देणं सीझन २ – भाग ९

Submitted by jpradnya on 16 May, 2020 - 06:52

देणं सीझन २ – भाग १
https://www.maayboli.com/node/73996
देणं सीझन २ – भाग २
https://www.maayboli.com/node/74043
देणं सीझन २ – भाग 3
https://www.maayboli.com/node/74080
देणं सीझन २ – भाग ४
https://www.maayboli.com/node/74117
देणं सीझन २ – भाग ५
https://www.maayboli.com/node/74153
देणं सीझन २ – भाग ६
https://www.maayboli.com/node/74194
देणं सीझन २ – भाग ७
https://www.maayboli.com/node/74308
देणं सीझन २ – भाग ८
https://www.maayboli.com/node/74407
देणं सीझन २ – भाग ९

आता पुढे..
दारातून आत आल्यावर दीप्तीचं डोकंच फिरलं. सगळीकडे पसारा, २ बूटस् २ बाजूंना, स्कूलबॅग चपलांच्या स्टँडवर, गालीचावर सगळी खेळणी अस्ताव्यस्त पडलेली आणि टीव्हीवर कार्टून लागलेलं आणि ते बघत आदी शाळेच्याच ड्रेस मध्ये चॉकलेट खात बसलेला आणि त्याच्या बाजूच्या सोफ्यावर यश मोबाइल मध्ये डोकं घालून बसलेला. दीप्ती आत आली आहे ह्याचं दोघांनाही भान नव्हतं.
“आदी! आदी!!! “ दीप्ति चा आवाज आदी च्या कानावरच पडत नव्हता इतका टीव्ही जोरात चालू होता
शेवटी दीप्ती ने जाऊन टीव्ही चा मैन स्विच ऑफ केला आणि आदी नाराजीने ओरडला
“हे sss माजं कालटून ..” यश ने पण दचकून वर पहिले
“हाय कधी आलीस तू?”
“मी येऊन बराच वेळ झाला पण तुमचं लक्ष कुठे होतं… “ दीप्ती ने रोखून यश कडे बघितलं
“तुम्ही दोघे कधी आलात घरी?”
“झाले दीड दोन तास ..”
“आणि तुम्ही अजून कपडे सुद्धा बदलले नाहीत..”
“आम्ही बिझी होतो नाही का चॅंप?” आदी कडे बघत यश ने त्याला डोळा मारला
“धिस इज नॉट फनी यश. व्हाय इज आदी ईटिंग चॉकलेट अॅट डिनर टाइम?”
“कम ऑन दीपस् .. रीलॅक्स इट्स नो बिग अ डील ..”
“इट ‘इज’ अ बिग डील यश..आत्ता चॉकलेट खाल्लं तर तो नीट जेवणार आहे का? मग त्याची झोप नीट हॉट नाही. उद्या वेळेवर त्याला जाग येणार नाही. सगळं सायकल बिघडतं अशाने. आणि रोज रोज का चॉकलेट देतोस तू त्याला?...... आर यू ईवन लिसनिंग टु मी?” दीप्ती बोलत असताना यश ने डोकं पुन्हा मोबाइल मध्ये घातलं. साहजिकच दीप्तीला राग आला.
“किती ओवररीअॅक्ट करशील? ही इज जस्ट अ किड .. त्याने थोडं एंजॉय केलं तर काय बिघडलं?”
“ही ह्या वीक मधली तिसरी वेळ आहे यश आणि धिस इज नॉट डन. मिसेस व्हेरगिसनी जेवण बनवून ठेवलं आहे मग ते न देता तू त्याला चॉकलेट का दिलंस ह्या वेळी? डू यू ईवन नो व्हॉट टाइम इट इज?”
“डू यू नो व्हॉट टाइम इज इट? ईफ धिस इज सो लेट व्हाय डिड यू नॉट कम ऑन टाइम? तू येऊन द्यायचं होतंस ना त्याला जेवण वेळेवर येऊन... रोज स्वतः उशीरा यायचं आणि मग ही असं का केलं ते तसं का केलं म्हणून क्रिटीसाइज करायचं ” यशचा ही पारा चढायला लागला होता
