कला

घरबसल्या उत्तरायण - दक्षिणायन

Submitted by मामी on 21 November, 2014 - 11:02

या घरात रहायला आल्यापासून सकाळी उठून लिविंग रुममध्ये आलं की समोरच सुर्योदय दिसतो मला. रोजचे नवे विभ्रम! कधी कधी खूप मनोरम देखावा असेल तर फोटोही काढले जातात. आताशा म्हणजे गेल्या वर्षीपासून व्हॉट्सअ‍ॅम्प ग्रुपवर 'गुड मॉर्निंग'च्या मेसेज बरोबर रोज सुर्याचाही फोटो टाकण्याची सवयच झाली आहे. ग्रुपवरची मंडळीही वाट बघत असतातच.

माझ्या या घरात हिवाळ्यात सूर्य नेमका समोरच उगवतो. अर्थात मुंबईचा हिवाळा तो! उन्हं चांगलीच तापतात कधी कधी. उन्हाळ्यात मात्र सूर्य एक वळण घेतो आणि उन्हाळ्याची सकाळ बर्‍यापैकी सुसह्य करतो.

कुठल्याही आधाराशिवाय

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 16 November, 2014 - 02:33

१९९६ सालची हकीगत आहे. मी कुस्रो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे येथे विद्युत अभियांत्रिकीच्या पदविकेचा अभ्यासक्रम शिकत होतो. शेवटचे सत्र सुरू होते आणि आम्हाला एक विषय निवडून त्यावर सेमिनार सादर करावयाचा होता. त्या काळी ओव्हर हेड प्रोजेक्टर वर स्लाईडस दाखविण्याची पद्धत होती. याकरिता ट्रान्स्परंट शीट (पॉलिथिन पासून बनलेल्या) विकत घेऊन त्यावर फोटोकॉपी करून घ्याव्या लागत. याकरिता ट्रान्स्परंट शीट चे १० रुपये आणि त्यावर फोटोकॉपी करावयाचे ३ रुपये असा प्रति शीट १३ रुपये खर्च येत होता.

'चांदोबा'तील हार, गजरे आणि माटुंगा मार्केट

Submitted by मामी on 14 November, 2014 - 22:49

'चांदोबा' मासिकातील चित्रे फारच भन्नाट असायची. एक अदभूत जग होतं ते. वेगळ्याच प्रकारचे पेहराव, दागिने, चेहर्‍याची ठेवण असलेली पात्रं त्या चित्रांतून दिसत. त्याचबरोबर देवादिकांनी घातलेले मोठ्ठे आणि विविध प्रकारचे फुलांचे हार असत. चित्रातल्या बायका भरपूर गजरे माळलेल्या दिसत. चांदोबातील या चित्रांवर दाक्षिणात्य ठसा होता.

तेच ते 'चांदोबा'तले हार माटुंग्याच्या बाजारात बघायला मिळतात. अतिशय आकर्षक आणि नक्षीदार रचना केलेले हे हार बघून त्या कलाकारांचं कौतुकच वाटतं. काही हार तर खास दाक्षिणात्य स्टाईलचे - हे भलेमोठ्ठे. माणसापेक्षाही जास्त उंचीचे.

माझा रांगोळीचा व्हिडीओ..3

Submitted by अर्चना पुराणिक on 12 November, 2014 - 15:31

माझा रांगोळीचा व्हिडीओ कसा वाटला सांगा Happy

My Sanskar Bharti Rangoli Happy

http://www.youtube.com/watch?v=eceeARKcAYs&feature=youtu.be

विषय: 

मागे वळून पहाताना

Submitted by चाऊ on 12 November, 2014 - 08:20

ठेच लागली म्हणून
कळ दाबून, उद्वेग बाजूला सारुन
थबकून मागे वळून पहाताना
दिसली हिरवळ,
पार केलेल्या वाटेवरची
दूरवरचे जिंकलेले निळे डोंगर
अनुभवलेले हास्याचे खळाळ
चढताना उभे कातळ
धडपडतानाचा थरार
आणी कोसळताना
मिळालेले समर्थ आधार
नाचणा-या मोराच्या
पिसा-यातल्या डोळ्यांसारखे
लखलखणारे लाख क्षण
पापण्यांच्या कडांना थबकलेल्या
ह्ळुवार थेंबांचे सल
आणी ते मायेने टिपणा-या
स्निग्ध स्पर्शाची सय
किलबिलणारी ममत्वाची
असंख्य कोवळी पाखरं
ठेच लागली म्हणून
आलेली कळ दाबून

माननीय ख्रिस्तोफर नोलन यांस,

Submitted by अश्विनीमामी on 9 November, 2014 - 20:13

स्टॉकींग फ्लॉवर्स

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 9 November, 2014 - 14:38

स्टॉकिंगची जाळीदार फुले मी शाळेत असतानाच मैत्रीणीकडून शिकले होते. पुन्हा एकदा करुया व मुलीला शिकवूया ह्या उद्देशाने मी ही फुले मुलीच्या मदतीने तिला शिकवत शिकवत केली. वॉट्स अ‍ॅप वर फोटो पाहून माझ्या काही माबोकर मैत्रीणींनी ह्याची कृती विचारली होती. ती खालील प्रमाणे. अजून खुपसे प्रकार नेटवर सापडतील ह्या फुलांचे वेगवेगळे आकार आणि गुच्छही.

मी हे सामान दादर वरून सौभाग्य वस्तू भांडार मधुन घेतले. त्यांना स्टॉकिंगच्या फुलांचे सामान द्या सांगितले की ते खालील सगळ्या वस्तू दाखवतात. रंग आपल्या आवडीनुसार घ्यायचे.

विषय: 
शब्दखुणा: 

मेहेंदी

Submitted by टीना on 27 October, 2014 - 12:11

खुप दिवस झाले हा धागा काढायचा विचार करत होती आता जाऊन वेळ मिळाला ..

जवळपास सर्वांना मेहेंदी काढायला आवडतं .. मलासुद्धा ..
पन हातभर काढण्यापेक्षा हितभर काढायला मला जास्त आवडत .. कारण दुनीयाभराचा कंटाळा आणि संयमाचा अभाव ... त्यातही वेळेवर डोक ब्लँक होण .. खुप मुड आला तर कुठ त्या मेहेंदीच्या कोनाला माझा हात सहन करावा लागतो Lol ..

यातलेच काही मुड असताना काढलेले हात ..

यातले डिजाईन्स नेट च्या कॄपेने हाती अवतरलेल्या .. तुम्हीसुद्धा तुमच्या मेहेंदी डिजाईन्स शेअर करा (आवडलेल्या समोरच्या व्यक्तीला ढापता येईल ही परमिशन मनोमन देऊन Wink )

१. ही दसर्‍याला काढलेली (हातावर जाऊ नका..)

विषय: 
शब्दखुणा: 

लेकीच्या रांगोळ्या

Submitted by विनार्च on 27 October, 2014 - 06:17

ह्या दिवाळीत माझ्या लेकीने काढलेल्या रांगो़ळ्या....

2014-10-024.jpg2014-10-023.jpg

ही माबोकर टीनाची रांगोळी पाहून सुचलेली

20141023_182902-001.jpg

ह्या एकाच दिवशी काढलेल्या दोन

IMG_20141025_190716-002.jpg

विषय: 

Pages

Subscribe to RSS - कला