Interactive पद्धतीने मुलांना शिकवणे..........

Submitted by यशस्विनी on 5 July, 2012 - 03:59

माझ्या मुलाला या एप्रिलमध्ये तीन वर्ष पुर्ण झाली...... कालपासुन तो "नर्सरी" मध्ये जायला सुरू झाला. मला असे विचारायचे आहे की आपण "interactive" पद्धतीने किंवा मुलाला कंटाळा न येता खुप आवडेल अश्या प्रकारे त्याचा अभ्यास किंवा इतर गाणी गोष्टी कश्या प्रकारे शिकवु शकतो...........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलाच्या मनातुन जे कहि वदवुन घेता येउअल ते घ्यावे.कारन मुलाच्या मते त्यन्चि teacher हि जगतिल सर्वत हुषार वक्ति असते व teacher ने जे सन्गितले आहे तेच ते करतात. ( अनुभवाचे बोल). मुलान समोर रोज त्यन्चि books open करावित व त्यच्या कदुन सम्जवे कि teacher काय शिकव्ले. मुलान् वाचता जरि आले नहि तरि चित्रान वरुन छान सन्गतात्.त्यन्च्या action लक्श्यत तेवाव्या. व त्यानुसार
अभ्यास घ्यावे. Just try make your child teacher and u are student he will teach you what he know so u can understan what he know. So u can become a good friend of your child.

All the Best.
Pls go slow. dont make your child Einstein from now.

@ अमिता भोईटे

धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी.......... बाकी सध्यापासुन त्याला आइन्स्टाइन वगैरे बनवायची घाइ नाही आहे Happy ........ माझी आई सांगते की आपण मुलाला जन्म देउ शकतो, कर्म नाही देउ शकत........ शेवटी मी त्याला थियरी शिकवेन हो, पण प्रॅक्टिकल्स तर त्याचे त्यालाच करायचे आहेत Happy

@अमिता

मस्त आयडिया. माझा मुलगा माझं अजिब्बात ऐकत नाही. अभ्यासाला बसवलं कि मारामा-या करतो. हा प्रकार ट्राय करून पहायला हरकत नाही..

Just try make your child teacher and u are student he will teach you what he know so u can understan what he know.

हा प्रकार माझ्या मुलीकरता माझ्या आई-बाबांनी केला होता. त्यासाठी खास पाठकोर्‍या वह्या बनवून घेतल्या होत्या classwork आणि homework साठी. अगदी तिला गुरुपोर्णिमेला एक पत्र आणि बक्षिस देखिल दिले होते. या सर्वाचा खूप उपयोग झाला.

माझी आई अगदी हाडाची शिक्षिका आहे. Happy

हा देखिल छान प्रयत्न आहे........ मुलगा खुश कारण त्याला वाटेल की आई माझ्याकडुन शिकुन घेत आहे व आपण खुश की नकळतपणे त्याची उजळणी होत आहे Happy

वर्षा....चांगला विषय, विशेषतः जे पालक स्वतः 'शिक्षक' बनू इच्छितात त्यांच्यासाठी.

मी काहीसे वेगळे प्रयोग केले होते/करीत आहे, माझ्या नातवांसाठी. मला थेट रक्ताची नुकतीच एक नात झाली आहे, पण तिन्ही बहिणी कोल्हापूरात अगदी हाकेच्या अंतरावरच आपापल्या संसारात मग्न असल्याने मग त्यांची मुले तसेच त्यानंतरच्या पिढीला (भाचे-भाच्या) झालेली अपत्ये कायम माझ्याच घरी वाढली (शहराच्या मध्यवस्तीत मी राहात असल्याने, तसेच त्या कारणाने शाळाही त्याच परिसरात असल्याने).

