पुस्तक

मराठीमध्ये सध्या वाचकप्रिय (Mass Appeal) असलेले लेखक/लेखिका कोण आहेत?

Submitted by बोबो निलेश on 6 March, 2014 - 23:57

काहींना हा प्रश्न बाळबोध वाटेल. पण गेली काही वर्षे वाचनाशी संबंध काहीं तुटला होता. पुन्हा वाचायला सुरुवात करतो आहे. मला जाणून घ्यायला आवडेल -
पुल, वपु , मतकरी , कणेकर ,सुशि यांच्याप्रमाणे मराठी भाषेमध्ये सध्या वाचकप्रिय (Mass Appeal) असलेले लेखक/लेखिका सध्या कोण आहेत?
माझ्या अगोदर आधी कुणी अशी पोस्ट केली असल्यास मला त्याची लिंक द्यावी.

शब्दखुणा: 

मराठी भाषेतील ई-पुस्तके आणि तदनुषंगाने स्वामित्वहक्कांबद्दल चिंतन

Submitted by व्यत्यय on 1 March, 2014 - 04:03

जगभरातील मराठी भाषिक लोकांमध्ये स्मार्ट फोन आणि टेबलेट वापरायचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढत आहे. या फोन किंवा टेबलेटवर इंग्रजी ई-पुस्तके वाचणाऱ्यांची संख्या पण लक्षणीय आहे. तरीही मराठी भाषेतली ई-पुस्तके कुठेही बघायला मिळत नाहीत. बुकगंगा यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत, पण तरीही त्यांचे स्वत:चे वेगळे app वापरावे लागते. आणि माझा या app चा अनुभव काही चांगला नाही. मी Flipkart किंवा तत्सम साईटवरून अजूनही मराठी ई-पुस्तके विकत नाही घेऊ शकत.

आठवणीतली (आवडलेली) पुस्तकं..

Submitted by बोबो निलेश on 22 February, 2014 - 14:00

आठवणीतली (आवडलेली) पुस्तकं..

आतापर्यंतच्या प्रवासात निस्वार्थीपणे बऱ्याच पुस्तकांनी सोबत दिली. त्या पुस्तकांचे आणि त्या लेखकांचे आभार मानण्याचा एक अपुरा, तुटपुंजा प्रयत्न.

का कुणास ठाऊक, पण पहिलं आठवलं… वीरधवल. नाथ माधव यांचं हे पुस्तक लहान पणी मनावर गारुड करून गेलं. आज हँरी पॉटर लहान मुलांवर जी जादू करतो, तीच जादू वीरधवलने त्या काळी माझ्यावर केली होती. त्याचं दुसरं पुस्तक पुस्तक - राय क्लब उर्फ सोनेरी टोळी सुद्धा भन्नाट होतं. त्यावर अशोक सराफचा चित्रपट निघाला होता. बहुधा द मा मिरासदारांचे संवाद होते. मला पुस्तक जास्त आवडलं चित्रपटापेक्षा.

इंग्रजीवरील प्रभुत्व

Submitted by विजय देशमुख on 11 February, 2014 - 22:26

आजकाल इंग्रजी भाषा आवश्यक झाली आहे. आपल्याला आवडो वा नावडो, कधीतरी कुठेतरी असं वाटुनच जातं की आता इंग्रजीवरही प्रभुत्व हवच. आपापल्या क्षेत्रांत आवश्यक असणारे संभाषण, प्रेझेंटेशन्स वगैरे फारशी जड जात नाही. ती सवयीने जमायला लागतात, पण आपल्या क्षेत्राच्या बाहेर विचार करणे, बोलणे, वाचणे, लिहिणे फारसं जमत नाही. असं नाही की इंग्रजी बोलताच येत नाही, पण वेळेवर नेमके शब्द आठवत नाही किंवा काय बोलावं, ते सुचत नाही. कित्येकदा इतर लोकं धडाधड सिडने शेल्डॉन {माझ्या काळातली} वगैरे कादंबरी लेखकांची नावे घेतात, तेंव्हा वाटते की अरे, आपण काहीच वाचत नाही की काय?

इस्मत चुगताइंचे पुस्तक - 'रजई'....एक वेगळाच वाचनानुभव

Submitted by यक्ष on 5 February, 2014 - 06:49

अत्ताच इस्मत चुगताई ह्यांचं मराठीत अनुवादित 'रजई' पुस्तक वाचून संपवलं.त्यांचं मी हे वाचलेलं पहिलंच पुस्तक!

