नाम विठोबाचें

Submitted by नवनाथ राऊळ on 28 June, 2015 - 11:53

नारायणनामें । वर्षाव सुखाचा ।
उद्धार जिवाचा । तेणें होय ॥१॥

नाम विठोबाचें । द्रव्य जयांगाठीं ।
परमार्थहाटीं । साहुंकार ॥२॥

पांडुरंगनाम । आयुध अजोड ।
समूळ बीमोड । पातकांचा ॥३॥

इहलोकीं हेचि । साधन साचार ।
भवसिंधू पार । करावयां ॥४॥

नाथ म्हणें नाम । जपावें सज्जनीं ।
आठवावां धनी । वैकुंठीचा ॥५॥

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रामनाम सब कोई कहे ठग ठाकूर और चोर
जिस नामसे ध्रुव प्रह्लाद तरे वो नाम कुछ और ||
असे कबीरजींनी जे म्हटले आहे ते नेमके उमटलंय या रचनेत -

नाथ म्हणें नाम । जपावें सज्जनीं ।
आठवावां धनी । वैकुंठीचा ॥५॥ - आधी सज्जन होणे महत्वाचे - मगच ते नाम काम करील एरव्ही बायबलची वाक्ये सैतानाच्या तोंडी शोभत नाहीत असे जे म्हणतात तसे व्हायचे ..... Happy

वाह नाथा, अप्रतिम रचना ..... Happy

Happy शशांकजी,
हे खरंतर स्वगत आहे.. Introspection का काय म्हणतात तसला प्रकार चालू असतो तेव्हा स्वतःला असं काहीतरी समजावत असतो मी...