माझा हरवलेला लाडका पाऊस-प्रकाशचित्रे व नाशिकच्या वर्णनासह- संपादित व सुधारीत
माझा हरवलेला लाडका पाऊस
रवी उपाध्ये
माझ्या मनात आणि स्वप्नसृष्टीतही श्रावण, भाद्रपद आणि नंतरच्या मार्गशीर्ष अन पौष या महिन्यांना एक विशेष स्थान आहे ( अर्थात अनेक भारतीय प्रथांप्रमाणेच ही नावे अन महिन्यांची ओळख देखील अस्तंगत होत आहे हे सुध्दा तितकेच खरे). कारण त्यांचा उल्लेख होताच माझ्या डोळ्यापुढे एखाद्या स्लाईड शो सारखी खूप मनमोहक चित्रे आणि आठवणी सरकू लागतात.