रंगभूमी

"इंदिरा" ह्या नाटकाच्या निमित्ताने .. एक निर्माता

Submitted by मिलन टोपकर on 5 December, 2015 - 05:47

आपल्या आयुष्यात कुठला ग्रह कसली संधी अचानक आपल्या समोर आणून ठेवील हे सांगणे एखाद्या पट्टीच्या ज्योतिषाला देखील शक्य नाही. पण काही काही योग असे असतात की आपण कल्पनाही न केलेल्या गोष्टी सहज घडून येतात आणि आपण अवाक होत, स्तब्ध होतो.

विषय: 

तडका - आमचे संविधान

Submitted by vishal maske on 25 November, 2015 - 22:03

आमचे संविधान

स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा
चरा-चरात मिळतो मान
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा
इथे मिळतो हो बहूमान

धर्मनिरपेक्षता समाजवादी
आहे एकात्मतेचा प्राण
मानवतेच्या कल्याणासाठी
जगात भारी आमचे संविधान

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

डायलॉगबाजी...

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

मागच्या आठवड्यात एके दिवशी घरी गेल्या-गेल्या लेक मिठी मारून म्हणाली,

'बाबा, सोमवारी मला 'कल्मिनेटींग अ‍ॅक्ट'चे डायलॉग मिळणार आहेत !!!!!'

कल्मिनेटींग अ‍ॅक्ट म्हणजे यांच्या नवीन शाळेत बसवलेली छोटी छोटी नाटके किंवा पथनाट्ये.

मागच्या वेळेस "बाई मलाही डायलॉग देतील देतील" म्हणून खेळाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहिली. अगदी अ‍ॅमेलिया बेडेलिया नाही तरी रस्त्यावरची चिन्हे किंवा आग लागल्यावरच्या सूचनांचे कथन तरी मिळेल! पण शेवटच्या दिवसापर्यंत लागलेली आशा धुळीला मिळालेली. मग भाग घेतलेल्या वर्गमित्रांच्या गप्पांमध्ये सामिल होण्यावाचून हाती काही शिल्लक नव्हते.

प्रकार: 

प्राईम-टाईम स्टार - श्री. सचिन कुंडलकर

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

श्री. चेतन दातार यांच्या मृत्यूनंतर २००९ साली लिहिलेला हा लेख -

***
प्रकार: 

सेलिब्रेशन या नाटकाच्या सिडीच्या निमित्ताने.

Submitted by दिनेश. on 28 September, 2015 - 11:55

मराठी नाटक बघायला मला मनापासून आवडत असले तरी सध्या मी त्याला मुकलोय. माझे मुंबईतले वास्तव्य आणि नाटकाचे प्रयोग यांचा योग जूळत नाही. यावेळेस मला तळ्यात मळ्यात बघायचे होते, पण त्याच्या
प्रयोगाच्या तारखा जुळत नव्हत्या. मग एक पळवाट म्हणून नाटकाच्या सिडीज शोधत राहतो.
तर यावेळेस प्रशांत दळवींचे, सेलिब्रेशन या नाटकाची सिडी घेऊन आलो. या नाटकाचे प्रयोग होत होते,
त्यावेळेसही मी भारतात नव्हतोच बहुतेक. एका मायबोलीकरणीकडूनच या नाटकाची तारीफ ऐकली होती.
तर आधी थोडेसे या नाटकाबद्दल लिहितो..

नाटक सबनीसांच्या कुटुंबाचे. भाई सबनीस आणि मालती सबनीस यांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस. त्याचे

बंगलोरमधील नाट्यप्रेमींसाठी - आसक्तचे नाटक 'एफ वन - वन झिरो फाईव्ह' (रविवार, २७ सप्टेंबर, २०१५ रोजी रंग शंकरा, जेपी नगर)

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

बंगलोर येथील नाट्यप्रेमींसाठी सुवर्ण संधी.
आसक्त, पुणे निर्मीत 'एफ वन - वन झिरो फाइव्ह' या नाटकाचे २ प्रयोग रंग शंकरा, जेपी नगर, बंगलोर येथे रविवार दिनांक २७ सप्टेंबर, २०१५ रोजी दुपारी ३:३० आणि सायंकाळी ७:३० वाजता सादर होत आहेत.
नाट्यरसिकांनी ह्या संधीचा नक्की लाभ घ्यावा ही विनंती.

प्रयोगासंबंधी आधिक माहिती खालीलप्रमाणे :

NatakAd.jpg

लेखक: आशुतोष पोतदार
दिग्दर्शन व नेपथ्य : मोहित टाकळकर
प्रकाश योजना: प्रदीप वैद्य
वेशभूषा: रश्मी रोडे
निर्मिती सूत्रधार: आशिष मेहता

प्रकार: 

तडका - नाना,मकरंद

Submitted by vishal maske on 11 August, 2015 - 00:20

नाना मकरंद

या दुष्काळलेल्या माणसांना
त्यांनी माणूसकी वाटलेली आहे
या मातीतल्या त्या लेकरांची
मातीशी नाळ ना तुटलेली आहे

शेतकर्‍यांचे अश्रु पाहून
मन त्यांचं तळमळलं आहे
सरकारला जे कळलं नाही
ते नाना,मकरंदला कळलं आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - फिल्मी कोडं

Submitted by vishal maske on 3 August, 2015 - 08:52

फिल्मी कोडं

वेग-वेगळे डायलॉग घेत
तीच-तीच विचारपुस सुरू आहे
सोशियल मिडीया झिंगला पार
मात्र शंकेचा ताठ मेरू आहे

सांगणारालाच काय सांगायचंय
हे एक न सुटणारं तिडं आहे
कटप्पाने बाहूबलीला का मारले
हे कित्तेकांना पडलेलं कोडं आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

बजरंगी भाईजानचा मराठी रिमेक !!!!!

Submitted by हेमन्त् on 29 July, 2015 - 11:46

"बजरंगी भाईजान" ने प्रेरीत होऊन त्याचा मराठी रिमेक बनवायचे एका मराठी चित्रपट निर्मात्याने घोषित केले आहे.
चित्रपटाचे नाव "मारुती भाऊ" असे असेल आणि मुंबईत हरवलेल्या पुणेकर मुलीला एक मुंबईकर कशी मदत करतो हे दाखविले जाईल.
पुण्यात मुलीला सोडताना त्याला ज्या अडचणी येतात, जसे की तुसडेपणाने बोलणारे पुणेकर, पत्ता विचारल्यावर तोंड वाकडं करणारे पुणेकर अशा अनेक अडचणी दाखविल्या जातील.
याशिवाय एक विशेष साहस द्रुष्य असेल ज्यात सिग्नल तोडुन नो एन्ट्री मधे घुसणार्या एका पुणेकराच्या दुचाकी पासुन मारुती भाऊ त्या मुक्या मुलीला वाचवतो.

Pages

Subscribe to RSS - रंगभूमी