लेखन

आमची गच्ची

Submitted by nimita on 25 August, 2018 - 09:36

असं म्हणतात की जेव्हा एखादी मुलगी लग्न होऊन तिच्या सासरी जाते तेव्हा बरंच काही माहेरी सोडून जाते...तिच्या स्वभावातला बालिशपणा, तिच्या बर्याचश्या सवयी वगैरे वगैरे!

माझ्या लग्नानंतर देखील माझं काही बाही माझ्या माहेरी राहून गेलं.. (माझा बालिशपणा मात्र मी बरोबर घेऊन आले....असं मी नाही तर माझ्या आजूबाजूचे लोक म्हणतात!)

पण त्याबद्दल मला कधीच खंत नाही वाटली, कारण मागे राहिलेल्या पेक्षा मला जे काही नवीन गवसलं ते ही माझ्यासाठी तितकच महत्वाचं होतं.

रस्त्यावरील पुणे

Submitted by सदा_भाऊ on 24 August, 2018 - 11:00

पुण्याच्या वाहतूकीवर मी नव्यानं काही लिहावं असं काही शिल्लक नाही. पुलं पासून ते दै संध्यानंदच्या वार्ताहरा पर्यंत प्रत्येकाने पुण्यातील रस्त्यांचा व वाहतुकीचा यथेच्छ समाचार घेतलेला आहे. माझ्या पुण्य नगरीतील वास्तव्यात तीच वाहतूक माझ्या आयुष्याची अविभाज्य घटक होती. तिच्या आठवणी माझ्या शब्दातून सुटणं हा माझ्यावर अन्याय होऊ शकेल याचसाठी गुरूवर्य पुलंना सविनय अभिवादन करून हा एक छोटासा प्रयत्न.

विषय: 
शब्दखुणा: 

बहिणाई

Submitted by Asu on 24 August, 2018 - 09:34

अजरामर कविता लिहून कवितांबरोबरच लेवा गणबोलीला सुद्धा खऱ्या अर्थाने समृद्ध करणाऱ्या *निसर्ग कन्या "बहिणाबाई चौधरी" यांची आज १३८ वी जयंती* त्या निमित्त बहिणाबाईंना माझी लेवा गणबोलीत काव्यांजली -

बहिणाई

माय बहिणाई बहिणाई
समद्या खानदेशाची आई
डोयामंधी समद्यायच्या
दिशे वं गह्यरी नवलाई

सादा सबूद तुह्या हाती
व्हतो अनमोल मोती
सब्दायचेबी ह्ये पाखरं
जिनगानीचं गानं गाती

वावरात डोले पिक
तुह्यासंग गानं गाती
पानाफुलायशी तुही
जमली व नाती गोती

शब्दखुणा: 

ओयासिस - भाग १

Submitted by somu on 24 August, 2018 - 02:42

ओयासिस - भाग १

"छान झाले फेशियल, तुझ्या हातात जादू आहे बघ" मिसेस सानेनी केलेले कौतुक ऐकून स्मिता सुखावली.

"नेक्स्ट टाइम, थोडा वेळ काढून या, आपण हेअर मसाज आणि स्पा पण करूयात. आत्ताच मी एक नवीन कोर्स अटेंड स्पा साठी केला होता. जर तुम्हाला चालणार असेल तर तुमच्या पासून नवीन टेक्निकची सुरवात करू"

"न चालायला काय झाले. उगीच गेले ८ वर्षे येत नाही तुझ्याकडे. येण्याच्या आधी फोन करते. आणि माझ्या दोन मैत्रिणींना मी तुझ्याबद्दल सांगितले आहे त्या पण येतील तुझ्याकडे"

" Thank you, तुमच्या सारख्या कस्टमर कम मैत्रिणींमुळेच माझा हा बिझनेस चांगलं सुरू आहे "

विषय: 

आठवती कां दिवस

Submitted by Asu on 24 August, 2018 - 00:54

आठवती कां दिवस

आठवती कां दिवस तुला ते
तुझ्या डोळ्यांनी मी पहायचे
श्वास होते गहाण माझे
तुझ्या श्वासांनी जगायचे

