रंगभूमी

माझी आवड - २१ मराठी गाणी

Submitted by दिनेश. on 24 November, 2014 - 09:10

फेसबुकवर आधी १० हिंदी गाण्यांचा आणि आता १५ मराठी गाण्यांचा विषय चालू आहे. मला ती कल्पना आवडली. पण एवढ्या संख्येची मर्यादा मला जमणार नव्हतीच.

म्हणून इथे २१ मराठी गाण्यांची यादी सुरु करतोय. मला ही यादी करणे अजिबात सोपे नव्हते. लता आणि आशा यांचीच जास्त गाणी आठवतात. मग मी इथे गायक कलाकाराने, आपली गायकी जिथे सिद्ध केलीय, असा निकष लावलाय. ( तरीही २१ म्हणजे... )

ही यादी तूम्ही वाढवायची.

१) तूमची यादी आधीच्या यादीतली गाणी वगळून करायची. म्हणजे जर तूमच्या आवडीचे गाणे आधीच यादीत असेल, तर ते परत लिहायचे नाही, पण २१ गाणी लिहायची.

माझ्या पहिल्या एकांकिकेचा पहिला प्रयोग

Submitted by ए ए वाघमारे on 11 October, 2014 - 04:51

माझ्या पहिल्या एकांकिकेचा पहिला प्रयोग:

"गुंतुनी गुंत्यात सार्‍या...."

निमित्त: पुरुषोत्तम करंडक नाट्यस्पर्धा

सादरकर्ते: धनवटे नॅशनल कॉलेज,नागपूर

ठिकाण: सायंटीफिक सभागृह, लक्ष्मीनगर, नागपूर

दिनांक: बुधवार,१५ ऑक्टोबर २०१४, सकाळी ०९:00वा

मुक्त प्रवेश

विषय: 

'विजयाबाई आणि आपण' - 'झिम्मा'तील निवडक भागाचं अभिवाचन

Submitted by चिनूक्स on 2 September, 2014 - 22:35
मराठी सांस्कृतिक विश्वात 'बाई' या संबोधनात प्रेम, आदर, दरारा अशा अनेक भावना एकाच वेळी ऐकू येतात. बाई म्हणजे विजयाबाई. विजया मेहता. विजयाबाई तेवीस वर्षांच्या होत्या, तेव्हा विजय तेंडुलकरांनी त्यांना ही पदवी बहाल केली. अतीव आदरापोटी. सहा दशकांहूनही अधिक असलेल्या रंगभूमीवरच्या वावरात बाईंनी आपल्या जबरदस्त कर्तृत्वानं आपली आणि तेंडुलकरांनी बहाल केलेल्या नामाभिधानाची योग्यता वारंवार सिद्ध केली.
विषय: 

मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 01:59

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

'दर्शन' - श्रीमती बी. जयश्री यांच्या गायनाचा व मुलाखतीचा कार्यक्रम

Submitted by माध्यम_प्रायोजक on 25 June, 2014 - 05:59

उद्या, म्हणजे गुरुवार दि. २६ जून रोजी पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात ’दर्शन’ या एका अभिनव उपक्रमाची सुरुवात होत आहे. ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री व गायिका श्रीमती बी. जयश्री यांचं गायन आणि नंतर श्रीमती ज्योती सुभाष व श्री. नासिरुद्दीन शाह यांनी त्यांची घेतलेली मुलाखत असा या उपक्रमातला पहिला कार्यक्रम आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक श्री. उमेश कुलकर्णी यांची ’अरभाट निर्मिती’, ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती ज्योती सुभाष यांची ’चैतन्यवेध’ आणि सातत्यानं उत्तमोत्तम नाटकं प्रे़क्षकांसमोर आणणार्‍या तरुण रंगकर्मींची ’नाटक कंपनी’ या संस्थांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.

'कुणी घर देता का घर' - नटसम्राटांचा टाहो.

Submitted by जीएस on 19 June, 2014 - 18:22

आपल्या विविधरंगी नाट्यप्रयोगांनी गेली दोन वर्षे जनतेचे अथक मनोरंजन करणार्‍या नटसम्राटाने अखेर 'कुणी घर देता का घर' असा आर्त टाहो फोडला आहे. आणि त्यांचा हा नवा नाट्यप्रवेश नेहेमीप्रमाणे जनतेपर्यंत नेण्याचे 'बहुतही क्रांतीकारी' काम अर्थातच केले आहे मिडीयातील एकमेव KCHP (केजरी सर्टिफाईड ऑनेस्ट पर्सन [या सर्टिफिकेशनसाठी देणगीसह भेटा अथवा लिहा.....]) पुण्यप्रसून वाजपेयी यांनी.

लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्याच्या मदतीसाठी 'मराठी बाणा'

Submitted by माध्यम_प्रायोजक on 10 April, 2014 - 14:24

श्री बाबा आमटे प्रस्थापित आणि डॉ प्रकाश आमटे संचालित हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प दवाखान्याच्या पुनर्निर्माणासाठी लोकबिरादरी मित्रमंडळ, पुणे यांच्यातर्फे आयोजित, श्री. अशोक हांडे प्रस्तुत 'मराठी बाणा'.

शनिवार, दिनांक २६ एप्रिल २०१४
वेळ - सायं. ७ ते १०
स्थळ - गणेश कला क्रीडा, पुणे

***

अ‍ॅगाथा ख्रिस्ती - फॅन क्लब

Submitted by गजानन on 12 March, 2014 - 12:54

अ‍ॅगाथा ख्रिस्तीचे चाहते आहेत का? Happy

तुम्ही कोणती पुस्तके वाचली? सगळ्यात आवडते कोणते? याबद्दल वाचायला नक्कीच आवडेल.

आवश्यक तिथे कृपया स्पॉयलर वॉर्निंग द्या.

च तु र्भु ज

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 2 March, 2014 - 02:24

(प्रवेश १ला स्थळ : महिपतराव पाटलांचा प्रशस्त वाडा आणि त्यासभोवतालचा परिसर)
प्रसंग : महिपतरावांची एकुलती एक कन्या हेमांगी चा विवाह संपन्न होत आहे. लग्नसमारंभात काम करणारी नोकरमंडळी आणि त्यांना सूचना देणारे यांची लगबग चालु आहे. मंद आवाजात वाद्ये वाजत आहेत. वातावरणात एक प्रसन्नता भरून राहिली आहे.

महिपतराव : (मोठ्याने ओरडून) आरं रामा, शिवा, गोविंदा. कोणी हाय का तिकडं? कुठं मेलेत समदे? हितं अजून किती कामं करायची बाकी आहेत. वावरात खुर्च्या मांडायच्यात. माईक अन् स्पीकर अजून आले नाहीयत. ........
.....

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - रंगभूमी