफ्ट होती म्हणून काहीसा वैतागून मी सकाळी ७ वाजता हॉस्पिटल ला पोहोचलो. गोव्यातले हे माझे तिसरे वर्ष होते.एम.बी.बी.एस. पूर्ण करून मी गोव्यातल्या एका खाजगी हॉस्पिटल मध्ये इंटर्न म्हणून लागलो पुढे त्यांनी मला पर्मनंट केले. पगार चांगला होता आणि गोवा हे तरुण मुलांसाठी स्वर्गच आहे. एकंदरीत माझी लाईफ मस्त मजेत चालली होती. अर्थात त्या दिवशी सगळं बदलणार होतं. सकाळी बाटोमॅट्री पंचिंग केल्यानंतर मी तसाच कँटीन मध्ये शिरलो. सोमवारची फर्स्ट शिफ्ट दिल्यामुळं मी जाम वैतागलो होतो.
Pages