'इस्मत चुगताई' ...एक अप्रतिम वाचनानुभव!

नव्वाबी / लखनवी 'तोर्‍याचा थोडाफार अंदाज असल्याने गोष्टी वाचतांन्ना एक वेगळीच अनुभुती!

शब्द थेट....मार्मिक....चपखल...खपल्या उखडवून जखमा वाहती करणारे पण संयमी!धीट..अवखळ....स्तंभित करणारे....तर काही ठिकाणी अगदी निरागस...!!

शब्दांच्या गुंतितून विचारांची गुंतगुंत केव्हा सुरु होते ते कळतच नाही.

धन्यवाद अनुवादिकेला ते योग्य शब्दांत समर्थपणे पेलल्याबद्दल !!

विषय: 

'शोध स्वामी विवेकानंदांचा' - डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर

Submitted by चिनूक्स on 27 January, 2014 - 11:58

समाजात अद्वितीय काम करणार्‍या समाजपुरुषांना, संतांना, कलाकारांना आपल्याला आवडणार्‍या-पटणार्‍या-मानवणार्‍या विचारचौकटीतच बसवणं, हा आपला आवडता उद्योग आहे. त्यामुळे सामाजिक-धार्मिक-राजकीय क्षेत्रातल्या मंडळींना दैवत्वही चटकन प्राप्त होतं. या समाजदैवतांच्या नावे मग आपले विचारही काहीजण खपवतात. इतरांना नव्यानं विचार करण्याची गरज वाटत नाही.

राग दरबारी

Submitted by आतिवास on 9 January, 2014 - 01:05

आजकाल पुस्तकं वाचताना मला माझ्यात झालेला एक बदल जाणवतो.
पूर्वी 'कोणतं पुस्तक छान आहे, आवडलं आहे?' या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं होतं.
जे पुस्तक वाचताना भूक, झोप, इतर व्यवधानं यांचा पूर्ण विसर पडतो; जे पुस्तक एकदा हातात घेतलं की शेवट होईपर्यंत हातातून सोडवत नाही; दुर्दैवाने ते बाजूला ठेवायची वेळ आलीच तर संधी मिळताक्षणी ते जिथं सोडलं होतं तिथून पुढे चालू केलं जातं - ते चांगलं पुस्तक!

पण आजकाल माझं मत बदललं आहे.
अनेक चांगली पुस्तकं वाचताना हा बदल जाणवतो.

मला आवडलेली आत्मचरित्रं..

Submitted by _आनंदी_ on 15 November, 2013 - 00:53

इथे पुस्तकांविषयी चे बरेच धागे आहेत ,,,
तरी फक्त आत्मचरित्रांबद्दल माहिती मिळवी या हेतुने हा धागा काढत आहे...

एखद्या प्रसिद्ध अथवा गुणी व्यक्ती, त्याच्या आत्मचरित्रातुन जाणुन घेण्याची मजा काही औरच आहे,,,

कृपया आपल्याला आवडलेल्या आत्मचरित्र पुस्तकांची येथे नोंद करा..

***************************************************
***************************************************
***************************************************
०७/०१/२०१४ पर्यंत नोंदवलेली काही आत्मचरित्रे

मराठी

१) प्रकाशवाटा:- प्रकाश आमटे
२) एकटा जीव :- दादा कोंडके

विषय: 
शब्दखुणा: 

सात पाउले आकाशी

Submitted by आतिवास on 17 October, 2013 - 06:02

‘फूलघर’ ही झाडांनी वेढलेली एक सुंदर जागा. संध्याकाळच्या वेळी तिथं बसून सगळेजण चहा पीत आहेत निवांत. एक तेजस्वी आवाज विचारतो, “मनुष्याला ज्या पद्धतीने जगावसं वाटतं, त्या पद्धतीने तो जगू शकेल? विशेषकरून स्त्री? ” तो प्रश्न असतो वसुधाचा.

अ‍ॅना, आलोपा, विनोद, मित्रा . . त्यांच मत मांडतात.

“करू शकेल. पण नंतर तो दु: खी होईल. स्त्री असेल तर विशेषत्वाने.” एक स्पष्ट उत्तर येतं.

“स्त्रीसुखाची तुमची व्याख्या काय?” वसुधाचा त्यावर आणखी एक धारदार प्रश्न.

Pages

Subscribe to RSS - पुस्तक