कथा

कॉफ़ी ६१

Submitted by ध्येयवेडा on 19 August, 2019 - 12:35

ज अजून एक बायोडेटा तिच्या हाती पडला. विकेंड आला की ठरलेल्या मुलाला भेटायचं. फुकटची कॉफी प्यायची आणि मग "कळवते" असं म्हणून निघायचं. नकार द्यायला नवीन नवीन कारणं शोधायची.
कित्येक विकेंड तिचं हेच सुरू होतं.

आज पुण्याचं स्थळ होतं.
"सावकाश जा. काही लागलं तर लगेच कळव. आणि छान बातमी घेऊन ये. माझं बोलणं झालय त्याच्या घरच्यांशी.. खूप चांगलं घर आहे.." - आई
"क्लिक व्हायला पाहिजे गं आई... किती वेळा सांगू तुला....जाऊदे चल बाय .."

शब्दखुणा: 

सजाण

Submitted by मोहना on 17 July, 2019 - 17:23

आमच्या घरातून बाहेर पडलं की रस्त्यावर कुण्णीच नसतं. रस्त्यावरचं पहिलंच घर आमचं, थोडंसं चाललं की रस्ताच वळतो. मग एकदम गर्दी, गडबड, दुकानंच दुकानं. रोजच्यासारखंच आईने माझं बोट घट्ट धरलं होतं. मी ते सोडवलं की ती पुन्हा धरते. ऐकत नाही अगदी. आई नेहमीसारखी घाईघाईत मला काकूंकडे पोचवायला चालली होती. तिथून तिला कामावर जायचं होतं. पण मला उड्या मारत, काचेच्या खिडकीतून दुकानांच्या आत बघायचं होतं. टेडी बेअर, मिकी माऊसचं जे दुकान आहे ना ते मला खूप आवडतं. मी तिथे थांबतेच. मग आई पुन्हा हात धरुन ओढते. आजही आईने तसंच केलं. तिच्या मागे मागे जाताना त्या दुकानाच्या समोर एक मुलगा बसला होता तो दिसला.

शब्दखुणा: 

धुकं

Submitted by मोहना on 2 July, 2019 - 22:48

परमजितने हातातलं साप्ताहिक रागारागाने भिरकावलं. किती आतुरतेने वाट पाहत होता तो या साप्ताहिकाची. न्यू यॉर्कमधल्या अतिशय प्रसिद्ध साप्ताहिकाने त्याची मुलाखत घेतली होती. शहरातील सर्वोत्कृष्ट तरुण वकील परमजित अरोरा! गेल्या दोन महिन्यात असंख्यवेळा त्यांच्यांशी बोलण्यात, माहिती देण्यात गेले होते. पण प्रत्यक्षात साप्ताहिकाने त्याच्याच कार्यालयात काम करणार्‍या होतकरु स्त्री वकिलाची मुलाखत छापली होती. परमजित चांगलाच वैतागला. स्वत:ची मुलाखत न आल्याचं त्याला विशेष दु:ख झालं नव्हतं. राग आला होता तो साप्ताहिकाने स्वत:च संपर्क साधून त्याचा वेळ अशारितीने फुकट घालवल्याचा.

शब्दखुणा: 

मर्म - २ (अंतिम)

Submitted by ऑर्फियस on 4 May, 2019 - 22:16

बाबुअण्णाला आता रंगरंगोटी करायला जायचे होते. "शिरपतराव" बाबुअण्णा खुशीत आला की श्रीपतीला शिरपतराव म्हणत असे. "आज आमी रात्री उशीर येनार. आज कलेजी आना आनि मस्त जिरं काळीमिरं लावा" बाकी जोडीला रात्रीच्या जेवणाला काय काय आणायचं याच्या सुचना देऊन बाबुअण्णा निघून गेला. श्रीपती तयारीला लागला. एव्हाना दुकानात इतर माणसं आली होती. काम सुरु झाले होते. बाबुअण्णा परतला तेव्हा श्रीपतीने टेम्पो मालाने गच्च भरून तयार ठेवला होता. त्याने पाहिले बाबुअण्णाने केस काळे करून मिशा कोरल्या होत्या. काळ्याही केल्या होत्या. बाबुअण्णाने सर्व माल नीट भरला आहे याची खात्री केली.

शब्दखुणा: 

मर्म - १

Submitted by ऑर्फियस on 3 May, 2019 - 05:34

एखादी तरुण, नितळ त्वचा रोगाने काळवंडून कुरुप व्हावी तशी ती शांत, शालीन वस्ती पाहता पाहता बकाल होऊन गेली. तेथिल सुस्वभावी माणसे हळुहळु निघून गेली. तरण्या मुलींना पाहून शूक शूक करणारी, त्या वस्तीसारखीच बकाल माणसे आली. दुकाने वारेमाप झाली. झाडे तोडली गेली. चहाचे स्टॉल्स आले, जुगाराचे अड्डे आले, ताडीमाडी, दारुची दुकाने आली. बाजूला एक गावच्या दोन्ही वस्त्यांना जोडणारा पूल बांधला गेला. खालून रेल्वे गेली होती. पुलावर गणंगांना बसायला जागा मिळाली. वस्तीत दिवसभर वर्दळ वाहत असे. अगदी पहाटे मात्र शूकशूकाट असायचा.

शब्दखुणा: 

भुंगा

Submitted by ऑर्फियस on 3 March, 2019 - 06:07

आश्रमातून बाहेर पडलेला तो तालवृक्षासारखा उंच तरुण झपझप चालत होता. अंगावरच्या घामेजलेल्या वस्त्रांचं त्याला काहीच भान राहिलं नव्हतं. चेहरा विचारांमुळे व्यग्र झालेला दिसत होता. मांडीवर ओघळलेला रक्ताचा ओहोळ आता सुकून गेला होता. ओलेपणामुळे अंगाला चिकटलेल्या वस्त्रांतून त्याचा बलदंडपणा नजरेत भरत होता. चेहरा व्यग्र झाला असला तरी त्याचे असामान्य देखणेपण लपत नव्हते. वाटेत त्याच्या समोर कुणी आलेच तर त्याला झुकून वंदन करीत होते. कारण हा कुणीतरी राजपुरुष आहे हे त्यांना आतून जाणवत होते. "तू माझ्याशी खोटे बोललास. तू ब्राह्मण नाहीस.

शब्दखुणा: 

विष

Submitted by ऑर्फियस on 11 February, 2019 - 20:11

रघुनाथरावांनी समोर पाहिले. प्रसिद्ध मानसोपचारतज्ञासमोर ते बसले होते. अगदी तरणा डॉक्टर होता. कानावर शब्द पडत होते. "आयुष्यात आपल्याला हवं ते सारं मिळतंच असं नाही. मात्र सकारात्मक विचार असतील तर आहे त्यातूनच आपण पुढे जाऊ शकतो. तुम्ही तर कितीतरी मोठी झेप आयुष्यात घेतली आहे. साध्या केबल ऑपरेटर्सपासून सुरुवात करून आज मोठ्या कंपनीचे मालक झालात. जुन्या गोष्टीचं ओझं बाळगण्यात अर्थ नसतो..." शब्द अस्पष्ट होत गेले. रघुनाथरावांसमोर अण्णा आले. "रघ्या, कारखानीसांचं घड्याळ नेऊन दे आज" अण्णांचा तो आवाज कानी पडला की रघुला आपल्या आयुष्यात एक अभेद्य भिंत समोर उभी ठकल्यासारखं वाटत्त असे.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कथा