इतिहासाच्या पाऊलखुणा : राजा दिनकर केळकर संग्रहालय

Submitted by ferfatka on 1 May, 2015 - 13:15

ऐतिहासिक पुरातन वस्तूंचा नसता छंद न करता तो वाढवून शासनाला अर्पण करणा:या काकासाहेब केळकर यांनी उभारलेलेले संग्रहालय म्हणजे ‘राजा केळकर संग्रहालय.’

प्रत्येकाला काही ना काही तरी छंद असतोच. जुनी नाणी, एकाच क्रमांकाच्या नोटा, विदेशी नोटा, दस्तऐवज, स्टँप, कविता करणो, नट नाटय़ांची चित्रे, क्रिकेटमधील खेळाडूंची चित्रे व स्कोर याचे रेकॉर्ड ठेवण्याचे छंद असतात. लहानपणी सुरू झालेला हा छंद पुढे अनेक कारणांमुळे मागे पडतो. मग घराच्या माळय़ावर, अडगळीत पडलेला हा छंद धुळ खात इतिहासजमा होऊन जातो. मात्र अनेकजण याच छंदाला आपले जीवन समर्पित करून आयुष्यातील अनेक वर्षे हा छंद जोपासतात. छंदाने वेडे झालेल्या काकासाहेब केळकर हे मात्र यातील ‘कोहिनूर’ हिराच ठरतात. ऐतिहासिक पुरातन वस्तूंचा नसता छंद न करता तो वाढवून शासनाला अर्पण करणा:या काकासाहेब केळकर यांनी उभारलेलेले संग्रहालय म्हणजे ‘राजा केळकर संग्रहालय.’

DSCN1142.jpg

पुरातन भांडीकुंडी, चूल, वस्त्रे पाहताना हे काय पाहत आहेत. असा प्रश्न नवीन पिढीला पडल्यावाचून राहत नाही. या वस्तू प्रत्यक्ष पाहताना केवढा आनंद होतो. प्रदर्शनातील प्रत्येक वस्तू आपल्या इतिहासाची मूक साक्षीदार आपल्याची बोलल्याचा भास होतो. वन बीएचके व टू बीएचके, प्लॅट संस्कृतीत जुन्या वस्तू केव्हाच काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. म्हणूनच या वस्तूंना एवढे महत्त्व आहे. पुणोकर म्हणजे इतिहासप्रेमी, परंपरा व जुना वारसा जतन करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. एका व्यक्तीच्या अफाट कष्टांतून, चिकाटी आणि अथक मेहनतीतून उभे राहिलेले हे संग्रहालय आहे. दैनंदिन जीवनातील पारंपरिक कलात्मक वस्तूंचा खजिना येथे आहे.

पद्मश्री डॉ. दिनकर गंगाधर तथा काकासाहेब केळकर

10 जानेवारी, 1896 रोजी करंजे, पश्चिम महाराष्ट्र येथे जन्म :झाला. वास्तव्याला पुण्यातच होते. त्यांचे संपूर्ण शिक्षण बेळगाव व पुणे येथे झाले. 1915 पासून अज्ञातवासी या टोपणनावाने ते काव्यलेखन करत असत. आपल्या हयातीची 70 वर्षे हे संग्रहालय उभे करण्यासाठी त्यांनी खर्च केली. पुरातन वस्तूंच्या प्रेमाने भारावलेल्या काकासाहेबांनी या वस्तूंचा संग्रह जमविला हा पुराणवस्तुंचा अमोल ठेवा त्यांनी 1962 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व खात्याकडे हे सुपूर्द केला. हे त्यांचे दातृत्वही अनोखेच म्हणता येईल. इतिहास क्षेत्रतील त्यांच्या या अपूर्व कार्याबद्दल 1978 साली पुणे विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदवी देऊन गौरव केला. हा संग्रह करताना त्यांच्या पत्नी कमलाबाई केळकर यांचीही मोलाची साथ मिळाली. डॉ. दिनकर केळकर यांनी आपल्या दिवंगत मुलाच्या स्मृतिप्रित्यर्थ संग्रहालयाला ‘राजा’ केळकर असे नाव दिले आहे. संपूर्ण भारतभ्रमण करून जमवलेल्या 21,000 वस्तूंचा संग्रह या ठिकाणी आहे. या वस्तू जमवण्यासाठी किती वणवण केली असेल हे येथील वस्तू पाहून समजते. 1922 साली एका खोलीत सुरू झालेले हे संग्रहालय वाडय़ातील सा:या खोल्यातून पसरले आहे. संग्रह जमा करण्यासाठी प्रसंगी त्यांनी आपल्या पत्नीचे दागिनेही गहाण विकले. एवढेच नव्हे तर पत्नीला वारसाहक्काने मिळालेले करमाळ्याचे घरही विकले. अशा या संग्राहकाचे 1990 साली निधन झाले.

