पाकिस्तानी मालिका

पाकिस्तानी मालिका

Submitted by जिज्ञासा on 3 January, 2022 - 11:46

पाकिस्तानी मालिकांचा चस्का लागून आता ६/७ तरी वर्षं झाली असतील. वेड लागल्यासारख्या मालिका पाहिल्या सुरुवातीला – total binge watching. बरेच दिवस माबोवर झी जिंदगीच्या धाग्यावर लिहित होते पण नंतर ते थांबलं. ह्या मालिकांमुळे मी भरपूर प्रमाणात पाकिस्तानी टीव्ही पाहीला/पाहते आहे – म्हणजे talk shows, promotional कार्यक्रम, मुलाखती वगैरे वगैरे. I was totally into it! आता थोडीशी बाहेर आले आहे त्यातून!

सदके तुम्हारे!

Submitted by जिज्ञासा on 4 April, 2015 - 16:22

माहीरा खानचे हमसफर मधले काम आवडले होते म्हणून तिची नवीन, सध्या सुरु असलेली मालिका सदके तुम्हारे (Sadqay tumhare) YouTube वर बघायला घेतली. आता ह्या २७ भागांच्या मालिकेचा शेवटचा एक भाग उरला आहे. त्यात जे होईल ते होईल पण त्या आधीच ही मालिका माझ्या आवडत्या मालिकांमध्ये जाऊन बसली आहे.
लेखक/पटकथाकार खलील उर रेहमान कमर (Khalil-Ur-Rehman-Qamar) ह्यांची ही मालिका त्यांच्या स्वतःच्या आयुष्याची कहाणी आहे असं त्यांनी सांगितलं आहे. मालिकेची कथा बघता जर ही गोष्ट खरी असेल तर सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भूत असतं ह्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होईल!

और जिंदगी बदलती है!

Submitted by जिज्ञासा on 1 December, 2014 - 15:33

नशा फक्त वाईट गोष्टींचीच चढते असं नाही. चांगल्या गोष्टींची देखिल नशा चढते! आणि मला सध्या पाकिस्तानी टीव्ही मालिकांची नशा चढली आहे. तशा खूप पाकिस्तानी मालिका पाहिल्या नाहीयेत मी अजून, हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच पाहिल्यात पण त्यांनी मला जे दिलं आहे ते आजवर कोणत्याच हिंदी/मराठी/इंग्रजी मालिकेने दिलेलं नाहीये! अर्थात हे माझं मत आहे. आणि ही मालिकांना यशस्वी मानण्याची एकमेव फुटपट्टी नव्हे. कारण कोणाला कधी, कशात काय सापडेल ते सांगता येत नाही. दगडात देव शोधणारी माणसं आपण! चांगल्या कलाकृतीचा माझा निकष एकच – तिने मला लिहायला भाग पाडले का? माझ्यातला कलाकार/लेखिका जागी केली का? सुदैवाने हो!

धूप किनारे

Submitted by जिज्ञासा on 23 November, 2014 - 13:45

झी जिंदगी ने पाकिस्तानी मालिका दाखवायला सुरुवात केल्यापासून मला त्यांचं वेड लागलं आहे. अर्थात मी त्या सर्व युट्युबवर शोधून बघते आहे. सुरुवातीला हम टीव्ही वरच्या गेल्या दोन तीन वर्षांत बनलेल्या मालिका पाहिल्या. पण खूप पूर्वी जेव्हा पी टीव्ही हा आपल्याकडच्या दूरदर्शनसारखा एकमेव चॅनेल होता तेव्हाच्या पाकिस्तानी मालिका देखिल खूप सरस आहेत. त्यातलीच एक अत्यंत गाजलेली मालिका म्हणजे धूप किनारे (शब्दशः अर्थ: उन्हाच्या किनारी, at the edge of sunshine). १९८७ साली (२७ वर्षांपूर्वी) ही मालिका प्रदर्शित झाली आणि संपूर्णपणे युट्युबवर उपलब्ध आहे.

Subscribe to RSS - पाकिस्तानी मालिका