देणं सीजन २ – भाग १

Submitted by jpradnya on 5 April, 2020 - 16:54

देणं सीजन १ - अंतिम भाग ५
https://www.maayboli.com/node/73905

देणं सीजन २ - भाग १

म्हात्रे हाऊस च्या गेस्ट लाउंज मधील सोफ्याच्या एका बाजूला प्रचंड तणावाखाली दीप्ती बसली होती आणि दुसऱ्या बाजूला यश. तो मात्र शांत होता. समोर के एल अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होते आणि त्यांचं लेक्चर सुरू होतं...
“ यू हॅव डिस अपॉईंटेड मी थरोली दीप्ती दीक्षित. माझी तुझ्या कडून ही अपेक्षा नव्हती. आफ्टर ऑल दॅट आय हॅव डन फॉर यू, धिस इज हाऊ यू पे मी बॅक ? बाय ट्रिकइंग माय ग्रँडसन इंटू मॅरेज ?”
“के एल ..” दीप्ति आणि यश दोघेही संतांपून एकदम उद्गारले
“नॉट अ वर्ड बोथ ऑफ यू बिफोर आय अ ॅ म डन... नॉट अ वर्ड “ के एल त्यांना मध्येच तोडत कडाडले . यश आणि दीप्ती गप्प बसावं लागलं.
“ मी तुला काय सांगितलं त्या दिवशी फोन वर? स्लीप ओवर धिस थॉट. डिड यू यश? डिड यू?”
“ नो के एल. “
“का नाही ऐकलास तू माझा सल्ला? आणि तू दीप्ती? बिफोर अॅकसेपटींग हिज प्रोपोसल एकदाही विचार नाही केलास? डू यू ईवन नो हिम अँड हिज पर्सनल लाईफ? “
“ नो के एल “ के एल च्या म्हणण्यातलं तथ्य दीप्ती ला जाणवलं
“ हा काही सिनेमा नाहीये की झट मंगनी पट ब्याह आणि मग हॅप्पीली एवर आफ्टर. किती मोठी कॉममिटमेंट असते लग्न म्हणजे माहितीए तुम्हा दोघांना? आणि त्यातून तुम्ही रेडीमेड पेरेंट हूड डोक्यावर घेण्याचं म्हणता आहात... हॅव यू थॉट थ्रू धिस हाऊ यू आर गोइंग टु डू इट ?”
“नो के एल .. आय मीन येस के एल..”
“ तुला माझा जरा जरी आदर असेल तर तू आत्ता च्या आत्ता यशचा विचार डोक्यातून काढून टाकशील ” आत्ताचे के एल चे शब्द दीप्ती ला सुऱ्याच्या घावासारखे लागले आणि ती क्षणात उभी राहिली
“ मी तुमचा आदर करते म्हणूनच आत्तापर्यन्त एकही शब्द बोलले नाही. मोठ्यांचा तोंडावर अपमान करण्याचे माझे संस्कार नाहीत के एल. तुमच्या नातवाने मागणी घातली आहे मला. मी आले नव्हते तुमच्या दारात माझं प्रोफाइल घेऊन. तुमच्या कॉनसेंट शिवाय मी हो म्हणणार नाही असं मी यश ला स्पष्ट सांगितलं आणि म्हणूनच इथे आले. आय आम सॉरी टु से धिस बट यू हॅव डिसअप्पोइंटेड मी थरोली टू के एल. आय विल सी मायसेल्फ आऊट “ म्हणत दीप्ती दाराजवळ पोचली सुद्धा
“ प्लीज वेट फॉर मी इन द कार दीप्ती. मी माझं सामान घेऊन येतो १० मीनिटात “ के एल वरची नजर न काढत यश दीप्ती ला म्हणाला
“बास कर आता हा ड्रामा यश “
“ड्रामा तुम्ही करताय के एल. आत्तापर्यन्त एकदाही मला माझ्या गर्लफ्रेंडस् बद्दल एका शब्दाने विचारलं नाहीत. झाला असता मला एखादा मुलगा माझ्या रिलेशनशिप मधून तर काय करणार होतात तुम्ही? अँड फायनली मी एका अतिशय रिसपेकटेबल मुलीशी लग्न करायचं म्हणतोय तेव्हा तुम्ही तिचा अपमान करून तिला पाठवलत? “
... आता गप्प बसण्याची पाळी के एल वर आली.
मला माहितीए तुमचा प्रॉब्लेम काय आहे. तुम्हाला भीती वाटते आहे न की तुमची इस्टेट आदीला मिळेल म्हणून? डोन्ट वरी. तुमची इस्टेट मलाही नकोय त्यामुळे आदीचा संबंधच नाही बरोबर? मी उद्याच लॉंयर शी बोलून माझ्याकडून विषय संपवून टाकतो. मग तर तुमची काही हरकत नसेल ना ह्या लग्नाला? “ यश ने संताप संयमित ठेवला होता
