धर्म

संक्रांत पर्वणी - तुकोबांच्या नजरेतून.

Submitted by पुरंदरे शशांक on 13 January, 2015 - 10:00

संक्रांत पर्वणी - तुकोबांच्या नजरेतून.

देव तिळीं आला । गोडगोड जीव धाला ॥१॥
साधला हा पर्वकाळ । गेला अंतरींचा मळ ॥ध्रु.॥
पापपुण्य गेलें । एका स्नानें चि खुंटलें ॥२॥
तुका म्हणे वाणी । शुद्ध जनार्दनीं जनीं ॥३॥ अभंगगाथा क्र. ४०५९||

(तिळी-तीळामधे, तिळाच्यारुपाने., धाला-आनंदला. , साधला-प्राप्त केला., पर्वकाळ-पर्वणी, पुण्य मिळवण्याची सुसंधी., अंतरींचा-मनातला, चित्तातला., मळ-दोष., खुंटले-संपले)

आपला कट्टा चर्चा निष्कर्ष संकलन

Submitted by शांताराम कागाळे on 7 January, 2015 - 09:13

१ ले चर्चा सत्र :

विषयः मोदींना पर्याय काय, मोदींना पर्याय का नाही, मोदींना पर्याय निर्माण होणे आवश्यक आहे की नाही!
दिवसः ७ जानेवारी २०१५

१. मोदींसारख्या नेत्यांना पक्षांतर्गत व पक्षबाह्य असे दोन्ही ठिकाणी समर्थ पर्याय निर्माण होणे एका देशासाठी आवश्यक आहे.

२. काँग्रेसने तूर्त नवीन चेहर्‍यांचा विचार करावा व पक्षबांधणीवर फोकस ठेवावा. ज्योतिरादित्य शिंदे हे नांव दोन सदस्यांनी सुचवले.

दिशाभूल आपली आणि तुकोबांचीही ???

Submitted by पुरंदरे शशांक on 28 December, 2014 - 22:09

दिशाभूल आपली आणि तुकोबांचीही ???

या जगात दिशाभूल कोणाची होत नाही - माझी, तुमची, सर्वांचीच - इतकेच काय प्रत्यक्ष तुकोबांचीही दिशाभूल झालेली ते या अभंगात सांगताहेत ...

तुम्हीं जावें निजमंदिरा । आम्ही जातों आपुल्या घरा ॥१॥
विठोबा लोभ असों देई । आम्ही असों तुमचें पाई ॥ध्रु.॥
चित्त करी सेवा । आम्ही जातों आपुल्या गावां ॥२॥
तुका म्हणे दिशा भुलों । फिरोन पायापाशीं आलों ॥३॥अभंगगाथा ५१०||

धर्मरक्षण्।

Submitted by विक्रमादित्य पणशीकर on 28 December, 2014 - 09:48

मंत्र - देशरक्षणासाठी खालील मारुती स्तोत्र म्हणावे.
श्रीगणेशाय नमः।
कोपला रुद्र जे काळी , ते काळा पाहावेचिना।
बोलणे चालणे कैचे , ब्रह्मकल्पांन्त मांडला॥१॥
ब्रह्मांडाहुनी जो मोठा , स्छुळ उंच भयानकु।
पुछ्य ते मुर्डले माथा , पावले सुन्यमंडळा॥२॥
त्याहुनी उंच वज्रांचा , स्छुळ उंच भयानकु।
त्यापुढे दुसरा कैचा , आद्भुत तुळणा नसे॥३॥
मार्तंडमंडळा ऐसे , दोनी पिंगाक्ष ताविले।
कर्करा घडिल्या दाढा , उभे रोमांच उठीले॥४॥
आद्भुत गर्जना केली , मेघचि चेवले भुमी।
फुटले गिरीचे गाभे , तुटले सींधु आटले॥५॥
आद्बुत वेश आवेशे , कोपला रण कर्कशु।
धर्म स्थापनेसाठी , दास तो उठीला बळे॥६॥