या मुलांचा रुढ अर्थाने मी 'आजोबा'; पण त्यांच्याशी इंटरअ‍ॅक्शन करतानी मी त्यांचा 'मित्र' बनलो; आणि त्यासाठी सर्वात मोठी रीलेशनशिप प्रस्थापित झाली ती 'स्वीमिंग' मुळे. होय, या मुलांना (मुलींनाही) मी जवळच्या रंकाळा तलावात त्यांच्या वयाच्या दुसर्‍या-तिसर्‍या वर्षापासून घेऊन जात असे. एकावेळी तिघे-चौघे सोबतीला असल्याने त्या मावस-चुलत भावाबहिणीतील नातेही मित्रत्वाचे बनले, कारण तलाव परिसर म्हणजे त्यांच्यादृष्टीने 'मुबलक दंगा' करण्याचे स्थान होते. लहान असल्याने ते पोहायलाही चटदिशी शिकले. आणि एकदा त्या तलावाची सवय झाल्यानंतर मी अगदी पहाटे ५ ला जरी त्याना हाक मारली तरी त्यातील एकही कुरकूर न करता आनंदाने तयार होत असे.

असे आपुलकीचे नाते निर्माण झाल्यावर मग केजी पासून मी त्यांचा अभ्यास घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या माझ्या वयातील 'फरक' त्यांच्या गावी अजिबात नव्हता. मी काहीतरी 'शिकवित' आहे याचा अर्थ ते पोहण्यासारखेच गमतीशीर असणार याची त्याना बालंबाल खात्री वाटत गेल्यामुळे एकाही मुलाला 'अभ्यास' ही शिक्षा कधीच वाटली नाही. आज ही सारी मुले इयत्ता तिसरी ते आठवीच्या वर्गात योग्यरितीने शिक्षण घेत आहेत आणि माझ्या घरी छानपैकी ग्रंथालयही असल्याने त्याचीही "अवांतर वाचन' सदराखाली मी त्याना चांगलीच सवय लावली आहे. टीव्हीवरील कार्टून कार्यक्रम ते बघत असताना मी कधीही त्यांच्यावर नापसंतीदर्शक शेरा मारत नाही. आहे ती सोय म्हणून पाहतात इतकेच, असेच मी त्यांच्या आईबापांना बजावीत असे. माझ्या लहानपणी तर सार्‍या गल्लीत फक्त एका डॉक्टरांच्या घरी रेडिओ होता. आम्हाला "बिनाका गीतमाला' ऐकायला त्यांच्या घरी जावे लागत असे. आज तशी परिस्थिती जर नसेल, तर मुलांनी त्याचा आनंद घेतला तर आपली भुवई वक्र होऊ देऊ नये. नातवांना मी 'बस्स झाले रे आता, चला आत' असे मृदू भाषेत सांगितले तर त्याची उलटी रीअ‍ॅक्शन कधीच येत नाही. सक्रीय प्रोत्साहनामुळेच सहावीतील एक नातवाने परवा पुण्याच्या बालेवाडी येथे संपन्न झालेल्या आंतरजिल्हा शालेय जलतरण स्पर्धेत १०० मी. फ्रीस्टाईल आणि १०० मी. बॅकस्ट्रोकमध्ये प्रथम क्रमांकाचे यश मिळविले आणि त्याने तिथून फोनवरून प्रथम मला ती बातमी सांगितली. त्यामुळे त्याचा आनंद त्याच्या पालक आणि शाळेपेक्षा मला किती झाला असेल याची कल्पना तुम्ही करू शकाल.

थोडक्यात मुला/मुलीला शिकविणारी व्यक्ती 'मित्र' वाटली की बस्स. पुढचा सारा मार्ग फार सोयीचा आणि सवयीचा होऊन जातो.

तुम्हाला आणि तुमच्या चिरंजीवाला या संदर्भात हार्दिक शुभेच्छा.

अशोक पाटील

मझा मुलगा पहिलिला आहे. खुप मस्ति करतो. तसा समजुतदार आहे पण कोणाचे ऐकत नहि. त्यामुळे खुप मार खातो. मि जोब करते म्हणुन जस्त वेळ देता येत नहि. कहितरि उपाय सुचवा.