“ यू वॉन्ट टु ब्लो यॉर फॉर्च्यून फॉर दॅट बास्..”
“डेअर यू!” पण आता मात्र यश च्या नजरेत अंगार आला होता. तर्जनी के एल च्या चेहऱ्यासमोर बंदुकीसारखी धरली
“ डेअर यू कॉल माय सन अ बास्टर्ड एवर अगेन अँड... ” पुढचं वाक्य पुरं न करता संतांपाने फुललेली नजर के एल च्या डोळ्यांवरून बाजूला न करता यश एक एक पाऊल मागे होऊन ताड ताड आतल्या खोलीत गेला.
यश च्या नजरेने के एल पुरते घायाळ होऊन बधीर उभे होते
२ मिनटातच यश बाहेर आला. त्याच्या हातात त्याच्या बाबांची क्रिकेट ची बॅट आणि यश आणि के एल चा यशच्या कॉनवोकेशनच्या वेळी काढलेला फोटो होता.
“कन्सिडर धिस अॅज माय इनहेरीटन्स” असं म्हणत धाडकन दार लावून यश बाहेर पडला आणि के एल मटकन् सोफ्यावर बसले.
म्हात्रे हाऊस च्या गेट च्या बाहेर थांबलेल्या दीप्तीच्या गाडी चे ब्लिंकर्स ऑन होते. यशने गाडी चे दार वाजवले तसं दीप्ती ने पटकन डोळे पुसून गाडी अनलॉक केली. यश येऊन बसला तरी २ मिनिटं कुणीच काही बोललं नाही.
“आर यू स्टिल शुअर यू वॉन्ट टु डू धिस यश?”
“आय हॅव नेवर बीन मोअर शुअर अबाऊट एनिथिंग एल्स इन माय एंटायर लाईफ. निघूया?”
यश च्या शब्दांतली कनवीकशन दीप्ती ला जाणवली आणि तिने जास्त काही न विचारता गाडी सुरू केली.
****************************************************************************************************************************************
इंजीनीरिंग चा रिजल्ट अपेक्षेप्रमाणेच उत्तम लागला होता. आणि त्यामुळे कॅम्पस प्लेसमेंट मध्ये मिळालेलया जॉब्स वर शिक्कामोर्तब झालं होतं. पोरं मार्गाला लागणार होती फायनली !
दीप्ती, आशु, शिशिर, ख्याती, आणि नताशा अशी गँग सेलीब्रेट करायला दादर च्या “ओवेन फ्रेश” मध्ये जमली होती. अजूनपर्यंत कॉन्टिनेन्टल फूड मुंबई च्या रस्त्यांवर उतरले नव्हते. त्यामुळे नाचोस्, टाकोस्, एनचलाडास्, व्हर्जिन मारगरीटास् सर्व करणारे “ओवेन फ्रेश” एकदम टेचात होतं. आजच्या पार्टी ला कुणालाही पॉकेटमनी चं बंधन नसल्यामुळे पब्लिक दे दणादण ऑर्डर करत सुटलं होतं. आणि सर्वांचा लाडका ट्रूथ अँड डेअर खेळण्याचं ठरलं. पहिला नंबर लागला दीप्ती चा जिला डेअर मध्ये समोर च्या टेबल वर बसलेल्या एका गंभीर बावा (मुंबईत पारश्यांना बावा म्हणतात. Nom) शी फ्लर्ट करण्याची जोखीम पार पाडायची होती. पोनिटेल सोडून दीप्ती ने केस मोकळे केले, चेहरा पुसला, ख्याती च्या पर्स मधून लिपस्टिक पेरफ्यूम घेऊन लावलं आणि नखरेल चालीने ती त्या टेबलाकडे गेली. बावा लोकांचा राग दादरकरांना अपरिचित नव्हता त्यामुळे हिची आता कशी फजिती होते आहे ह्याची वाट बघत ह्यांच्या टेबल वर उधाण आलं होतं! स्त्रीसुलभ हालचाली करत दीप्ती ने त्या बावाला कसं पटवलं देव जाणे पण त्याने तिचा हात हातात घेऊन चक्क पापा घेतला आणि यू हू म्हणत इकडची मंडळी खिदळायला लागली. युद्ध जिंकून आलेल्या सेनापति सारखी दीप्ती परत आली आणि खेळ पुन्हा सुरू झाला. आता डेअर ची पाळी आली आशु वर. आत्तापर्यन्त कधीही न् केलेली कठीण गोष्ट करण्याचा चॅलेंज शिशिर ने आशु ला दिला. त्याने सुद्धा शिशिर कडून कंगवा उसना घेतलं आणि भांग पाडला. ख्याती कडून लेडिज परफ्यूम घेऊन ते शिंपडले आणि तो टेबल सोडून चालायला लागला. आता हा काय दिवे लावणार आहे ह्याचा अंदाज सगळे बांधत असतानाच आशु गरर्कन् मागे वळला. आणि