संग्रहालय

संग्रहालय एकूण 9 दलानामध्ये असून, तीन मजल्यांमधे विभागले आहे. वनिता कक्षामध्ये भारतीय नारीच्या जीवनशैलीवर आधारित आहे. भारतीय नारीच्या दिवसाची सुरूवात कशी होते. याची साधारण कल्पना या दालनात होते. पाय घासण्याचे दगड, केस वाळविण्याच्या व विंचरण्याच्या फण्या, कुंकवाचे करंडे आदी वस्तू येथे आहेत. भारतीय चित्रकला या विभागात भारतीय चित्रकला मांडण्यात आली आहे. ही चित्रे 17 ते 19 व्या शतकातील असून, त्यात कांचचित्रे, पटचित्रे आणि कागदावरील चित्रे यांचा समावेश आहे. स्वयंपाक घरातील भांडी या पहिल्या मजल्यावरील दालनात ठेवण्यात आली आहे. यात विवाहकार्यामध्ये मोठय़ा प्रमाणात अन्न तयार करण्यासाठी लागणारी भांडी मांडण्यात आली आहे. यात पाणी आणि धान्य साठविण्याची सोय होत असे. विळय़ा, मसाला पाळी, विविध साहित्यातील लाकूड, धातू, पाषाण, भाजकी मातीपासून तयार केलेल्या वस्तूंचा समावेश आहे.

21.jpg

संगीत वाद्ये पहिल्या मजल्यावर आहेत. यात तबला, बासरी, सनई, सितार, तानपुरा, टाळ, झांज, चिपळय़ा यांचा समावेश आहे. दुस:या मजल्यावरील मूर्तीकला आणि विवि प्रकारचे दिवे, समया, नेपाळ येथील सूर्यदिवा, कदंबवृक्ष दीप आपले लक्ष वेधून घेतात. याच बरोबर अडकित्ते ,दौती, हस्तिदंत, खेळणी, तसेच बाहेर जाण्याच्या मार्गावर मंदिरे आणि प्राचीन वाडे यांचे रेखीव, नक्षीदार दरवाजे व खिडक्या मांडण्यात आल्या आहेत. यात राजस्थानी शैलीतील दरवाजे आहेत. 13 व्या शतकातील श्री विष्णूची दगडातील कोरीव मूर्ती आपले लक्ष वेधून घेते. तळमजल्यावरील ‘एल पॅसेजच्या प्रवेशद्वारपासून सुरेख कोरीव दरवाजे आणि खिडक्या आकर्षक आहेत. 1857 मधील स्वातंत्र्यसेनानी रंगो गुप्ते यांना इंग्लंडला मिळालेले चांदीचे तबक, 150 वर्षांपूर्वीचा नक्षीदार देव्हारा, 1782 मधील भक्तीविजय ग्रंथाच्या हस्तलिखिताची प्रत, पानिपत युद्धातील पेशवेकालीन पेटारा, पेशव्यांचे सरदार ओंकार यांचा लाकडी देव्हारा, 125 वर्षे जुना असलेला लाकडी पाळणा. चूल फुंकणीपासून ते उंटाच्या कातडीपासून तयार केलेल्या तेल्याच्या मोठय़ा रांजणार्पयत तसेच दैनंदिन वापरातील अनेक छोटय़ा मोठय़ा गोष्टी त्यांनी जमा केल्या आहेत. गुजराथ, राजस्थान, कर्नाटक, केरळ अशा ठिकठिकाणच्या लाकडी, दगडी कोरीव कामाचे नमुने, घरगुती वस्तू, दिवे, कुलपे, अडकित्ते, दौत, लेखणी संग्रह येथे पाहण्यास मिळतो. दिवे, जहाजावरील दिवे, गंजीफा , सोंगट्या, पानदाने, पेटारे, दरवाजे, विविध आकार व रुपातील गणोश मूर्ती, कात्र्या, कळसूत्री बाहुल्या, लहान मुलांचे कपडे, धान्य साठवण्याचे कोठार, जुन्या काळातील टांगा पाहताना आपण ऐतिहासिक काळात जातो. याचबरोबर शस्त्रत्रे दालनात 18 व्या शतकातील तलवारी, मूठ, म्यान, खंजीर,कटय़ार, चिलखत, ढाल, ठासणीची बंदूक, बंदुकीची दारू ठेवण्याची कुपी, भाले आदी शस्त्रत्रे येथे आहेत.