“मी नरीमन पॉइंट मधून येते कळलं ना? रानडे रोड ते शिवाजी पार्क हा माझा ऑफिस रूट नाहीये तुझ्यासारखा..” एकीकडे भसाभस आदी च्या वस्तू आवरत दीप्ती चा राग बाहेर पडत होता. म्हात्रे कॉनसलटिंग मधून राजीनामा दिल्यावर तिने नरीमन पॉइंट वरच्या एक मातब्बर कॉनसलटिंग कंपनी मध्ये मार्केटिंग मॅनेजर चा जॉब घेतला होता. काम उत्तम असलं तरी खूप होतं आणि दीप्ती ला जवळजवळ रोज उशीर व्हायला लागला होता. यश मात्र म्हात्रे कॉनसलटिंग मध्येच काम करत होता त्यामुळे आदीला किंडर गारटन मधून आणण्याची जबाबदारी रोज जवळजवळ त्याच्यावरच पडत होती.
दीप्ति आणि आदी यश च्या पेंटहाऊस मध्ये शिफ्ट होऊन ३-४ महीने झाले होते. तिघेही जण स्वतःच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडले होते. अनिवार्य असे मतभेद, विभिन्न चॉइसेस, स्वभावतः निर्माण होणाऱ्या तफावती दिवसागणिक जाणवू लागल्या होत्या. सुषमाताईंच्या छत्राखालून बाहेर पडून आदी प्रमाणेच दीप्तीला सुद्धा बाहेरच्या जगाचे येणारे अनुभव वेगळे होते. यशला खरं सांगायचं तर कुणी वाढवलं असं नव्हतंच. फक्त पैशाचा काय तो प्रश्न त्याला कधी भेडसावला नाही. बाकी त्याचं तोच जमेल तसं जमेल तिथून जीवन शिक्षण घेत राहिला. दीप्तिचे सुषमाताईंच्या मोकळ्या वातावरणात पण शिस्तीत गेलेलं आयुष्य आणि त्यातून तिच्या घडत गेलेल्या धारणा त्याच्या पचनी पडणे अशक्य होते. दीप्तीचा बऱ्याचशया बाबतीतला ठामपणा हा समोरच्याला खालची जागा दाखवणारा असे. माझ्या घरी होतं ते आणि तेच योग्य आणि सर्वश्रेष्ठ आहे असा तिचा पवित्रा यशच्या स्वतंत्र वृत्ती आणि मतांना सामावून देणारा, त्याच्या अनुभवांमधून आलेल्या त्याच्याही पाशी असलेल्या शहाणपणाला न्याय देणारा नव्हता. बारा घाटांचं पाणी पिऊन आलेला आणि कुणाच्याही मदतीशिवाय स्वतः स्वतःला घडवलेला यश काही प्रत्येक वेळी चूक आणि अनादर करण्याजोगा नव्हता. परंतू दीप्तीला असलेला तिच्या अचूक संस्कारांचा अहंकार घडी घडी यश ला दुखावत होता. तिच्या पासून दूर करत होता.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
“आदीला वेळेवर झोपू देत. सकाळी लवकर उठत नाही तो. “
“आज खूप दिवसांनी छान चांदणं पडलंय. मी आदीला घेऊन बीच वर जातोय. एक दिवस उशिरा उठला म्हणून काही बिघडत नाही. उद्या वीकएंड आहे नाहीतरी...आय डोन्ट वांट हिम टु मिस्स द फुल मून एक्सपिरियंस टुनाइट ”
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
“चल आदी गेट अप क्विक! वी आर गेट्टिंग लेट फॉर क्रिकेट प्रॅक्टिस. गेट अप गेट अप..”
“अरे किती दमलाय तो. आज त्याला नाही जायचं तर राहू देत आजच्या दिवस.”
