स्वयंपाकाची उपकरणे

लोकडाऊन ३.० - भांडी घासण्याची पाककृती

Submitted by ऋयाम on 2 May, 2020 - 05:42

साहित्य:

  • भांडी - दहा ते बारा (मध्यम आकाराची)
  • साबण - वडी. (द्रवरुप असला तरी चालेल. )
  • घासणी- एक स्कॉच ब्राईट, एक तारेची
  • पाणी - नळाचे. (बादलीत भरलेले असले तरी चालेल..)
  • पाककृती करण्यास लागणारा वेळ : *स्वादानुसार?

*स्वादानुसार - जी स्वादिष्ट पाककृती केली असेल, त्याप्रमाणे तिला लागणारी भांडी कमी किंवा जास्त प्रमाणात वापरावी लागतील.

* * * * * * *

तुमची आवडते मॉकटेल कोणते आहे ?

Submitted by कटप्पा on 22 April, 2020 - 23:05

हा धागा मी उघडेन असे कधी वाटले नव्हते. मी टिटोटलर झालो आणि बरेच दिवस काहीच घेतले नाही .
अजूनही दारू घेणार नाही यावर ठाम आहे. लॉकडाउन मध्ये घरी तुम्ही कोणकोणती मॉकटेल्स बनवताय यावर चर्चा करायला हा धागा.

मॉकटेल म्हणजे कॉकटेल नव्हे, त्यामुळे फक्त नॉन अल्कोहोलिक मॉकटेल्स बद्धल शेयर करूया |

क्रोकरी

Submitted by अर्लिना on 24 April, 2019 - 01:28

नविन क्रोकरी घ्यायची आहे.
मेलामाइन /प्लास्टिक नको. ओपलवेअर, glassware, सिरामिक, बोन चायना पर्यायांबद्दल महिति हवी.
याबद्दल उपलब्ध धागा असल्यास plz link द्या.
धन्यवाद.

Built in gas shegdi or पारंपारिक शेगडी

Submitted by anamika_दे on 27 September, 2018 - 01:09

नवीन घरासाठी Built in gas shegdi घ्यावी की पारंपारिक शेगडी घ्यावी असा प्रश्न पडलाय... पारंपारिक उत्तम च आहे फक्त माझी उंची कमी असल्यामुळे कढै मध्ये टाचा उंचावून डोकवावे लागते.
Buiit in मधे क्लेअनिंग प्रोब्लेम होतो का.
कोणी वापरत असाल तर कृपया इथे सल्ला द्या.

देवपूजेतील चांदीची चिकट भांडी कशी स्वच्छ करावीत?

Submitted by sneha1 on 12 September, 2018 - 12:26

नमस्कार.
थोडे आधी विचारायला हवे होते खरे. देवपूजेतील चांदीची चिकट भांडी कशी स्वच्छ करावीत?
धन्यवाद!

भांड्याला भांडं

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 9 July, 2018 - 03:33

आज स्वयंपाक करता करता अचानक मनात विचार आला तो स्वयंपाक घरातील भांड्यांचा. आपल्या स्वयंपाक घरात भांडी एकमेकांच्या साथीने, गुण्यागोविंद्याने चविष्ट आणि कलात्मक पदार्थ बनवण्यासाठी किती संगठित होऊन काम करत असतात. त्यातील काही ठरलेल्या जोड्या म्हणजे पोळीपाट-लाटणं, तवा-कालथा, कढई-झारा, खल-बत्ता, चमचा-वाटी. थोड्या आधीच्या काळात गेलो तर कप-बशी, पाटा-वरवंटा, तांब्या-पेला, उखळ-मूस ही भांडी किंवा साधनेही कायम एकमेकांच्या साथीनेच काम करायची.

शब्दखुणा: 

फ्रिजचा कॉम्प्रेसर बदलावा की फ्रिजच बदलावा?

Submitted by साधना on 10 June, 2018 - 14:25

गेली 18-19 वर्षे वापरात असलेल्या, आजवर कसलाही त्रास न झालेल्या गोदरेज डबल डोअर फ्रीजचे कूलिंग बंद, फक्त फ्रिजर फॅन सुरू हा प्रकार शनिवारी लक्षात आला. दुरुस्तीसाठी बोलावलेल्या माणसाने आधी काहीतरी लावून कॉम्प्रेसर सुरू होतो का पाहिले. तो न झाल्याने त्याने कॉम्प्रेसर उडाला, नवीन बसवा म्हणून सल्ला दिला.

नेटवर थोडी शोधाशोध केल्यावर फ्रीजचे आयुष्य 15 16 वर्षांचेच असते. इतक्या वर्षानंतर कॉम्प्रेसर गेल्यास तो परत घालण्यापेक्षा फ्रीज नवा घेणे चांगले हाच सल्ला वाचायला मिळतोय.

मायबोलीकरांचा अनुभव काय आहे?

कुकिंग गॅस सिलिंडर लॉक करायचा (कोणी वापरू नये म्हणून) काही उपाय आहे का?

Submitted by स्वप्ना_राज on 8 February, 2018 - 09:49

नमस्कार,

माझ्या एका मित्राचं सेकन्ड होम आहे. तिथे नेहमी कोणी रहात नाही. महिन्या-दोन महिन्यातून जातात. तिथला केअरटेकर कुकिंग गॅस वापरतो असं वाटतं कारण सिलिंडर हलका लागतोय. विचारलं तर नाही म्हणतो. अजून तिथे कॅमेरा लावलेला नाही. तो लावेस्तोवर सिलिंडर वापरता येऊ नये यासाठी काही लॉक मिळतं का ते पहातोय. सिलिंडर काढून दुसर्‍या रुममध्ये बंद करून ठेवणं हा पर्याय आहे पण लिकेजच्या भीतीने ते करायचं नाहिये. काही माहिती असेल तर प्लीज कळवा.

धन्यवाद!

पाहुणचार

Submitted by वाट्टेल ते on 9 November, 2017 - 14:54

अतिथी ही कल्पना भारतीय संस्कृतीतून उगम पावली आहे असे म्हणतात. ज्याला तिथी नाही, जो कधीही दत्त म्हणून उभा राहतो तो अतिथी. बदलत्या जीवनशैलीत किरकोळ अपवाद, जसे अधेमध्ये माझ्याकडे अंडी मागायला येणारी माझी गोरी शेजारीण वगळता, अतिथी असे कोणी उरले नाहिये. माणूस जन्माला येण्याची तिथीसुद्धा आता बऱ्यापैकी निश्चित करता येते. आमच्या माहितीतील एका डॉक्टरिणीला हे वेळेचे तंत्र अचूक अवगत आहे. दिवस भरून टेकीस आलेल्या बाईला ती रात्री १२ च्या सुमारास हॉस्पिटलमध्ये यायला सांगते.

मायबोली गणेशोत्सव २०१७ - पाककृती स्पर्धा

Submitted by संयोजक on 18 August, 2017 - 10:51

Pages

Subscribe to RSS - स्वयंपाकाची उपकरणे