बी. ए. आर्टस् पदवीनंतर नोकरीत चांगल्या संधींसाठी मार्गदर्शन हवे आहे.

Submitted by हसरी on 15 May, 2012 - 00:48

मला बी. ए. आर्टस् पदवी नंतर भारतात, खास करून मुंबईत कोणकोणत्या प्रकारच्या करियर संधी उपलब्ध होऊ शकतात, त्यासाठी काय शिक्षण आवश्यक आहे, काय पात्रता आवश्यक आहे जेणेकरून सध्या असलेल्या नोकरीत चांगल्या संधी मिळू शकतील याविषयी मार्गदर्शन हवे आहे. सध्या माझ्या अशा काही मैत्रिणींना त्यांच्या जॉबमध्ये सेटल होण्यासाठी ही माहिती हवी आहे.
मैत्रिणींचे सध्याचे जॉब्ज याप्रमाणे आहेत :
सध्या त्या कॉम्प्युटर ऑपरेटर, डेटा एनट्री मध्ये आहेत.
या क्षेत्रात त्यांना पुढे जायचे असेल तर त्यांनी कोणते शिक्षण अभ्यासक्रम करणे / ट्रेनिंग घेणे त्यांच्यासाठी नव्या व्यावसायिक संधी मिळवण्यासाठी फायद्याचे ठरेल? मुंबईत पार्ट टाईम बेसिस / डिस्टन्स लर्निंग बेसिसवर हे अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य आहे का? कोणत्या संस्था खात्रीलायक आहेत? त्यांच्या वेबसाईट्स, इतर आवश्यक माहिती असल्यास ती कृपया इथे द्यावी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हसरी, या विषयावर मार्गदर्शन करण्यासारखे माझ्याकडे काही नाही. पण परवाच लोकसत्तामधला हा एक लेख वाचला होता. इथे लिंक देते. कलाशाखेबद्दलच आहे.

सावली, उत्तम लेख आहे तो.

हसरी, कॉम्प्युटर भाषा, वेब अ‍ॅनिमेशन, वेब डिझायनिंग क्षेत्रात जायचे असल्यास त्यानुसार येथील तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करू शकतीलच.

त्या शिवाय व्यवस्थापन, कायदा, अकाऊंट्स, फायनान्स, ऑफिस मॅनेजमेन्ट, शिक्षण क्षेत्र, अन्य भाषा या क्षेत्रात रस असेल किंवा त्यात पुढे जायचे असेल तर त्यानुसार वेगवेगळे डिप्लोमा / डिग्री कोर्स उपलब्ध आहेत. मुंबईत तर फुल टाईम, पार्ट टाईम, डिस्टन्स लर्निंग, ऑनलाईन लर्निंग अशा अनेक प्रकारांनी ते कोर्स करता येऊ शकतात. तुम्ही फक्त तुमचे क्षेत्र निश्चित करून त्यानुसार उपलब्ध कोर्सेसची चौकशी करणे त्यासाठी आवश्यक आहे. सावलीने दिलेल्या लिंकमध्ये देखील बरीच माहिती आहे.

कायदा क्षेत्रात जायचे असल्यास / त्याचा नोकरीत बस्तान बसण्यासाठी फायदा होणार असल्यास त्यासंबंधी वेगवेगळ्या कोर्सेसची माहिती, संस्थांची माहिती इथे मिळेल :

http://www.mumbaieducation.net/law/

http://www.mu.ac.in/law/courses.html

http://www.glcmumbai.com/law-courses-offered/bachelors-law-degree.aspx

वेब अ‍ॅनिमेशन क्षेत्र : http://www.mumbaieducation.in/Animation-Multimedia

कॉम्प्युटर आयटी क्षेत्र : http://www.mumbaieducation.in/Computers-IT

तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनचाही विचार करू शकता.

हसरी तुझ्या मैत्रिणींना भाषांमध्ये इंटरेस्ट आहे की नाही हे माहित नाही पण एखादी परदेशी भाषा शिकणे फायदेशीर ठरते. मराठी टायपिंग निर्दोष येत असल्यास मराठी-इंग्रजी भाषांतरे करुन देता येऊ शकतात. घरबसल्याही.
भाषांतर क्षेत्रासंबंधी मी मायबोलीवर पूर्वी दिलेल्या लेखाची लिंक देतेयः
http://www.maayboli.com/node/14551
(हा लेख वाचता येण्यासाठी तुम्ही व्यवसाय मार्गदर्शन
या ग्रूपचे सभासद असणे आवश्यक आहे.)

