wetlands - आपल्या किडनीज

Submitted by डी मृणालिनी on 9 February, 2020 - 11:36

कोकण सारखे ठिकाण , जिथे ३००० mm पाऊस पडतो. यावरून सगळ्यांनाच असं वाटतं कि कोकणात पाणी भरभरून असेल. पण तरीही मे महिन्यात इथल्या काही गावांमध्ये टँकर का लागतो ? मुळात कोकणातल्या मातीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता ०% आहे . महाराष्ट्राला पश्चिम घाट लाभल्यामुळे पावसाचे पाणी थेट या डोंगरांवरून थेट समुद्रात जात नाही . का ?? फक्त wetlands अर्थात पाणथळ जागा यांच्यामुळे . wetlands हे पर्यावरणात स्पंज सारखे काम करतात . जास्तीत जास्त पाणी शोषतात आणि गरज असताना release करतात . त्यामुळेच कोकणाला पाणी मिळते. झाडे जर आपली फुफ्फुसे आहेत तर wetlands आपली किडनी आहे. पण तरीही फक्त इमारती ,बंगले ,क्रिकेट पीच बांधण्यासाठी पुरातन काळापासून अस्तित्वात असलेले wetlands अक्षरशः बुजवले जातात. ही बुजवणारी लोकं गावातील सामान्य माणसे नव्हे बरं का ! ही सगळी लोकं so called सुशिक्षित , काही हिरो हिरोइन्स ( ज्यांना आज तरुण पिढी role model म्हणून बघते. ) , राजकारणी यांचा समावेश आहे . गेले ४ वर्ष आम्ही या wetlands जपण्याचा प्रयत्न करतोय . तुम्हाला काय वाटत ह्याबद्दल ??

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

wetlands हे पर्यावरणात स्पंज सारखे काम करतात . जास्तीत जास्त पाणी शोषतात आणि गरज असताना release करतात . >>>

ह्याबद्दल अधिक वाचायला आवडेल

पाणथळ जागा हा एक विशिष्ठ आणि महत्वपूर्ण अधिवास आहे. त्याचे फारच गरजेचे आहे. नुकतीच नांदूर मध्यमेश्वर हि नाशिक येथील पाणथळ जागा जागतिक रामसर यादीत समाविष्ट झाली आहे.

>>Submitted by हर्पेन on 10 February, 2020 - 03:55
>>
वेटलँण्ड्समुळे पुराचे पाणी काही प्रमाणात शोषले जाते. यात पाणथळीत वाढणार्‍या वनस्पती आणि पाणथळीतील माती हे दोन्ही महत्वाचे. पाणथळीतील मातीची पाणी पटकन शोषून घेण्याची क्षमता जास्त असते. अतिक्रमण न करता मोकळे ठेवलेले पाणथळीचे क्षेत्र पूर्ण भरते आणि साहाजिकच पुढील भागात पूराचे पाणी पसरण्याचा वेग आपोआप मंदावतो. आजूबाजूचा परीसर जसा कोरडा पडत जातो तसे हेच पाणथळीतले पाणी भोवतालचा वॉटर टेबलमधे झिरपत रहाते आणि भूजल पुनर्भरण होते.

पाणथळी या पर्यावरणाच्या साखळीत फार महत्वाच्या आहेत. त्यावर भराव टाकून त्या बुजवणे म्हणजे विनाशाला आमंत्रण! पाणथळीतील वनस्पतींच्या मुळांचे भक्काम जाळे हे किनारे बांधून ठेवतात आणि धूप होणे रोखतात. पुराच्या पाण्याचा वेगही कमी करतात ज्यामुळे वाहून आलेला गाळ संथपणे पूरक्षेत्रात पसरतो आणि स्थिरावतो. साहाजिकच गाळ भरलेले पूराचे पाणी वेगाने गावात घुसणे हा प्रकार कमी होतो.