प्रणालि
सेम हिअर. काल त्याला टीचर करायचा प्रयत्न करून पाहिला. पण त्याने असं काही पाहीलं माझ्याकडे कि मला मी म्हणजे अगदी केव्हमॅन असल्यासारखं वाटलं. एका डॉक्टरांनी सांगितलंय कि त्याला त्याच्या अंगातली मस्ती जिरेल असे खेळ खेळू द्यात. तायक्वांदोला घालून पाहतो काही फरक पडतो कि माझ्यावरच प्रयोग करतोय ते Happy

मझि मुलगि हि पहिलिला आहे. बोलन्यात राघू आहे. पन लिह्हिन्यात थोदि हलु अहे. मि तिचि लिहिन्यचि आवद् (intrest)कशि निर्मान करु व तिचा वेग कसा वाधवु.

आवन्त् र
मि तिला dance class ला पाथवते गेल्या १ वर्षा पासुन last year she is not valid for exam of first year because she is not complited 5 years. now she is 5 so i am forcing her to give the exam in this year she is readdy and her father giveher training of swiming from last month

आत्ता हे सगल फार जास्त आहे का ? कि अम्हि दोघे जस्त burden देत अहोत.

Please suggest.

@ मी नताशा

हा प्रकार माझ्या मुलीकरता माझ्या आई-बाबांनी केला होता. त्यासाठी खास पाठकोर्‍या वह्या बनवून घेतल्या होत्या classwork आणि homework साठी. अगदी तिला गुरुपोर्णिमेला एक पत्र आणि बक्षिस देखिल दिले होते. या सर्वाचा खूप उपयोग झाला. माझी आई अगदी हाडाची शिक्षिका आहे.

<<<<<<<<<<<<<<<<

एकदम छान प्रयत्न केला आहे ग......... मला जरा डिटेल्स मध्ये सांगशील का याबद्द्ल........तुझ्या आई कडुन जरा टिप्स घे ना या विषयाबद्द्ल ......

@ प्रणाली

मझा मुलगा पहिलिला आहे. खुप मस्ति करतो. तसा समजुतदार आहे पण कोणाचे ऐकत नहि. त्यामुळे खुप मार खातो. मि जोब करते म्हणुन जस्त वेळ देता येत नहि. कहितरि उपाय सुचवा.

<<<<<<<<

अग मला वाटते हा मुलांच्या पालकांचा जागतिक प्रश्न आहे Happy आता मस्ती नाही करणार तर केव्हा करणार पण वर किरण यांनी सांगितल्याप्रमाणे "त्याच्या अंगातली मस्ती जिरेल असे खेळ खेळू द्यात" तु देखिल बघ हे तुला शक्य असेल तर ...... तु नोकरी करत असशील तर त्याला जे सांभाळतात त्यांच्याकडे तो एकट्याने खेळेल असे खेळ देउन बघ, त्यांचा सहभाग असेल तर अजुन उत्तम..........सध्या मी माझ्या मुलाला चित्रकलेची वही व रंगीत खडु दिले आहेत, काही ना काही तरी काढत असतो व मला थोड्या थोड्या वेळाने दाखवतो , मग मी खुश होउन त्याला शाबासकी दिली तर अजुन उत्साहाने काढायला घेतो Happy

@ किरण

काल त्याला टीचर करायचा प्रयत्न करून पाहिला. पण त्याने असं काही पाहीलं माझ्याकडे कि मला मी म्हणजे अगदी केव्हमॅन असल्यासारखं वाटलं. एका डॉक्टरांनी सांगितलंय कि त्याला त्याच्या अंगातली मस्ती जिरेल असे खेळ खेळू द्यात. तायक्वांदोला घालून पाहतो काही फरक पडतो कि माझ्यावरच प्रयोग करतोय ते

