आप्पांची प्रकृती गंभीर आहे हे कळल्यावर प्रणाली तातडीने निघालीच. नको त्या विचारांना मनात थारा द्यायचा नाही असं ठरवूनही आप्पांची भेट होईल की नाही ही भिती काही दूर होईना. प्रणाली या एकाच विचाराने विमानात कितीतरी वेळ रडत राहिली. मुंबईपर्यंत २२ तास आणि पुढे कुडाळपर्यत पोचायला आणखी ८ तास. विमानतळावर पोचल्यावर आप्पा आहेत हे कळल्यावर तिचा जीव शांत झाला. घरी पोचल्यावर प्रणाली धावलीच आप्पांच्या पलंगापाशी. रया गेलेले आप्पा पाहून भडभडून आलं प्रणालीला. डोळे मिटून शांतपणे निजले होते आप्पा. काहीवेळ भरुन आलेल्या डोळ्यांनी ती त्यांच्याकडे पाहत राहिली. तिच्या चाहुलीने त्यांनी डोळे उघडले.
तू....तूच ती!! - ४ लिंक
https://www.maayboli.com/node/65410
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
तू....तूच ती!! - ३ लिंक
https://www.maayboli.com/node/65232
---------------------------------------------------------------------------------------------------
"माणसाने जगावं तर खाण्यासाठीच असं माझा स्पष्ट मत आहे. वेगवेगळ्या चवीचे पदार्थ खाणे आणि त्याचा आनंद घेणे ह्यालाच तर सुखी जीवन म्हणतात. कसले चटकदार पोहे केले होते भैयांनी!! खरपूस तळलेले कांदे, शेंगदाण्याची आरास, कोथिम्बिरीची बरसात, शेवेची सजावट आणि लिंबाची फोड!! वाह ! जगावे खवय्याने मनमुराद तर पुण्यातच ! भैयाजी देव तुमचं भलं करो!! "
एकदा वाळवंटातील सोन्या उंट फिरत फिरत आनंदवनात आला.
त्याला सगळ्या गोष्टींना नाव ठेवायची वाईट खोड होती.
त्याने या आधी जंगल, प्राणी, पक्षी काहीसुध्दा बघितले नव्हते.
सिंह महाराजांनी त्याचे स्वागत केले आणि आनंदवन बघण्यासाठी बरोबर वाघ्या कुत्रा पाठवला.
खर तर इतकी झाडे, गार हवा बघून त्याला खूप छान वाटतं होते पण कशाला चांगल न म्हणण्याची खोड त्याला शांत बसू देईना.
फिरता फिरता सोन्याला रानगाय दिसली. तिला बघून सोन्या मोठ्याने हसत म्हणाला," तू कोण आहेस? , कोणी का असेना पण किती जाडी आहेस. चालताना पोट बघ कसं हलत आहे."
गाय त्याला काही न म्हणता निघून गेली.
तू....तूच ती!! - २ लिंक
https://www.maayboli.com/node/65151
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अभिनंदनाच्या वर्षावात वेदांगी न्हाऊन निघत होती. प्रत्येकाच्या नजरेत कौतुक तर होतंच पण त्यापेक्षाही आश्चर्य जास्त होतं. का वेदांगीला ते तसं वाटत होतं? कदाचित जे घडलं ते घडलं नसतं तर हे यश ती मिळवू शकली नसती याबद्दल वेदांगीच्या मनात तीळमात्रही शंका नव्हती.
"आईला किती आनंद होईल ना बाबा?" तिचा स्वर आनंदाने भिजला होता.
"हो. तुझ्या आईइतकाच आनंद मलाही झालाय वेदू." बाबांच्या प्रेमळ स्वराने वेदांगी हेलावली.
"तसं नाही बाबा. परीक्षेला बसायचं नाही या माझ्या हट्टापुढे तुम्ही नमलात पण आई ठाम राहिली. म्हणून म्हटलं मी तसं."
कंपनीच्या बसमध्ये फोनवर हळू आवाजात बोलत असताना आपल्या शेजारी बसलेल्या ऑफिसच्या सहकारी पूजा आणि रिया दोघी आपल्याकडे पाहात हसताहेत, हे अमितला जाणवलं आणि तो अस्वस्थ झाला. त्याने फोन ठेवला, तसं त्यांनी लगेच विचारलं,"काय मग काय म्हणत होती गर्लफ्रेंड?"
"क...क...क...कोण...गर्लफ्रेंड? नुसती मैत्रीण होती एक."
"अरे लाजू नकोस आम्हाला सांगायला?आम्ही तुला मदतच करू?"
क्षणभर अमित विचारात पडला. "तुम्ही मदत करणार?" त्याने विचारलं.
"अर्थात,"रिया हसून म्हणाली,"अरे ही पूजा तर तुला एकसे बढकर एक टिप्स देईल. लव्हगुरू आहे ती. तिच्या टिप्स पाळल्यास तर गर्लफ्रेंड पटलीच पाहिजे."
३० जून २०१७
डिअर डायरी,
हाय! बऱ्याच दिवसांनी आज लिहावसं वाटलं. कॉलेज सुरू होऊन पंधssरा दिवस झाले तरी अजून मला रुममेट मिळाली नाही. नोटीस बोर्डवर सगळ्या खोल्यांच्या रुममेट्सची यादी लागली पण माझ्याच खोलीचा नंबर नव्हता.
शीर्षक: दोन मैत्रिणी.. आणि बरेच काही..
भाग पहिला:- साल १९९६