विषय: 
शब्दखुणा: 

उत्तर

Submitted by नितीनचंद्र on 19 December, 2014 - 00:48

गुरुवार दिनांक १८ डिसेंबर २०१४. सकाळी ११.०० वाजता मुलाखतीला बोलावल होत. मुलाखत सुरु झाली. मुलाखत दुसरी होती त्यामुळे माझा अनुभव पडताळणे हा भाग नव्हता. मी हा जॉब करायला अनुकुल आहे का नाही याचा अंदाज मुलाखतकारिण घेत होती. माझे शब्द आणि बॉडी लॅग्वेज याचा मेळ घालत होती. आज मी स्वतंत्र व्यावसायीक सल्लागार आहे तर मला नव्याने टा़कलेली टर्म एमप्लॉयमेंट ही टर्म पसंत पडेल हे जाणणे मुलाखतीचा मुख्य विषय होता. लगेचच उत्तर देणे शक्य नव्हते म्हणुन मी चेहेरा हसरा ठेवत टाईम बाय केला आणि कळवतो असे सांगीतले.

शब्दखुणा: 

वरदायिनी कालिका

Submitted by Mandar Katre on 18 December, 2014 - 04:45

वरदान काळकाई ऊर्फ वरदायिनी कालिका ह्या देवी चे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर जवळ मुंबई-गोवा हायवे नजीक धामणी गावी आहे . या देवस्थानाला सुमारे 1000 वर्षापूर्वीपासूनचा इतिहास असून या मंदिरानजीक असलेल्या पुरातन शिल्पात काही सांकेतिक चिन्हे कोरलेली आहेत ,ज्यायोगे असे सिद्ध होते की हे देवस्थान हिमालयातील कटरा vaishnodevi च्या खालोखाल जागृत आहे. परंतु आजतागायत ते प्रसिद्धीस आलेले नसून प्रसिद्धी-पराङ्ग्मुख आहे. या देवळानजिक एक नयनरम्य धबधबा असून पावसाळ्यात जुलै -औगस्ट महिन्यात अतिशय नयनरम्य निसर्गसौंदर्य पाहावयास मिळते . देवीची मूर्ति चतुर्भुज असून सिंहासनाधिष्ठित आहे .

विषय: 

आधुनिकता की उथळपणा ?

Submitted by वीणा सुरू on 15 December, 2014 - 10:16

१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.

सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).

ईसीस ! जगासाठी नविन खतरा !

Submitted by शांताराम कागाळे on 13 December, 2014 - 13:21

शिया आणि सुन्नी यांच्यातील ईराक, ईराण आणि सिरीया या देशातील अंतर्गत युद्धात भाग घेण्यासाठी ३०,००० सैनीक तयार केले जायचे होते. त्यातले काही तरुण या अगोदरच ईराक मध्ये पोहोचले आणी त्यांनी

नाण्याची दुसरी बाजू अर्थात Behind Every Crime There Is An Injustice

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 12 December, 2014 - 06:34

काही काळापूर्वी मी शालेय विद्यार्थ्यांची शिकवणी घेत होतो तेव्हाची गोष्ट. माझ्याकडे येणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये सातवीत शिकणारा वरद नावाचा एक चुणचुणीत मुलगा होता. तो अतिशय जिज्ञासू आणि अभ्यासू असल्याचे माझे निरीक्षण होते. एकदा मात्र इतिहासाचा विषय निघाला असता तो अचानक काही कारणाने उत्तेजित झाला. इंग्रजांनी आपल्यावर अनन्वित अन्याय अत्याचार केले असून तिथे जाऊन आपणही त्यांचा तशाच प्रकारे बदला घेतला पाहिजे. इंग्लंडमध्ये जाळपोळ करून तो देशच नष्ट केला पाहिजे वगैरे, वगैरे. त्याला आधी मी शांत होण्यास सांगितले.

Pages

Subscribe to RSS - धर्म