<<<<<<<

Rofl

@ अशोक पाटील

पाटीलसाहेब प्रथम तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी मनापासुन धन्यवाद Happy ........... आपण खुप चांगले मार्गदर्शन केलेत......... सध्या माझ्या मुलाला देखिल आम्ही येथील स्विमिंग कॉम्पलेक्समध्ये घेउन जातो...... अजुन पोहायला शिकवायला सुरुवात केली नाही आहे फक्त त्याला हवे तेवढे पाण्यात डुंबायला, मस्ती करायला देतो त्यामुळे तो सध्या स्विमिंगला जायचे आहे असे बोलायचा अवकाश की स्वत:चा स्विमिंग सुट व टोपी पळत जाउन घेऊन येतो Happy बाकी मुलाला वाचनाची आवड लावायची आहे, बघु कसे जमते ते

सक्रीय प्रोत्साहनामुळेच सहावीतील एक नातवाने परवा पुण्याच्या बालेवाडी येथे संपन्न झालेल्या आंतरजिल्हा शालेय जलतरण स्पर्धेत १०० मी. फ्रीस्टाईल आणि १०० मी. बॅकस्ट्रोकमध्ये प्रथम क्रमांकाचे यश मिळविले आणि त्याने तिथून फोनवरून प्रथम मला ती बातमी सांगितली. त्यामुळे त्याचा आनंद त्याच्या पालक आणि शाळेपेक्षा मला किती झाला असेल याची कल्पना तुम्ही करू शकाल.

<<<<<< हे तुमचे आजोबा म्हणुन मोठे यश आहे Happy

थोडक्यात मुला/मुलीला शिकविणारी व्यक्ती 'मित्र' वाटली की बस्स. पुढचा सारा मार्ग फार सोयीचा आणि सवयीचा होऊन जातो.

<<<<<< नक्की लक्षात ठेवेन, धन्यवाद Happy

त्याला त्याच्या अंगातली मस्ती जिरेल असे खेळ खेळू द्यात. >>>

काही दिवसांपूर्वी विपत्रातून आलेला हा लेख इथे डकवत आहे:
(कदाचित ह्या बीबी साठी योग्य नसेल पण हायपरअ‍ॅक्टीव्ह पाल्यांच्या पालकांसाठी उपयुक्त आहे.)