“ मी आशुतोष पाटणकर. रहाणार हिंदू कॉलॉनी दादर मुंबई. शिक्षण कम्प्युटर इंजीनियर फ्रॉम vjti. नो करी मॅस्टेक inc , पगार २५००० महिना. घरी आई वडील आजी आजोबा. निर्व्यसनी. लवकरच अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी जाण्याचा प्लान. मला एक गृहकृत्यदक्ष, मनमिळावू, आणि गोरीपान बायको हवी आहे. सो दीप्ती दीक्षित , विल यू मॅरी मी ?” असं म्हणत दीप्ती च्या समोर येऊन पटकन गुढ्ग्यांवर बसला. हा डेअर निभावतोय असं समजून सगळे जण खो खो हसायला लागले. पण आशु मात्र गुढगयावर बसूनच राहिला. हसणं थोडं शांत झाल्यावर त्याने हळूच खिशातून लागू बंधू लिहिलेली छोटीशी डबी काढली आणि उघडून दीप्ती समोर धरली तेव्हा मात्र सगळे धककयातच गेले. डबीत एक छोटीशी हीऱ्यांची अंगठी होती. पाहून दीप्तीचा विश्वासच बसेना. ति भूत बघितल्या सारखी अंगठी आणि आशु कडे बघत राहिली .
“ दीप्ती यार काहीतरी बोल ना पाय दुखायला लागले माझे” शेवटी आशु नेच शांततेचा भंग केला
“ आरे ही अंगठी कुठून आणलीस.. काकांकडून चोरलेस की काय पैसे? “
“ किडनी विकून आणली तुला काय करायचंय ? तू घालणार आहेस की मी नताशा ला प्रपोज करू आता ?”
“ तू खरं सांग आधी”
“ अगं माझे आई पैसे जमवून घेतली आहे गं तुझ्या साठी आता लोक हसतील मला लवकर हो म्हण”
“ बरं ठीके “
“बरं ठीके?” अविश्वासाने आशु ओरडला
“हम्म “
“मग अंगठी तर घालशील की नाही ? “
“आत्ता?”
“मग काय आपल्या नातवाच्या मुंजीत घालणारेस का?”
“हेहेहे आजोबा बोलले! बाय द वे अंगठी छान आहे. खरंच माझ्यासाठी घेतलीस ? “ अंगठी हातात घेऊन निरखत दीप्ती म्हणाली.
“तू ना निवडुंग आहेस निवडुंग . मी इतकं रोमॅंटिक प्रोपोजल प्लान केलं तुझ्यासाठी पण तू पार पचका करून टाकलास. जाऊ दे . दे टी अंगठी मी परत करून टाकतो..” आशुतोष कुरकुरला
“आरे तुम्ही दोघे मॅड आहात का? द होल क्राऊड इज वेटिंग टु क्लॅप फॉर यू गाइस आणि तुम्ही भांडताय काय?” शिशिर ने दोघांना हलवलं
त्यांनी इकडे तिकडे बघितलं. ओवेन फ्रेश चा सगळी गर्दी त्यांच्याकडे टक लावून बघत होती. वेटरस् पण थांबले होते
“आर यू शुअर यू वॉन्ट टु डू धिस आशु?”
“आय हॅव नेवर बीन मोअर शुअर अबाऊट एनिथिंग एल्स इन माय एंटायर लाईफ”
“मग पटकन खाली बस पुन्हा” म्हणत दीप्ती ने आशु ला जवळजवळ जबरदस्तीने पुन्हा गुढ्ग्यांवर बसवले
“येस आशुतोष पाटणकर. आय विल मॅरी यू. आता उठ “ म्हणत दीप्तीने इकडे तिकडे अपेक्षेने पाहिले आणि लोक टाळ्या वाजवत नाही ही बघून ती चक्रवलीच
“आता माझं काय चुकलं ..” असं म्हणत ती आशु कडे बघत पुढे काही बोलणार इतक्यात .. आशुने तिला जवळ ओढलं आणि पुढे काही बोलूच दिलं नाही
आणि ओवेन फ्रेश मधला टाळ्यांचा कडकडाट नंतरची ५ मिनिटं थांबला नव्हता

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान सुरवात.

अवांतर: आपण कधी #pune या irc वर होत्या का?

धन्यवाद सर्वांना !
@maitreyee घाई नाही करणार. शक्य तितकं इंट्रेस्टिंग करण्याचा मनापासून प्रयत्न करेन
@मानव पृथविकर - नाही हो. ती मी नव्हेच