वझीर.. खेल खेल मे..!!

Submitted by उदय८२ on 11 January, 2016 - 08:46

खेल खेल मे
खेल खेल के
खेल खेल ये आ जायेगा.

बुद्धीबळ हा एक असा खेळ आहे. जो खेळतात तर दोन जण परंतू दोघेही दोन्हींकडून खेळत असतात. उत्तम बुध्दीबळपटू तो असतो जो स्वतःची चाल खेळून समोरच्याला आपल्या मनाप्रमाणे एक विशिष्ट चाल खेळायला भाग पाडेल. या पार्श्वभुमीवर चित्रपट आधारीत आहे. एक एक चाल सावधपणे खेळून वजीरला कसे नेस्तनाबूत करून बादशाहाला मात देणे हे बघणे उत्सुक्तेचे आहे.

चित्रपट सुरु होतो ते एका गाण्यापासून खरतर या चित्रपटात गाणी नसती तरी चालले असते पण या गाण्यातून चित्रपटाचा वेग कायम राखला जातो. ए.टी.स इन्स्पेक्टर दानिश (फरहान) आपल्या बायको-मुली सोबत शॉपिंग करत असताना अकस्मात एक घटना घडते. ज्याने दानिश याचे कौटुंबिक आयुष्य उध्वस्त होऊन जाते. दानिश एका चुकीच्या वागणुकीमुळे सेवेतून निलंबित होतो. सगळीकडून कोंडलेल्या अवस्थेत दानिशच्या आयुष्यात पंडीत ओमकारनाथ धर (अमिताभ बच्चन) येतात. ओमकारनाथ लहान मोठ्यांना बुध्दीबळ शिकवत असतात. काश्मीर मधे त्यांचे घरदार जाळल्यानंतर ते कुटुंबासहीत दिल्लीमधे स्थायिक होतात. पण इथे ही नियती त्यांचा पाठलाग सोडत नाही. बायको एका कारअपघातात मरण पावते आणि त्याच अपघातात ओमकारनाथ स्वतःचे दोन्ही पाय गमवून बसतात. एक आशेचा किरण त्यांची मुलगी निना असते परंतू ती सुध्दा एका मंत्रीच्या याझाद कुरेशी (मानव कौल) घरी त्याच्या मुलीला बुध्दीबळ शिकवायला गेली असताना जिन्यांवरून पाय घसरून पडल्याने ठार होते. ओमकारनाथ यांचा संशय कुरेशीवर असतो. ते दानिशला हाताशी धरून बंद झालेली मुलीची केस पुन्हा उघडण्याचा प्रयत्न करतात. हा प्रयत्न होऊ नये म्हणून "वझीर" ओमकारनाथ यांच्या मागे लागतो. त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करतो. परंतू ओमकारनाथ मागे वळत नाही. पुढे काय होते? "वझीर" जिंकतो की दानिश? कुरेशी
हे बघण्याकरीता चित्रपट बघावा लागेल.

चित्रपटाचा मुख्य प्राण आहे कथा आणि संवाद. काही बाबी सोडल्यास स्क्रिप्ट करकचून बांधली आहे. मुळात कथा उत्तम असल्याने पटकथा लिहायला सोपे गेले असेल. २-३ मुख्य चुका टाळता आले असते तर अजून चित्रपट खुलला असता. चित्रपटात रहस्य, अनपेक्षित वळण आवश्यकतेप्रमाणे अचूक आहे तरी थोडा प्रेडिक्टेबल वाटतो. अमिताभ बच्चन यांचा कायम व्हिलचेअरवर असलेला पंडीत ओमकारनाथ धर अप्रतिम झालेला आहे. निव्वळ चेहर्‍यावरून बरेच काही बोलून जातात. आपल्या अवस्थेमुळे मुलीच्या मृत्युविरुध्द हवा तसा लढा देता येत ही त्यांच्या मनात असलेली बोच त्यांच्या चेहर्‍यावरून संवादांवरून प्रेक्षकांपर्यंत अलगद पोहचते. अर्थात अभिनयाची चालतीबोलती युनिवर्सिटी जेव्हा परफॉर्म करत असते तेव्हा नि:शब्द होऊन पाहिले जाते. दानिशच्या भुमिकेत फरहान अख्तर एकदम फिट बसलेला आहे. बहुदा भुमिकेचा साचा त्याच्या मापाचा बनवला आहे असे वाटून जाते.
त्याच्या वाट्याला आलेले सर्व भुमिका समरसून केल्या आहे. विशेषतः अमिताभ यांच्या बरोबरचे सीन. कुठेही कमी पडलेला वाटत नाही. मंत्री कुरेशीच्या भुमिकेत मानव कौल यांना फारसे काही करता आले नाही. त्यांना करण्यासाठी १ - २ प्रसंग सोडल्यास त्यांना वार्यावर सोडण्यात आले आहे. त्यांच्यासाठी पार्ट लिहायचा राहून गेला असे वाटते. त्याचा साथीदार उगाच चेहर्‍यावर रहस्य घेऊन फिरताना दाखवले आहे. "काम का काजका दुश्मन अनाज का" ही ओळ त्याच्यासाठी लिहिली आहे. आदिती राव हीची भुमिका छोटी आहे पण लक्षात राहते. दोन्ही लहान मुलींची भुमिका चांगली आहे खास करून मझेल व्यास, नील नितीन मुकेश याची आवश्यकता खर तर नव्हती. तो नसता तरी चालले असते. जॉनची ही तीच कहानी तो ही का घेतला त्याच्या जागी अजुन सटरफटर ही चालला असता. कशाला वाया घालवायचे?