मस्तानी महाल :
Mastani.jpg
मस्तानी ही शूर सेनानी थोरले बाजीराव पेशवे यांची पत्नी. थोरले बाजीराव पेशव्यांनी मस्तानीसाठी पुण्याजवळ असलेल्या कोथरूड येथे 1734 मध्ये महाल बांधला. कालांतराने तो नामशेष झाला. पडझड झालेला मस्तानीचा महाल केळकरांनी आणून त्यातील काही भाग कुशल कारागीरांच्या मदतीने काढून आणून त्याची पुर्नरचना केली आहे. मोठ मोठे झुंबर, दिवे लावण्याचे झुंबर, कोरीव नक्षीकाम पाहताना त्यावेळचा पेशवाई थाट लक्षात येतो.

महाराष्ट्राचा व एकूणच संपूर्ण भारताचा गेल्या कित्येक वर्षांचा इतिहास या माध्यमातून आणण्याचे महत्वाचे कार्य हे संग्रहालय करीत आहे. डॉ. केळकरांनी भारतीय संस्कृतीचा हा अमूल्य ठेवा वर्तमानकाळातही आपल्या पुढील पिढीच्या भविष्याकालासाठी उपलब्ध केला आहे. काळाच्या ओघात चौसोपी वाडे जाऊन घरे झाली, घरे जाऊन आज इमारती उभ्या राहिल्या. त्यामुळे वन बीएचके, टू बीएचके मध्ये जागाही कमी झाली. प्लास्टिकचे युग सुरू झाले. वस्तू वापरा व फेकून द्या ‘युज अॅंड थ्रो’ पद्धतीमुळे जुने ते सोने ही संकल्पना पडद्याआड जाऊ लागली आहे. पण आपल्या आजच्या पिढीला, पुढच्या पिढीला ही संस्कृती, हा वारसा, परंपरा, इतिहास समजावा म्हणून काही छंद जोपासणारे संग्राहक अशा वस्तूंचा संग्रह करतात.

पुण्याची शान असलेल्या राजा दिनकर केळकर संग्रहालयातील दुर्मिळ वस्तूंचा ठेवा आता अधिक समृद्ध होऊ लागला आहे. गेल्या पाच वर्षांत पाचशेपेक्षा अधिक वस्तू संग्रहालयाला भेट मिळाल्या आहेत. शिवकालीन तसेच पेशवेकालीन घराण्यांमध्ये तसेच त्यांच्याकडे असणा:या सरदार घराण्यांमध्ये अनेक दुर्मिळ व ऐतिहासिक पुरातन वस्तू असतात. मात्र, सर्वांनाच त्या वस्तूंचे मूल्य (पैशाचे नव्हे) कळतेच असे नाही. ज्यांना त्या वस्तूंचे महत्त्व कळते त्यांना त्या वस्तू भविष्यातही टिकाव्यात असे वाटते. हीच भावना मनात असलेल्या ब:याच जणांनी त्यांच्या घरातील दुर्मिळ आणि पुरातन वस्तू संग्रहालयाला भेट दिल्या आहेत. सध्या असलेल्या संग्राहलयाच्या जागेअभावी सर्वच वस्तू प्रदर्शनात मांडलेल्या नाहीत. पुण्यातील बावधनजवळ सुमारे सहा एकर जागेत राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे स्थलांतर करण्यात येणार असल्याच्या बातम्या मध्यंतरी वर्तमानपत्रत आल्या होत्या.

