इबोला (भाग-१)

Submitted by Abhishek Sawant on 22 October, 2019 - 03:20

त्या दिवशी माझी फर्स्ट शिफ्ट होती म्हणून काहीसा वैतागून मी सकाळी ७ वाजता हॉस्पिटल ला पोहोचलो. गोव्यातले हे माझे तिसरे वर्ष होते.एम.बी.बी.एस. पूर्ण करून मी गोव्यातल्या एका खाजगी हॉस्पिटल मध्ये इंटर्न म्हणून लागलो पुढे त्यांनी मला पर्मनंट केले. पगार चांगला होता आणि गोवा हे तरुण मुलांसाठी स्वर्गच आहे. एकंदरीत माझी लाईफ मस्त मजेत चालली होती. अर्थात त्या दिवशी सगळं बदलणार होतं. सकाळी बाटोमॅट्री पंचिंग केल्यानंतर मी तसाच कँटीन मध्ये शिरलो. सोमवारची फर्स्ट शिफ्ट दिल्यामुळं मी जाम वैतागलो होतो. चहा वैगेरे आटोपून मग मी माझ्या केबिन कडे वळलो तर तेव्हढ्यात एक टुरिस्ट चा घोळका आत शिरताना दिसला, सगळेच नायजेरियन वाटले. त्यांच्या सोबत एक चाळीशीतले गृहस्थ होते कदाचित सेवियर फिवर आणि विकनेस ची केस असावी. मी केबिन मध्ये जाऊन फॉर्मलिटीस पूर्ण केल्या, अप्रोन आणि स्टेटस्कोप घेतला आणि राउंड ला निघालो तेव्हढ्यात डॉक्टर नाईक नी त्या पेशंट ला अटेंड केलं होतं. त्यांना विचारल्यावर कळालं कि तो ग्रुप केनिया चा आहे vacation साठी गोव्याला आला होता कालच ते विमानाने गोव्याला पोहोचले होते आणि आज त्या गृहस्थांना हा त्रास चालू झाला. डायरिया आणि फिवर मुळे खूप अशक्तपणा आला होता म्हणून त्यांना ऍडमिट केलं.अर्थात आमच्या हॉस्पिटल मध्ये हि काय नवीन गोष्ट न्हवती.
मी माझी डेली रुटीन ची कामं केली पण संध्याकाळी जाताना त्या केनिया च्या माणसाची मला केस स्टडी करावीशी वाटली.मी त्याच्या रूम मध्ये गेलो त्याला झोप लागली होती. बाजूला ठेवलेला रिपोर्ट उचलला. स्टीव्ह लुकास नावं होतं मूळचा अमेरिकन ओरिजन चा वय ४२ वर्ष, वजन ९५ किलो एकदम भारदस्त शरीर क्लिनिकल हिस्टरी एकदम क्लिअर होती तो माणूस एकदम फिट वाटत होता. आणि डॉक्टर नाईक ने dignose केलं होतं की वायरल फिवर आणि नॉन स्टेरॉईडल अँटी इंफ्लामेटोरी अँटीबीओटीक चालू केल्या होत्या. मला ते जरा वेगळं वाटलं. पण मी विचार केला की jetlag मुळे आणि एवढ्या मोठ्या प्रवासामुळे असेल कदाचित. उद्या इम्प्रोव्हमेंट नक्की दिसेल असा विचार करून मी बाहेर पडलो.
गेल्यावर मित्राने मस्त व्हिस्की चा प्लॅन बनवला, एका बीच रिसॉर्ट वर गेलो हळूहळू व्हिस्की चे घोट रिचावत मस्त बसलो होतो तेव्हा मला क्लीक झालं की नायजेरियन आणि केनियंन देशांमध्ये तीन माहिन्यांनपूर्वी इबोला चा आऊटबर्स्ट झाला होता दोन ते तीन हजार लोक यात बळी पडले होते.जगातल्या सर्व देशानी आणि WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ओरगनायझेशन ने मिळून त्या वायरस ला रोखल्याचा दावा करण्यात आला. पण अधूनमधून अश्या केसेस समोर यायच्यापण भारताच्या सावध धोरणामुळे भारतामध्ये या वायरस ने प्रवेश केला न्हवता. स्टीव्ह चे symtoms इबोला च्या symtoms ची साधर्म्य दाखवत होते.