बेजॉय नांबियार हे धागे शेवटी एकत्र आणण्यात यशस्वी ठरले आहे. वर सांगितल्याप्रमाणे २-३ धागे व्यवस्थित विणले गेले असते तर अनपेक्षित धक्यांची मालिका मधे खंडीत झाली नसती. तडका झणझणीत शेवट पर्यंत राहिला असता. तरी चित्रपटाचा वेग शेवट पर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. उगाच जेपी दत्तासारखे लांबड लावत बसले नाही. दानिशच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना १का गाण्यात व्यवस्थित पॅकिंग करून प्रेक्षकांच्या समोर ठेवल्या आहे. त्यातून दिग्दर्शकाला नेमके काय दाखवायचे आहे आणि त्याला कुठल्या गोष्टींना किती महत्त्व द्यायचे आहे हे स्पष्ट होते. कमीत कमी वेळेत प्रचंड आशय दाखवण्याचे धनुष्य नांबियार सहजतेने पेलतात.
शैतान, डेव्हिड यांसारख्या चित्रपटांमधुन त्यांनी याआधीही केले आहे. रिफ्लेक्शन या मोहनलाल अभिनित सायलेंट शॉर्ट फिल्म मधून ही चुणूक रसिकांना दिसून आलेली.

तेरे बिन हे एक गाणे सोडल्यास बाकी कोणतीही गाणी लक्षात राहत नाही. (तेरे बिन सुध्दा विसरून गेलोय) त्यामुळे त्यांच्यावर काही लिहिणे अन्याय माझ्यावर होईल.

चित्रपट १०० पैकी ६५% लोकांना आवडला तर बाकिच्यांनी त्याच्या महत्त्वाच्या उणीवांवर बोट दाखवले. बर्‍याच जणांना खरच वाया घालवले आहे. या लोकांना घेतलेच का आहे चित्रपटात असा प्रश्न चित्रपट पाहताना मनात येतो. नील , जॉन इब्राहिम, प्रकाश बेलावडी (मद्रास कॅफे मधला श्रीलंकेत असणारा रॉ ऑफिसर), अवतार गील, सीमा भार्गव असे चांगल्या कलाकारांना काहीच वाव नाही आहे. बरेच प्रसंग प्रेक्षक सहज ओळखतात. त्यात काही ट्विस्ट आणले असते तर लज्जत वाढली असती उदा. पंडीत दानिशला सांगतात की ते त्याच्या मुलीला बुध्दीबळ शिकवत होते. तीची आई माझ्याकडे घेऊन यायची. नंतरच्या प्रसंगात जेव्हा पंडीत आदितीच्या घरी जातो तेव्हा तिने ओळखले नसते तर अनपेक्षित धक्का प्रेक्षकांना बसला असता. पण असे होत नाही. असे बरेच प्रसंग चित्रपटात आहे. जिथे प्रेक्षक स्वतःहून ट्विस्टची अपेक्षा ठेवून असतात परंतू तो मिळत नाही. अर्थात सगळेच आपल्या मनासारखे होत नाही. हे ही खरे आहे. चित्रपट बुध्दीबळाच्या खेळावर आधारित आहे म्हणतात परंतू फक्त बुध्दीबळ खेळताना दाखवले आहे. बुध्दीबळाच्या चाली १ सोडून कुठेही दिसल्या नाही. हा सर्वात मोठा वीक पॉईंट चित्रपटाचा म्हणता येईल. एकाच बाजूने खेळणारा वझीर म्हणून बहूदा ओळखला जाईल. कारण दुसर्‍या बाजूचा खेळ लिहायचा राहून गेला.

ओव्हरऑल चित्रपट बघण्यासारखा तर आहे. अमिताभ फरहानसाठी तर एक शो "खेल खेल मे" बनता है.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रपट बुध्दीबळाच्या खेळावर आधारित आहे म्हणतात परंतू फक्त बुध्दीबळ खेळताना दाखवले आहे. बुध्दीबळाच्या चाली १ सोडून कुठेही दिसल्या नाही. हा सर्वात मोठा वीक पॉईंट चित्रपटाचा म्हणता येईल. >> +१००
मला वाटलेलं कि शेव्टच्या प्लॉटमध्ये बुध्दीबळाच्या चालीतून समजेल कि वजीर कोण आहे पण तेही फक्त गाण्याचाच भाग होता.

उत्तम परीक्षण.
" अर्थात अभिनयाची चालतीबोलती युनिवर्सिटी जेव्हा परफॉर्म करत असते तेव्हा नि:शब्द होऊन पाहिले जाते.".....खूप छान लिहिलंय.

चीत्रपटअ च्या नावाने अनेक प्राककरचे आखाडे बांधून आपण चित्रपट पहायचा प्रायत्न करतो . पण कथा एका सरळ मार्गाणने जाते म्हणजे डाव 3 4 चाळीत सराळ संपतो अस वाटते.

मला तर खूप आवडला हा चित्रपट... अमिताभ बच्चन आणि फरहान अख्तर तर सॉलिडच आहेत..
फक्त शेवट थोडा बदलायला हवा होता.. अगदी सगळं स्पष्ट करण्याची काहीच गरज नव्हती.. बाळबोध प्रेक्षकांना समोर ठेऊन केलाय शेवट असं वाटतं...

मला तरी बेक्कार वाटला.

अजून खुलवता आला असता. पण खूपच प्रेडीकटेबल आहे. बुद्धीबळ खेळाचा वापर केलेला दाखवणे जरूरी न्हवता तर इथे ते एक प्रतीक( तिरकस चालीचे) म्हणून घेण्यात आले असावे.
पण तरीही, मूळात ते सर्व घडवून आणणारा (तो) काहीच पटत नाही. अगदीच अचाट आणि अतर्क्य आहेत सीन्स. (जसे आग घडवून आणणे, वगैरे)