कायदाविषयक माहिती हवी आहे

प्रस्तावः आंतरजालीय कला सार्वजनीकरीत्या वाटण्याची परवानगी आणि त्यावरील चर्चेचे आवाहन

Submitted by स्पॉक on 14 May, 2015 - 14:44

माबोवरील अनेक लेखकांच्या कविता / गझला मला खुप आवडतात.
माझ्यासारखीच आवड असणा-या मित्रांना आणि ओळखितील ईतरांसोबत, ही कला वाटावी असे मला वाटते.
ब-याचवेळा या कलेवर आम्ही, आमच्या अल्पमतीने थोडीफार चर्चाही करतो.

ईथे कला म्हणजे लेख, कथा, कविता, गझल, पा.कृ किंवा प्रकाशचित्र अपेक्षीत आहे.

यामधे पेटेंटेड किंवा एखाद्या विशिष्ट कामासाठिचे कॉपीरायटेड मटेरीयल जसे की पी.एचडी संदर्भातले लेखन किंवा एखाद्या संशोधना संबंधी कॉपीरायटेड लेख अपेक्षीत नाही.

मॅटर्निटी सुट्टीचा कालावधी

Submitted by जाईजुई on 19 December, 2013 - 02:20

मध्यंतरी कोणाकडून तरी मॅटर्निटी लिव्ह १८० दिवस झाल्याचे वाचले. बेस्टमधील कोणा कर्मचार्‍याला (स्त्री) सुट्टी मिळाल्याचेही कळले.

परंतु, आयटी क्षेत्रात अजुनही ९० दिवस भरपगारी सुट्टी दिली जाते. आमच्या कंपनीत त्यापुढे स्वर्जित सुट्टी व त्यानंतर जास्तीत जास्त १ महिना बिनपगारी सुट्टी (ती ही मॅनेजमेंटच्या निर्णयानुसार) दिली जाते.

नेटवर शोधल्यावर १९६१चा कायदा मिळाला परंतु मला त्यातले काही नीट कळले नाही.

विषय: 

खाजगी गुप्तहेर

Submitted by स्पॉक on 13 May, 2013 - 04:25

आमच्या घरी झालेल्या चोरीबददल माहिती काढणे आणि पुरावे शोधणे यासाठी मुंबई - नवी मुंबईतील विश्वासू आणि प्रामाणिक खाजगी गुप्तहेर व्यक्ती / संस्थांची माहिती हवी आहे.
माबोवर कुणी कधी खाजगी गुप्तहेराची मदत घेतली असल्यास तुमचे अनुभव लिहा.
सरकार प्रमाणीत (govt approved or registered) खाजगी गुप्तहेर असतात का? असल्यास त्यांची यादी कुठे बघावी?
Double Cross करण्याचा धोका किती असतो? फसवले गेल्यास ग्राहक कायद्यानुसार दाद मागता येते का?
असे खाजगी गुप्तहेरामार्फत माहिती काढणे / पुरावे गोळा करणे भारतात कायदेशीर आहे का?

विषय: 

तुमच्या गाडीतलं पेट्रोल संपलंय का?

Submitted by आयडू on 12 February, 2011 - 03:25

तुमच्या गाडीतलं पेट्रोल ( इंधन!) संपलंय का?

तुमची गाडी रिझर्व्हला आली आहे का?

वरीलपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर जर होय असेल अन् जर तुम्ही बाटली / कॅन वगैरे घेऊन पेट्रोल पंपावर सुटं पेट्रोल मागायला गेलात तर कदाचित तुम्हाला सुटं पेट्रोल मिळणार नाही! अगदीच लकी असाल तर मिळेल ही कदाचित.

पण तुमच्यावर कधी अशी वेळ येऊ नये म्हणून हा लेखनप्रपंच -

गुलमोहर: 
Subscribe to RSS - कायदाविषयक माहिती हवी आहे