मी इबोलाच्या पेशंट ला हँडल केले नसले तरी WHO च्या साईट वर संपूर्ण माहिती शोधून काढली. इबोला वायरस हा हायली contageous म्हणजेच संसर्गजन्य आहे म्हणजे डायरेक्ट sneezing किंवा coughing किंवा direct किंवा indirect contact with पेशंट skin किंवा पेशंटच्या ब्लड ची संपर्क झाल्यामुळे किंवा same airspace शेयर केल्याने हा रोग होऊ शकतो. Incubation time २ ते २१ दिवस primaty symtoms ताप, उलटी, डायरिया आणि अशक्त पणा. Shock, vital organ failure आणि unexplained ब्लीडिंग.मी तिथून लगेच उठलो आणि डॉक्टर नाईक ना कॉल केला त्यांनी इबोला symptoms ची शक्यता शून्य आहे असे सांगितले.आणि एअरपोर्ट औथोरिटी याबाबत खप सतर्क असल्याचं सांगितलं. पण माझ्या डोक्यातून तो विचार जात न्हवता. कारण जर तो इबोला असेल तर त्या पेशंटच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये येणाऱ्या लोकांची संख्या मिनिटाला वाढत होती आणि ते सगळे लोक माझ्या जवळचे माझ्या हॉस्पिटल स्टाफ मधले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता हॉस्पिटल ला पोहोचलो तसा स्टीव्ह च्याखोली कडे वळालो तर ती रिकामी होती त्यांनी काळ रात्री डिस्चार्ज घेतला. नाईट शिफ्ट च्या डॉक्टर ने त्यांना पाहिजे म्हणून डिस्चार्ज दिला कारण त्याला स्टीव्हच्या स्तिथी मध्ये सुधारणा आढळली. मी लगेच पेशंट रिपोर्ट काढला आणि काळजीपूर्वक वाचू लागलो.त्यात एक पॉईंट होता की abdominal pain.मी सरळ त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळवला आणि त्यांना परत हॉस्पिटल मध्ये येण्याची रिक्वेस्ट केली. तो पर्यंत मी आमच्या पॅथॉलॉजी लॅब ला काही टेस्ट साठी तयारी करायला सांगितली आणि हि गोष्ट कॉन्फिडेन्टिल ठेवायला सांगितली कारण अश्या गोष्टींमुळे लोक पॅनिक होतात. स्टीव्ह खूपच कोओप्रेटिव्ह होते. त्यांना मी विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत होतो.
त्यांना काही महत्वाच्या टेस्ट करायच्या राहून गेल्या असे सांगितले आणि मी त्यांना चेक करू लागलो.माझ्या चेहर्यावर घाम जमा होत होता समोर मला आमच्या सगळ्यांचा मृत्यू दिसत होता .....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे, लवकर लिहा.इबोला ला क्युअर नसल्याने(जे आहे ते जास्त करून डेव्हलपड देशांसाठी असल्याने) पॅनिक होणं साहजिकच आहे.
योगायोग असा की इबोला आऊटब्रेक ची थीम रॉबिन कुक च्या एका कादंबरीत आहे(इन्श्युरन्स कंपन्या लोकांना इंफेक्ट करतात असे काही) आणि इबोला आऊटब्रेक त्यानंतर अनेक वर्षांनी आहे.

@अनघा.... नाही मी डॉक्टर नाही पण मी मास्टर्स केलंय फार्मा मध्ये ...धन्यवाद
Mi anu...मी खूप दिवसाआधी डिस्कवरी वर documentry पाहिली तेव्हाच लिहायचं ठरवलं. आता वेळ मिळाला.

मी खुप आधी एबोला आनि मार्बर्ग विषाणु वर एक पुस्त्क वाचल होत, तेव्हा जेवढी उत्सुकता अनै भिती होती तशीच हा लेख वाचताना वाटली.

NSAIDS आणि antibiotics मध्ये( ,) द्या. असं वाटतंय की नॉन स्टेरॉईडल अँटी इंफ्लामेटोरी हे अँटीबाय़ोटीक चं नांव आहे.

धन्यवाद प्रवीण
मी खुप आधी एबोला आनि मार्बर्ग विषाणु वर एक पुस्त्क वाचल होत, तेव्हा जेवढी उत्सुकता अनै भिती होती तशीच हा लेख वाचताना वाटली>>> धन्यवाद