“धिस वे ही विल नेवर बी ए गुड स्पोर्ट्समन... आदी कम ऑन बॉय”
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
“आदी इज अ व्हेजिटेरियन.”
“व्हेजिटेरियनस् आर डेफीशीएन्ट ऑन बी ट्वेल्व. ही नीड्स टु हॅव सॉलिड प्रोटीन ईफ ही इज टु प्ले क्रिकेट. तू तुझे प्रेफेरेनसेस त्याच्यावर लादू नकोस समजलं?”
“आणि आत्ता टु तुझे प्रेफेरेनसेस त्याच्यावर लादतो आहेस त्याचं काय?”
“कांट यू सी हाऊ मच ही इज लाइकिंग फिश. खा रे तू. मिसेस व्हेरगीस. सम मोर फिश प्लीज.”
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
“ अजूनही १०१ डिग्री दाखवतोय थरमोमिटर. मी पीडीअॅट्रीशनला कॉल करते आहे. “
“इतकी पॅनिक कशाला होते आहेस तू? इट्स जस्ट फीवर. पॅरासेटमॉल दे आणि त्याला आराम करू दे”
“तुला अनुभव आहे त्याच्या तापाचा? तुला माहितीए किती लवकर चढतो त्याचा ताप?”
“दीप्ती फॉर गॉडस् सेक यू आर स्केअरिंग द पूर चाइल्ड. यू नीड टु काम डाउन फर्स्ट. “
“डोन्ट टेल मी टु काम डाउन ओके? यू नो नथिंग अबाऊट हिम. यू आर नॉट हिज फादर”
“यू आर नॉट हिज मदर, टू डॅम इट ... “
दीप्तीच्या चेहेऱ्यावर उमटलेली तीव्र वेदना, यशचा चेहेरा संतांपाने फुललेला, आणि आदीचा कावरा बावरा झालेला चेहेरा...
आदीला स्वतंत्र बेडरूम मध्ये झोपवण्याचा यशचा अट्टहास. त्याला दीप्ती चा कसून विरोध. बेडरूमच्या बंद दारा मागे घडलेल्या नकारांमुळे प्रचंड दुखावली गेलेली आतुर मनं. बोचणारं अपराधिपण. भावनांचा कल्लोळ.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
महीने उलटत होते तसे छोटे मोठे प्रसंग घडत होते. दऱ्या वाढतच चालल्या होत्या. सुषमाताई आणि केएल ची भीती कुठेतरी खरी ठरताना दिसत होती. आधी कधेमधे एकमेकांना भेटताना वाटणारं आकर्षण एकत्र राहायला लागल्यावर रोजच्या दैनंदिन व्यवहाराचे चटके सोसून पोळत होतं. दोघांचे पूर्वायुष्यातले अनुभव आणि त्या अनुषंगाने झालेल्या धारणा सहमत होत नव्हत्या. दोघांच्या एकमेकांच्या कडून असलेल्या अपेक्षा बऱ्याच अंशी भंग पावत होत्या. इगो सतत टक्कर घेत होते. जवळ जवळ सगळ्या भांडणांमध्ये दोघांपैकी एकदम बरोबर किंवा चूक कुणीच नव्हतं. फक्त त्यांचे दृष्टिकोण एकमेकांपेक्षा पूर्ण विरुद्ध होते आणि ते स्वीकारून माघार घ्यायची दोघांची ही तयारी नव्हती. जगातल्या बहुतांश विजोड जोडयांसारखाच ह्याही जोडीचा प्रवास एका अनिवार्य गोठलेल्या घुसमटवणाऱ्या शांततेकडे चालला होता...

|| क्रमशः ||

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा भागही छान, पण खूपच लहान!! उत्सुकता वाढली इथे, पुढचा भाग प्लीज थोडा लौकर आणि मोठा टाका हो!!!, शुभेच्छा Happy