हसरी....

"बी.ए. आर्टस" ही माहिती त्रोटक आहे. बी.ए. पदवीसाठी तुमचा 'स्पेशल' विषय कोणता होता याची माहितीही इथे देणे आवश्यक आहे, ज्यावरून तुम्हाला कोणत्या क्षेत्रातील संधी करिअरसाठी उपलब्ध होऊ शकतील याबद्दल मी मार्गदर्शन करू शकेन.

अशोक पाटील

हसरी, बी ए जर अर्थशास्त्र घेऊन केले असेल तर कायदा अभ्यासक्रम, व्यवस्थापन (बी बी ए, एम बी ए, एम पी एम इ.), एम ए अर्थशास्त्र असे अनेक पर्याय आहेत.

जर तुम्हाला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात जायचे असेल, सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग, डेटाबेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन किंवा वेबडिझायनिंग इत्यादी क्षेत्रात पुढे शिकण्याची इच्छा असेल तर अगोदर घेतलेल्या शिक्षणाचा त्यासाठी उपयोग होईलच असे नाही. तुम्हाला नवे विषय शिकावे लागतील.

हसरी,
जॉबमधे सेटल होणे किंवा जॉब करण्यासाठी कोर्सेस करायचे आहेत की करिअर करण्यासाठी कोर्सेस करायचे आहेत? करिअर करण्यासाठी मेडिकल, इंजिनिअरींग, लॉ, MBA वगैरे याच किंवा अशाच पदव्या लागतात असं अजिबात नाही. आजच्या काळात 'endless options' आहेत. तुम्हाला किंवा तुमच्या मैत्रिणींना कुठल्या क्षेत्रात रूची आहे, कुठलं क्षेत्र आवडतं याचा आधी शोध घ्या. एकदा क्षेत्र ठरलं की तुम्हाला तुमचा शोध 'narrow down' करता येईल.
सध्या डिमांड आहे म्हणून, नोकरी (कदाचित) मिळेल म्हणून किंवा बाकीचे करत आहेत म्हणून कोर्सेस करू नकात. तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे, त्या क्षेत्रातले कोर्सेस निवडले तर तुमचा उत्साहदेखील कायम राहील आणि आवडीच्या क्षेत्रात तुमचं 'करिअर' देखील घडेल. आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करायला मिळणं यासारखा दुसरा आनंद नाही आणि हे होऊ शकतं हे लक्षात ठेवा.
Good luck :).

"सध्या डिमांड आहे म्हणून, नोकरी (कदाचित) मिळेल म्हणून किंवा बाकीचे करत आहेत म्हणून कोर्सेस करू नकात. तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे... "

~ अंजली यांच्या या मताला पूर्ण अनुमोदन. गायनॉकॉलॉजीमध्ये कोल्हापूरात खूप नाव मिळविलेल्या एका डॉक्टर पतीपत्नीच्या दोन्ही मुलींनी (जुळ्या होत्या) दहावीला अनुक्रमे ९५ आणि ९७ टक्के मार्क्स मिळविले असूनही अकरावीसाठी 'कला' शाखेला अ‍ॅडमिशन घेतली होती कारण दोघीनीही नृत्यकला आणि चित्रकला लहानपणापासून जोपासली होती. विशेष म्हणजे त्या दांपत्यानेही आपल्या मुलींना आपल्याच क्षेत्रात जाण्यासाठी कसलेही दडपण आणले नाही. आज त्यापैकी एक दूरदर्शनच्या दिल्ली केन्द्रात निर्मिती अधिकारी आहे तर दुसरीने कमर्शिअल आर्टमध्ये छान करीअर केले आहे.

