रंगभूमी

तडका - फिल्मी रेकॉर्ड

Submitted by vishal maske on 23 July, 2015 - 21:34

फिल्मी रेकॉर्ड

कुणी तरी बनवुन जातो
बाकीचे मग मोडत बसतात
वेग-वेगळ्या कमाईने
नवा रेकॉर्ड जोडत असतात

कुणी दुसर्‍याचे तर कुणी
स्वत:चेच तोडत असतात
पण त्यांचे रेकॉर्ड घडवण्यासाठी
प्रेक्षकच धडपडत असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

रसिका... तुझ्याचसाठी! - श्री. सुनील बर्वे

Submitted by माध्यम_प्रायोजक on 8 July, 2015 - 16:16

श्री. सुनील बर्वे यांचा अभिनयक्षेत्रातला प्रवेश रंगभूमीवरून झाला. 'अफलातून', 'चारचौघी', 'श्री तशी सौ', 'वन रूम किचन', 'मोरूची मावशी', 'लग्नाची बेडी', 'हीच तर प्रेमाची गंमत आहे' अशा अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. अभिनयातील कारकिर्दीला पंचवीस वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं श्री. सुनील बर्वे यांनी आपल्या 'सुबक' या संस्थेद्वारे 'हर्बेरियम' हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला. मराठी रंगभूमी गाजवलेल्या पाच नाटकांचं पुनरुज्जीवन त्यांनी केलं. प्रेक्षकांचा जबरदस्त पाठिंबा या नाटकांना मिळाला.

मला सदाशिव पेठ बघायचीय !

Submitted by हेमन्त् on 30 June, 2015 - 15:48

अनेकदा पुण्यात जावून सुद्धा या महान ऐ तिहासिक आणि सांन्स्कृतिक स्थळाचे दर्शन केले नाही … तरी ते करण्याचा इरादा आहे.
माझे काही मित्र ( जुने मुंबईकर आता पुणेकर ) हे ऐकताच थर थर कपू लागले .
" अरे X%^&(* झालास कि काय ? चाल घरी ये बिअर पिलावतो . असे हि म्हणाले ( ते चहाच नाही तर मद्य देतायत - म्हणजेच हे मुल पुणेकर नाहीत हे कळले आसेल्च.
तरी माझी विनंती खालील गोष्टी / सल्ला / सेवा मिळतील काय?

१) नकाशा - अचूक नकाशा मिळेल काय ? कारण इथे कोणीही पत्ता विचारले कि अपमान करतात !
२) गेंड्याच्या कातडीचा शर्ट - अपमान पचवायला !

'मोनोलॉग' - श्री. सचिन कुंडलकर

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

आज सकाळी तुमचं डेथ सर्टिफिकेट आणण्यासाठी महानगरपालिकेच्या कार्यालयात गेलो होतो. हातातली कागदपत्रं छोट्या खिडकीतून आत सारल्यावर आतला कारकून मला म्हणाला, “कुठे जाळणार?” मी भांबावून जाऊन गप्पच राहिलो, तसा तो म्हणाला, ”बॉडी कुठे नेणारे जाळायला? वैकुंठातच ना?”

प्रकार: 

"नाटक परीचय - 'अ'फेअर डील"

Submitted by हर्षल_चव्हाण on 7 May, 2015 - 17:27

....................आजच्या वीस - बावीस वर्षांच्या तरुणांना प्रेम म्हणजे काही भव्यदिव्य वाटत नसतं. या वयात येईपर्यंत, बर्‍याच होतकरू आणि प्रायोगिक प्रेमप्रकरणांचे ते प्रमुख सल्लागार बनलेले असतात. अशीच एक तरूणी, जी कायम प्रेमात पडत असते, आणि तिचे उठसूट ब्रेकअपही होत असतात, ती या नाटकाची प्रोटॅगोनिस्ट आहे. नाही, हे नाटक तिच्या अफेअर्स विषयी जरी सारखं सारखं भाष्य करून तरुणांना प्रेमाबद्दल डोस पाजत असलं, तरी एक्झॅक्ट्ली त्याबद्दल नाहीये. ती तिच्या सध्याच्या बॉयफ्रेंडबरोबर मिळून एक नाटकातलं नाटक लिहितीये, त्यातल्या चाळीशी पार केलेल्या जोडप्याच्या एक्स्ट्रा मॅरीटल अफेअरबद्दल आहे.

'आसक्त'चं 'रिंगण'

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

महाराष्ट्रातल्या नाट्यचळवळीला एक वेगळी दिशा देण्यात ज्या संस्थांचा महत्त्वाचा वाटा आहे, त्यांत पुण्याच्या ’आसक्त’ या संस्थेचं नाव अग्रभागी घ्यावं लागेल. 'तू', 'गार्बो', 'मात्र रात्र', 'काश्मीर काश्मीर', ’गजब कहानी’, ’उणे पुरे शहर एक’, ’चारशे कोटी विसरभोळे’, ’बेड के नीचे रहनेवाली’, ’F1/105’, ’तिची सतरा प्रकरणे’ अशी अत्यंत दर्जेदार नाटकं आजवर ’आसक्त’नं सादर केली आहेत. देशभरातल्या नामवंत रंगमहोत्सवांमध्ये ही नाटकं वाखाणली गेली आहेत. ’आसक्त’च्या नाटकांमुळे उत्तम प्रेक्षक तयार होण्यास मोठी मदत झाली आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही.

प्रकार: 

वस्ती जेव्हा रंगमंच बनते

Submitted by ललिता-प्रीति on 28 April, 2015 - 02:43

सात ते सतरा वयोगटातली अंदाजे २३० मुलं. त्यांचे वीस गट. प्रत्येक गटाने एकेक नाटिका बसवली. नाटिकांच्या विषयांत, मांडणींत, संवाद-प्रसंगांत अनेकदा बदल झाले. जवळपास चार महिने तयारी चालू होती, तालमी होत होत्या. सगळी लगबग, गडबड सुरू होती...

विषय: 

तडका - मराठी माणसांची शान

Submitted by vishal maske on 3 April, 2015 - 11:13

मराठी माणसांची शान,...

महाराष्ट्राची शान मराठी
महाराष्ट्राची जान मराठी
मराठी माणसांची अस्मिता
महाराष्ट्राची त्राण मराठी

जगभरात माय मराठीचा
गौरवणारा झेंडा आहे
मराठी माणसांची शान
मराठीचा अजेंडा आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - माणूसकीचे मारेकरी

Submitted by vishal maske on 2 April, 2015 - 21:58

माणूसकीचे मारेकरी

माणसांकडून निष्ठूरतेच्या
हद्दी ओलांडल्या गेल्यात
गतानुगतिकतेच्या भावना
माणसांतुन कोलांडल्या गेल्यात

इथे माणूसकीचे मारेकरी
मना-मनात जागत आहेत
माणसांशी वागताना माणसं
माणसांप्रमाणे ना वागत आहेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - हाकालपट्टी

Submitted by vishal maske on 29 March, 2015 - 21:07

हाकालपट्टी,...

कुणा-कुणाकडून काही गोष्टी
स्वत:पासुनच भटकू शकतात
कुणा-कुणाच्या काही गोष्टी
कुणा-कुणाला खटकू शकतात

मात्र भटकणारे अाणि खटकणारे
कधी गट्टीत,कधी कट्टीत असतात
अन् आपले वाटणारेही वेळेप्रसंगी
कधी-कधी हाकालपट्टीत असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - रंगभूमी