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

पालकत्वाचे प्रयोग : ऊर्जेला आकार देताना...
आई - बाबा तुमच्यासाठी
डॉ.ऋजुता पाटील-कुशलकर - शनिवार, २८ जानेवारी २०१२
chaturang@expressindia.com
व्रात्य मुलगा अशी ज्याची ओळख होती, त्या महेशमधल्या प्रचंड ऊर्जेला योग्य दिशा देतानाच, त्याला जागतिक स्तरावरील स्क्वॉश खेळाडू म्हणून घडविण्यात मोलाची भूमिका बजाविणाऱ्या आई-वडिलांच्या परिश्रमाची ही कथा..
महेश हा अंजली आणि दयानंद माणगावकर या दाम्पत्याचा तीन वर्षांचा मुलगा. महाखोडकर, हाताला कायम चाळा. एका जागी स्वस्थ बसणार नाही. त्याला सांभाळायचं म्हणजे मोठं कठीण काम. दयानंदांनी बरेच पैसे खर्च करून नुकतंच घर सुशोभित करून घेतलं होतं, पण छोटय़ा महेशनं बॅटबॉल खेळून घरात बरीच तोडफोड केली.
बाबांनी रागावून दोनचार वेळा मारही दिला; परंतु नंतर बाबांनी एवढय़ाशा जीवाला मारून काय उपयोग? त्याला काय समजतं? असा विचार केला. सुज्ञपणे स्वत:च लहान मुलांच्या मानसिकतेवरची बरीच पुस्तकं घेऊन आले. त्यांचा अभ्यास केला. आपण ज्यांना अति चळवळी मुलं समजतो त्यांच्यात खूप ऊर्जा असते. त्या ऊर्जेचा सृजनात्मक रीतीनं निचरा होणं गरजेचं आहे. त्या ऊर्जेला सकारात्मक वळण लावणं आवश्यक आहे, एवढं ज्ञान बाबांना त्या पुस्तकातून मिळालं. शाळेतही महेशच्या चळवळ्या स्वभावाचा शिक्षकांना त्रास होत होता. तेव्हा या अतिरिक्त ऊर्जेचं सर्वागीण व्यवस्थापन दयानंद आणि अंजलीला करायचं होतं.
आई-बाबांनी दोन गोष्टी केल्या. पहिली म्हणजे, महेशला कॅसिओ शिकायला पाठवलं. सप्तसुरांनी त्याला बांधून ठेवलं. कॅसिओ वाजविताना रंगून जाऊन तो एका जागी बसू लागला. दुसरी गोष्ट म्हणजे, बोरिवलीतील एका क्लबचं सदस्यत्व घेतलं. महेशचे आई-बाबा दोघेही खेळाडू. दयानंद वेटलिफ्टिंगमधील मुंबई विद्यापीठाचा चॅम्पियन तर अंजली बास्केटबॉल खेळाडू. त्यामुळे खेळाचं जीवनातील महत्त्व दोघांना चांगलंच ठाऊक. रोज संध्याकाळी आई-बाबा घरी आले की, कटाक्षाने महेशला क्लबमध्ये पोहायला नेऊ लागले. छोटय़ा महेशनं पोहण्यात चांगलीच प्रगती केली. त्याची अतिरिक्त ऊर्जा खेळण्यात वापरली जाऊ लागली. घरातली त्याची मस्ती खूपच कमी झाली. दयानंद-अंजलीला हायसं वाटलं. हेच तर त्यांना हवं होतं, पण आयुष्याच्या एका मोठय़ा वळणावर त्यांच्याही नकळत ते झालं होतं.
महेश आठ वर्षांचा असताना क्लबमध्ये स्क्वॉश नावाचा नवीनच खेळ सुरू झाला. स्क्वॉश म्हणजे काय, त्याचे नियम काय, कसं खेळायचं याबद्दल फारसं कुणालाच माहीत नव्हतं. छोटा महेश पोहायचं सोडून आईची नजर चुकवून स्क्वॉश कसं खेळतात ते भान विसरून पाहू लागला. हट्ट करून न पेलणाऱ्या जड रॅकेटनं खेळू लागला. स्क्वॉश खेळता खेळता तेच त्याचं ध्येय बनलं. नोव्हेंबर २००२ मध्ये तो ज्युनियर गटात महाराष्ट्र स्टेट ओपन टूर्नामेंट खेळला. तो जिंकला नाही, पण खेळला छान! त्याच्या खेळानं अनेक ज्येष्ठ खेळाडूंचं लक्ष वेधून घेतलं. त्यांनी खेळात आणखी प्रगती करायची असेल तर चांगले प्रशिक्षक हवेत, असं सुचविलं. बॉम्बे जिमखान्याचे प्रशिक्षक रमेश मोरे महेशच्या पायांच्या चपळ हालचालींवर खुश झालेले. त्यांनी महेशला शिकवायचं आनंदानं कबूल केलं. रमेश मोरेंनी महेशकडून खेळाचा पाया मजबूत करून घेतला.