केवळ बी.ए. अर्थशास्त्र असून सध्यातरी भागणार नाही. शिक्षणक्षेत्रात लेक्चरर म्हणून काम करण्याची इच्छा (तसेच आवडही) असेल तर सध्या या क्षेत्रात खूप छान आर्थिक लाभ सरकारने देवू केले आहेत. पण त्यासाठी एम.ए. करून एम.फिल.; पीएच.डी.ही प्राप्त करणे क्रमप्राप्त आहे. बॅन्किंग क्षेत्रातही अर्थशास्त्र विषयाचा चांगला उपयोग होऊ शकतो. पण परत त्याला एम.बी.ए.ची जोड देणे गरजेचे आहे. नोकरीच्या अनेकविध संधी सध्या उपलब्ध आहेत हे खरे, पण उगाच हवी आहे म्हणून कुठेतरी कॉम्प्युटर ऑपरेटर वा डेटा एन्ट्रीसारखी अगदी दहावीचीही मुले करू शकतील अशी कामे मिळवून किती समाधान प्राप्त होईल ? मी पाहिलेले कित्येक तरुण (आणि तरुणही) निव्वळ काहीतरी कमाई म्हणूनच अशा नोकर्‍या स्वीकारतात आणि प्रवाहात हाती येईल तो ओंडका घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करीत राहतात.

त्यामुळे अंजली म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही तुमचे आवडीचे क्षेत्र अगोदर निश्चित करावे आणि मग त्यासाठी अर्थशास्त्र विषयाला कशी आणि कोणती जोडणी देता येईल याचा शोध घेणे सोपे जाईल.

शुभेच्छा !

अशोक पाटील

बी ए = बॅचलर ऑफ आर्ट्स. त्यामुळे बी ए आर्ट्स असे लिहिण्याऐवजी बी ए (इकॉनॉमिक्स) किंवा बी ए (पोलिटिकल सायन्स) असं लिहायला हवं ना?

तुम्ही अ‍ॅक्चुअरी साठी प्रयत्न करू शकता. सीए, कॉस्ट अकांटन्सी, सीएस हे पर्याय आहेत. अकाउंट्स शिकणे थोडे कठीण वाटेल पण माझ्या ओळखीच्या काहीजणांनी सायन्स, आर्ट्स बॅकग्राउंड असूनही पुर्ण केलय. एम ए करून नेट, सेट या परीक्षा देता येतील.

@ भरत
~ होय. बी.ए.आर्टस हा द्विरुक्तीचाच एक नमुना होय. जसे "माझे वडील शाहू मिल गिरणीत जॉबर होते..." असे जेव्हा कुणी सांगत असतो.

"मी भाषा विषयात पदवी घेतली आहे...." असे सांगणेही चुकीचे वा त्रोटक ठरते. पदवीसाठी कोणती 'भाषा' निवडली होती हे उमेदवाराने मुलाखतकर्त्याला सांगणे आवश्यक असते. 'क्लेरिकल पोस्ट' साठी आलेल्या अर्जदारांच्या एके ठिकाणी मी स्वतः मुलाखात घेत होतो. [ एका मुलीच्या अर्जात केवळ बी.ए. आणि टायपिंग, एमएच-सीआयटी इतपतच उल्लेख होता] विचारताना मुलाखतीस आलेल्या त्या समोरील मुलीने आपल्या पदवीचा 'भाषा' असा उल्लेख केल्याक्षणीच मी जाणले की तिने 'मराठी' वा 'हिंदी' यापैकी एक विषय घेतला असणार [मराठीच विषय निघाला तिचा]... "इंग्रजी" घेऊन बी.ए. झालेला उमेदवार जाणीवपूर्वक आपल्या अर्जात "बी.ए. इंग्लिश" असा उल्लेख करतो....मात्र मराठी/हिंदीवाले का असा स्वत:च्या विषयाचा उल्लेख टाळतात हे समजणे अवघड आहे.

तरीही 'अर्थशास्त्र' विषयाकडे आजही 'व्हॅल्यू' चा विषय म्हणून पाहिले जाते ही त्यातल्यात्यात समाधानाची बाब. इतिहास, भूगोल, समाजशास्त्र या विषयांची निवड हल्ली तर निव्वळ "मी पदवीधर आहे" हा टॅग लावून घेण्यापुरताच केली जाते.

अशोक पाटील