धर्म

मेरे पास राधे मॉं है! - दिवस ३ रा

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 August, 2015 - 17:54

सध्या सोशलसाईटसवर राधे मा आणि त्यांचे स्कर्ट घातलेले फोटो हिट ठरताहेत.
आणि त्यावरूनच व्हॉटसपवर एक मेसेज फिरतोय,

व्हाय शूड* बाबाज हॅव ऑल द फन ..
- राधे मा

ज्यांना लगेच विनोद समजत नाही अश्यांना उलगडून देतो. म्हणजे आसारामबापूंसारखे पुरुषच का बाबागिरीच्या आड लाईफ एंजॉय करणार.. आता आमची पाळी आहे Happy

विनोदावर हसलो आणि फॉर्वर्ड केला. मायबोलीवर नव्हता टाकला कारण राधे मा यांचे कोणी भक्त इथे असल्यास भावना दुखवायला नको.

आज मात्र टाकला कारण हा विनोद नव्हताच असा साक्षात्कार मला सोनू निगमच्या लेटेस्ट ट्वीट वरून झाला.

तडका - एक निमित्त गटारीचे

Submitted by vishal maske on 13 August, 2015 - 22:05

एक निमित्त गटारीचे

कुणी स्वयं उतावळे असतात
कुणासाठी मात्र फूस असतात
रोज-रोज खाणारे-पिणारेही
गटारीवरती खुश असतात

गटारोत्सव साजरा करण्याचा
मनात हेका धरला जातो
अन् एक दिवसाच्या निमित्ताने
गटारीवर ताव मारला जातो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - अंधश्रध्देत

Submitted by vishal maske on 10 August, 2015 - 22:38

अंधश्रध्देत

जिथे श्रध्देनं लोक जातात
तिथेही अंधश्रध्देत बुडतात
असे अंधश्रध्देचे प्रकारही
आता दाटीवाटीने घडतात

डोक्या-डोक्यात प्रगल्भ अशा
अंधश्रध्देच्या खाई आहेत
अन् अंधश्रध्दा पसरविण्याला
हल्ली बुवा बरोबर बाई आहेत,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - भक्ती,...!

Submitted by vishal maske on 7 August, 2015 - 10:16

भक्ती,...!

आहेत भक्त भोळे म्हणून
हवे तसे भुलवले जातात
भक्तांच्या भोळे पणावरच
कुठे उद्योग चालवले जातात

कित्तेक श्रध्देच्या ठिकाणीही
भोंदूगीरी सादरलेली आहे
वाढत्या दांभिक प्रकरणांमुळे
भक्ती मात्र भेदरलेली आहे,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

काढून टाकला आहे

Submitted by Mother Warrior on 20 July, 2015 - 23:05

काढून टाकला आहे.
काढून टाकला आहे.
काढून टाकला आहे.
काढून टाकला आहे.
काढून टाकला आहे.

फेथ हीलिंग

Submitted by प्रकाश घाटपांडे on 14 July, 2015 - 04:03

मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिम् । यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम्|| समूह उन्मादाचे वातावरण तयार करुन पेशंटला त्या अवस्थेत नेण्यात येते. तो त्या उन्मादाच्या प्रभावात आला की तो आपल्या वेदना, दु:ख विसरतो. काही काळ त्याला बरे वाटते. आधुनिक उपचाराचा खर्च, त्याच्या मर्यादा पहाता फेथ हीलिंग कडे माणुस न वळला तरच नवल. रोगमुक्ती झाली नाही पण मेंदुला व पर्यायाने शरीराला बर वाटत असेल तर ती रोगमुक्ती का मानू नये असा पेशंट विचार करतो. माणूस अमर थोडाच आहे? यातच त्या फेथहीलिंग वाल्यांच यश आहे. असो!
हा व्हिडिओ पहा

गोत्र माझे भागवत

Submitted by पुरंदरे शशांक on 10 July, 2015 - 07:05

गोत्र माझे भागवत

आज सोनियाचा दिन
दिंडी येतसे वेशीला
संतमेळ्यासवे विठू
स्वये जाई पंढरीला

दिंड्या पताकांचे भार
आले वैकुंठ घरास
विठु नामाचा गजर
काय वानावी मिरास

भाळी अबीर चंदन
मुखे हरिचा गजर
नुरे संसाराचा पाश
विठु व्यापी अवकाश

तुका-माऊली गजर
धन्य गर्जते अंबर
डोळे वाहती भरुन
भक्ति अंतरापासून

विठु सखा भगवंत
गोत्र माझे भागवत
वारकरी गणगोत
नमनाची रीतभात

वारी जाते पंढरीला
चित्त वाहिले विठ्ठला
दुजे नाठवे जीवाला
नामरुप श्वास झाला .....

मला सदाशिव पेठ बघायचीय !

Submitted by हेमन्त् on 30 June, 2015 - 15:48

अनेकदा पुण्यात जावून सुद्धा या महान ऐ तिहासिक आणि सांन्स्कृतिक स्थळाचे दर्शन केले नाही … तरी ते करण्याचा इरादा आहे.
माझे काही मित्र ( जुने मुंबईकर आता पुणेकर ) हे ऐकताच थर थर कपू लागले .
" अरे X%^&(* झालास कि काय ? चाल घरी ये बिअर पिलावतो . असे हि म्हणाले ( ते चहाच नाही तर मद्य देतायत - म्हणजेच हे मुल पुणेकर नाहीत हे कळले आसेल्च.
तरी माझी विनंती खालील गोष्टी / सल्ला / सेवा मिळतील काय?

१) नकाशा - अचूक नकाशा मिळेल काय ? कारण इथे कोणीही पत्ता विचारले कि अपमान करतात !
२) गेंड्याच्या कातडीचा शर्ट - अपमान पचवायला !

नाम विठोबाचें

Submitted by नवनाथ राऊळ on 28 June, 2015 - 11:53

नारायणनामें । वर्षाव सुखाचा ।
उद्धार जिवाचा । तेणें होय ॥१॥

नाम विठोबाचें । द्रव्य जयांगाठीं ।
परमार्थहाटीं । साहुंकार ॥२॥

पांडुरंगनाम । आयुध अजोड ।
समूळ बीमोड । पातकांचा ॥३॥

इहलोकीं हेचि । साधन साचार ।
भवसिंधू पार । करावयां ॥४॥

नाथ म्हणें नाम । जपावें सज्जनीं ।
आठवावां धनी । वैकुंठीचा ॥५॥

Pages

Subscribe to RSS - धर्म