स्क्वॉशचा महेशनं अगदी रात्रंदिवस ध्यास घेतला. शाळेतून घरी आल्यावर कोणीही न सांगता तो पटकन अभ्यास आटोपून घ्यायचा. संध्याकाळी पाच वाजता क्लबमध्ये जायचा. मग दोन-तीन तास सराव, फिटनेस ट्रेनिंग. अंजलीनंही या सर्वाला सक्रिय पाठिंबा दिला. या दरम्यान विविध स्पर्धामधून भाग घेणं सुरूच होतं, पण यश मिळत नव्हतं. दुसऱ्या फेरीत तो नेहमी बाद होत असे. हिरमुसत असे, पण आईनं नेहमी धीर दिला. ‘‘जिंकणं महत्त्वाचं नाही, चांगलं खेळणं महत्त्वाचं. कधीतरी या दुष्टचक्रातून बाहेर पडशील. तोपर्यंत हिंमत हरायची नाही.’’ दुसऱ्या खेळाडूंचा खेळ अथकपणे बारकाईनं पाहून महेश आपल्या खेळात सुधारणा करत राहिला. शेवटी या दुष्टचक्रातून बाहेर पडायची संधी आली. एका छोटय़ा स्पर्धेत तो दुसरी फेरी जिंकून पुढे गेला. ती स्पर्धाही जिंकली. आत्मविश्वासानं त्यानं नवी भरारी घेतली ती सरळ चेन्नई येथील सब ज्युनियर नॅशनल स्क्वॉश चॅम्पियनशिप (२००३) जिंकूनच. त्या वेळी तो अवघा नऊ वर्षांचा होता. ही स्पर्धा जिंकण्याच्या आधी महेशनं बाबांकडं एक वेगळं मागणं मागितलं, ‘‘मी ही स्पर्धा जिंकलो तर मला मलेशियातील स्पर्धा खेळण्याची संधी द्या.’’ या वयात मुलं खाऊ, खेळण्यासाठी हट्ट करतात. हा नऊ वर्षांचा मुलगा जगाआगळा हट्ट करत होता. बाबांनी आनंदानं त्याचा हट्ट पुरविला आणि महेश मलेशियातील ‘पेनांग इंटरनॅशनल ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिप’ स्पर्धा (११ वर्षांखालील वयोगट) २००४ मध्ये जिंकला आणि त्याचा आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा सिलसिला सुरू झाला.
स्क्वॉशनं महेश पुरता झपाटून टाकलं. स्क्वॉशशिवाय त्याला काही दुसरं काही दिसेना. बॉम्बे जिमखान्याचे प्रसिद्ध कोच वामन आपटे यांनी त्याला आपल्या पंखाखाली घेतलं. पुढे त्यांच्या शिफारशीमुळं इजिप्तमधील जगप्रसिद्ध कोच आमीर वाही महेशला शिकवू लागले. रोज सरावासाठी तो बोरिवलीहून चर्चगेटला जाऊ लागला. कठोर तपश्चर्येला प्रारंभ झाला. महेशची खेळाप्रतीची निष्ठा पाहून अंजलीनं आपला व्यवसाय बाजूला ठेवला आणि त्याच्या सर्वागीण प्रगतीसाठी ती झटू लागली. छोटी हॉटप्लेट, कुकर, दोन-चार भांडी, मसाले असा भातुकलीचा संसार बाळगत ट्रेनिंग, स्पर्धासाठी अंजली महेशबरोबर इंग्लंड, स्कॉटलंड, जर्मनी, इजिप्त, मलेशिया, भारतातील विविध शहरांमध्ये महिना- दोन महिने संसार मांडू लागली. महेश बर्गर, पिझ्झा असे जंक फूड खात नाही. त्यामुळे त्याच्या पोटात शक्यतो भारतीय पद्धतीचा चौरस, परिपूर्ण आहार जावा म्हणून धडपडू लागली. अंजली महेशची पूर्ण काळजी घेणारी आई, प्रवासाचे तिकीट, व्हिसा, हॉटेल बुकिंग इ.