आकाशात ढग नसतांना
प्रेमसरींनी भिजायचे
ग्रीष्मातल्या भर दुपारी
मिठीत चांदणे फुलायचे

आठवती कां दिवस तुला ते
तुझ्या गाली मी हसायचे
गाली तुझ्या लाली येता
लटके लटके रूसायचे

नदी किनारी त्या एकांती
एकमेकां विसरायचे
या विश्वाच्या नभांगणी
झोपाळ्यावाचुन झुलायचे

शब्दखुणा: 

उत्सव

Submitted by Mia on 23 August, 2018 - 13:58

आज चंदा खुप खुश होती. अचानक काही तरी घबाड मिळते की माणूस जसा वेडावतो तस तिचं झालेलं. लक्ष्मी शाळेतन रडत परत आलेली. पोरं, पार कावरीबावरी झालेली. घरात आली आणि तिला बिलगलीच की! चंदिला कळेच ना काय झालं ते, लक्ष्मीन सारी हकीकत सांगितली. तिला शाळेत खेळता खेळता, अचानक सगळी मुलं चिडवायला लागली. ती घाबरून बाईंकडे गेली, बाईंनी तिला एका रिकाम्या वर्गात नेलं आणि तिचा ड्रेस मागून पुढून पाहिला. का काय माहीत पण त्यांच्या डोळ्यात पाणी आल्यासारख काहीतरी झाल. त्या तिच्याकड़े सहानुभूतीने पाहु लागल्यात. त्यांनी तिला जवळ घेतली आणि थापडवले. लक्ष्मीला कळना काय झालं ते??

विषय: 

मा. ल. क. - ९

Submitted by शाली on 23 August, 2018 - 00:17

एका राजात असावे ते सगळे गुण होते त्या अफाट पसरलेल्या राज्याच्या महाराजांमध्ये. शौर्याच्या आणि रणनितीच्या बळावर त्यांनी आपल्या राज्याच्या सिमा बऱ्याच विस्तारल्या होत्या. युध्दामुळे अनेक प्रांत फिरलेल्या राजाने जे जे चांगले दिसले ते ते आपल्या राज्यात आणले होते. वेगवेगळ्या स्थापत्य शैलीचा अभ्यास करुन अनेक भव्य इमारती राजधानीत उभारल्या होत्या. ग्रंथालये, मंदिरे, उद्याने यांनी सगळी राजधानी अगदी देखणी बनवली होती. प्रासादात अनेक देशोदेशीच्या नामवंत चित्रकारांच्या कलाकृती लावल्या होत्या. राजाचा आवडता छंद मात्र तत्वज्ञान. या छंदामुळे राज्यात अनेक विद्वानांना राजाश्रय मिळाला होता.

विषय: 
शब्दखुणा: 

“पर्थी”ची वाट! भाग ३ – क्विनाना, लेक क्लिफ्टन, वार्नब्रो

Submitted by kulu on 21 August, 2018 - 23:28

अवताराची कहाणी

Submitted by Asu on 20 August, 2018 - 10:32

प्रस्तावना -
नुकतीच एक बातमी वाचनात आली की, एक केंद्रीय मंत्री नियोजित बैठक अचानक रद्द करून ते एका बाबांचे दर्शन घेण्यासाठी निघून गेले.
कुणी कुणापुढे लोटांगण घालावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असला तरीही, एका प्रख्यात व्यक्तीच्या बाबतीत असे घडलं की, त्याच्या प्रसिद्धीच्या वलयाने अंधश्रद्धेला खतपाणी मिळतं हे अशा नेत्यांच्या लक्षात येत नाही का ? अशामुळेच या ‘बाबा’ लोकांचे अवतारी पुरुष बनतात व भोळ्या जनतेची सर्वप्रकारे लूट करतात.
या प्रसंगाच्या निमित्ताने कल्पनेची भरारी -

अवताराची कहाणी

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - लेखन