संग्रहालयातर्फे माहितीपुस्तिका व पोस्टकार्डही विक्रीस उपलब्ध आहेत. तेव्हा जमेल तेंव्हा हा वारसा आपल्या पुढील पिढीला अवश्य दाखवा. पर्यटन किंवा सहलीला म्हणून पुण्यात आलात किंवा खुद्द पुण्यातील असूनही देखील कधी हे संग्रहालय पाहिले नसेल तर आवजरुन पहावे. जेणोकरून भारतीय संस्कृती व त्यातून दिले जाणारे संस्कार जपले जातील. पुरातन वस्तू आपल्या संस्कृतीच्या पाऊलणखुणाच आहे. तुमच्या आमच्या घरातल्या काळाच्या पडद्याआड गेलेल्या वस्तूंची माहिती व्हावी, परंपरेची ओळख व्हावी या उद्देशाने केळकरांनी हा ठेवा पुढील पिढीसाठी राखून ठेवला आहे.

  1. कसे जावे : पुण्यातील प्रसिद्ध असा लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कु मठेकर रस्ता, मंडईपासून या ठिकाणाहून कोणाला विचारले असता सहज जाता येईल.
  2. प्रवेश फी : लहान मुले (3 ते 12 वर्षे) : 10 रुपये, प्रौढ : 50 रुपये
    संग्रहालयाची वेळ : सकाळी 9.30 ते सायंकाळी 6 र्पयत (सायं. 5.30 नंतर तिकीट विक्री बंद)
  3. सुटीचे दिवस : 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, अनंत चतुर्दशीपत्ता : 1377/78 शुक्रवार पेठ, राजा केळकर संग्रहालय, नातूबाग,
  4. दूरध्वनी : 24482101 / 24461556
  5. बघण्यासाठी लागणारा वेळ : सुमारे 1 तास (थोडी घाई), निवांत पाहण्यासाठी किती वेळा ही.

वरील लेख आपल्याला कसा वाटला, काही चुका असल्यास त्या जरूर येथे कॉमेंटसमध्ये लिहून कळवा.
http://ferfatka.blogspot.com/2015/05/blog-post.html

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

५ वीत असताना एकदाच पाहीले नन्तर जमलेच नाही. ते तीन आरसे ( ज्यात आपण जाड, बुटके वगैरे दिसतो ) पाहुन मी, माझी मामेबहीण व भाऊ हसून हसून आडवे झालो होतो. लहानपणी तेवढीच एक मजा आली होती. आता मुलीला दाखवायला पाहीजे. धन्यवाद फेरफटका.

मस्त..

लहानपण शुक्रवार आणि सदाशिव पेठांमधे गेल्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या प्रत्येक नातेवाइकाच्या निमित्ताने 'राजा केळकर'ला भेट देणे व्हायचेच. आणि आवडायचेही.
दर सुट्टीत राजा केळकर एकदातरी अनिवार्य असे.
म्युझियम या प्रकाराचे गांभीर्य कळण्याचे वय नव्हते तेव्हापासून म्युझियम बघायची सवय राजा केळकर म्युझियमने लावली.
हल्लीच बर्‍याच वर्षात जाणे झाले नाहीये.

आमचे बाबा आम्हाला असल्याच ठिकाणी घेऊन जात असत पुण्यात आलो की दरवेळी केळकर संग्रहालय विजिट नक्की असायची!! केळकर संग्रहालयातच इतिहासाचे प्रेम जागृत झाले किती ती कमिटमेंट राव!!! शेकडो प्रकारचे अड़कित्ते फ़क्त!! जरीकामाचे नमुने झाले मसनदी झाल्या!! जे एल मेहता चा पार्ट ३ समक्ष पान अन पान जगल्याची भावना येते तिथे.

शाळेत असताना बाहेरगावातून आलेल्या पाहुण्यांना केळकर म्युझियम दाखवायची ड्यूटी अनेक वर्षं पार पाडली होती. पाठ झालं होतं कुठे कुठे काय काय आहे ते. एवढ्या मेहनतीने संग्रह केलेल्या वस्तू पाहून थक्क व्ह्यायला होतं. शाळा संपली तसं इकडे जाणंही संपलं. आता पुण्यात गेल्यावर आवर्जून भेट द्यावी म्हणतो.
छान ओळख.