चे आरेखन करणारी ट्रॅव्हल एजंट, ट्रेनिंग-स्पर्धाचे नियोजन सांभाळणारी व्यवस्थापक, त्याच्या खेळाची विश्लेषक, त्याच्या शाळेचा अभ्यास करून घेणारी शिक्षिका, त्याच्या सुखदु:खात वाटेकरी होणारी जीवलग मैत्रीण अशा अनेक भूमिका निभावते. जगभरातील खेळाडूंच्या खेळाचा तिनं अभ्यास केला. महेशनं सराव कुठे-कुणाबरोबर करावा याचा विचार तिच्या डोक्यात सतत असतो. प्रत्यक्ष स्पर्धेदरम्यान त्याचे प्रतिस्पर्धी कोण, त्यांचे कच्चे-पक्के दुवे, खेळताना वापरावयाचे डावपेच ते दोन सेट्सच्या मध्ये १० सेकंदाचा ब्रेक असतो तेव्हा महेशला धीर देणं, पुढची व्यूहरचना ठरवणं, सामना संपल्यानंतर त्याच्या क्लांत शरीराला पूर्वपदावर आणणं इतकी ती या सर्वात गुंतलेली असते. गेली दहा वर्षे अंजली ही पूर्णपणे महेशमय आणि स्क्वॉशमय झालेली आहे.
महेश शाळेत फार काळ उपस्थित राहून रूढार्थानं चाकोरीतलं शिक्षण घेऊ शकला नाही. खेळानं त्याला लहान वयातच कुठल्याही प्रसंगाला धीरोदात्तपणे तोंड द्यायला शिकविलं. अगदी खूप वर्षे पाठराखण करणाऱ्या त्याच्या शाळेनं त्याला दहावीच्या वर्षांत उपस्थितीच्या कारणावरून शाळा सोडायला भाग पाडलं, तरी तो आणि त्याची आई डगमगले नाहीत. खेळावर लक्ष केंद्रित करत त्यानं इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून शिक्षण सुरू ठेवलं. २००३ पासून महेश भारतातील ११, १३, १५, १९ या वर्षांखालील वयोगटातील नॅशनल स्क्वॉश चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकला आहे. या वर्षी आठव्यांदा ही स्पर्धा जिंकून त्यानं एक विक्रमच केला आहे. १९ वर्षांखालील वयोगटात तो आणखी एक वर्ष खेळू शकेल आणि अजून एका विक्रमाची नोंद त्याच्या नावावर होईल, अशी आपण आशा बाळगूया.
२००४ पासून तो आंतरराष्ट्रीय पातळीवरही मलेशिया, कोरिया, जर्मनी, हाँगकाँग, ब्रिटन येथीलही स्क्वॉश स्पर्धा जिंकला आहे. २००९ मध्ये १५ वर्षांखालील वयोगटात महेशनं अतिशय प्रतिष्ठेची मानली जाणारी ब्रिटिश ओपन स्क्वॉश चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली. आतापर्यंत भारतातल्या फक्त एकाच खेळाडूनं ही स्पर्धा जिंकली होती, तो म्हणजे सौरव घोशाल. त्यानंतर ही स्पर्धा जिंकणारा महेश हा भारतातील दुसरा खेळाडू. या स्पर्धेदरम्यान कडाक्याच्या (-३ अंश सेल्शियस) थंडीत महेशची बोटं फुटून रक्तस्राव होऊ लागला. रॅकेट हातात धरणंही मुश्किल झालं. तिथं औषधंही सहजतेनं उपलब्ध होईनात. बाबांनी भारतातून तातडीनं औषधं पाठवली. इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही मन एकाग्र करून महेशनं ही स्पर्धा जिंकली.
आज १९ वर्षांखालील वयोगटात महेशला भारतात प्रथम मानांकन आहे, तर जगात दुसरं. पुरुष गटात भारतात चौथं मानांकन आहे.
आपल्या चळवळ्या पिल्लावर न रागावता दयानंदांनी शांत डोक्यानं महेशमधील ओसंडणाऱ्या ऊर्जेला खेळाकडे वळवलं. अंजलीनं स्वत:चं आयुष्य मुलाच्या खेळासाठी वाहून घेतलं आणि महेशनं कठोर परिश्रमानं या सर्वाचं चीज केले.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

निंबुडा खूप छान लेख पाठवलास ग. माझा भाचा असाच खूप मस्तीखोर पण ऐकणारा आहे. लेख वाचल्या बरोबर ही लिंक लगेच बहिणीला पाठवली. Thanks.

भाचा सव्वा दोन वर्षाचा आहे ताई त्यला लहान सहन गोष्टी करायला लावते
१. त्याच्या ओळखीच्या भाज्या चार्ट मध्ये पाहून बास्केट मधून त्याला आणायला लावणे
२. फळे आणि भाज्यानमार्फत रंग ओळखायला शिकणे
३. दोन बटाटे आण , एक टोमाटो आण अशी लहान लहान कामे सांगून अंक ओळख करून देणे
तिला विचारून अजून लिहीन

खुप धन्यवाद निंबुडा , खुप चांगला लेख इथे मांडलास >>>
निंबुडा खूप छान लेख पाठवलास ग. >>>
राजस च्या दृष्टीकोनातून मला हा लेख फारच उद्बोधक वाटला. अशा अति चळवळ्या, एका जागी स्थिर न बसणार्‍या हायपरअ‍ॅक्टीव्ह मुलांसाठी वर लेखात मांडलेल्या गोष्टी लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे. म्हणून इथे शेअर केला लगेच Happy

त्यामुळे खुप मार खातो. >>> मार हे शेवटच्या शेवटचा उपाय म्हणुनच वापरा... आयुष्यात एकाद्याच वेळी.. नाहीतर मार पचवण्याची सवय झाली की मग त्यापुढे जाऊन तुम्ही काहीच करु शकणार नाही.
मार मिळेल ही भीती असावी पण ती प्रत्यक्षात येऊ नये (वैयक्तिक मत )..

खुप धन्यवाद निंबुडा , खुप चांगला लेख इथे मांडलास >>>

खुप महत्त्वाचा आहे हा लेख, आणि महेशच्या आईच्या परिश्रमांचीही दाद द्यावीशी वाटते.

मार हे शेवटच्या शेवटचा उपाय म्हणुनच वापरा... आयुष्यात एकाद्याच वेळी.. नाहीतर मार पचवण्याची सवय झाली की मग त्यापुढे जाऊन तुम्ही काहीच करु शकणार नाही.
मार मिळेल ही भीती असावी पण ती प्रत्यक्षात येऊ नये (वैयक्तिक मत )..

<<<<<<<< अनुमोदन १००%

खुप महत्त्वाचा आहे हा लेख, आणि महेशच्या आईच्या परिश्रमांचीही दाद द्यावीशी वाटते.

<<<<< खरोखर Happy

कोणी मुलांच्या शिकण्याच्या पद्धतीबद्द्ल सखोल सांगु शकेल का? माझ्या लेकीला (६ वर्षे) कुठलाही अभ्यास visualize/spatial style ने शिकवला की अगदी लगेच लक्षात रहाते..
गुगल्यावर बरेच काही मिळाले वाचायला पण तरिही अजुन गोंधळ आहे थोडा. Each learning style has its own merits and limitations. What practices should we be doing to amplify merits and minimize limitations?

कालच माझ्या मुलाबरोबर (३ वर्ष) मी व माझा नवरा एक एक वाक्य मोठयाने बोलुन त्याला ते वाक्य पुन्हा बोलायला लावत होतो, बाजुला ते रेकॉर्ड करुन ठेवत होतो. रात्री झोपताना माझा मुलगा पुन्हा पुन्हा ते रेकॉरडिंग एकत होता व ती वाक्ये पुन्हा पुन्हा बोलत होता. त्याला शब्दोच्चारात मदत व्हावी म्हणुन केलेला लहानसा प्रयत्न..... कदाचित त्याला आपला आवाज एकायला मजा वाटत होती Happy

लोकसत्ताच्या आजच्या करीयर वृत्तांताच्या पुरवणीत हा एक लेख वाचनात आला.
आवडला म्हणून इथे शेअर करते आहे:

अ अभ्यासाचा : नेटकं लिहिण्यासाठी..

निंबुडा धन्स..... अग आज ऑनलाईन लोकसत्ता चाळताना हा लेख वाचला.... इथे शेअर करावा म्हणुन आले तर तु इथे आधीच लि़ंक दिलेली आहेस..... अत्यंत माहितीपुर्ण व विचारप्रवर्तक लेख आहे