मराठी अनुवाद

'ब्लाईंडनेस'- ज्युझे सारामागो

Submitted by साजिरा on 8 October, 2022 - 06:15

आपण आपल्या आयुष्याला जगण्याला किती गृहित धरत असतो. आपल्या आजूबाजूला असलेल्या, आपल्या मालकीच्या असोत वा नसोत, अनेक गोष्टी, वस्तू, व्यक्ती आणि एकंदरच आपल्या भोवताली मांडलेलं किंवा आपसूक तयार झालेलं नेपथ्यही गृहित धरून चालतो. एका दृष्टीने पाहिलं तर हे सारं आपण आपलंच समजून जगत राहतो.

मग एक दिवस अचानक आपला एखादा जिवलग, आपल्याला रोज भेटत असलेली व्यक्ती मरतेच.
हे काय आक्रित- असं म्हणून आपण हलतो, घाबरतो. माणूस अगदीच घरातलं असलं तर हादरून, कोसळून जातो. हताश-निराश होऊन बसून राहतो. अनेक दिवस आपले दैनंदिन व्यवहार बदलतात.

विषय: 

ओ जोनाकी... अनुवाद

Submitted by चैतन्य दीक्षित on 23 October, 2015 - 11:39

गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या एका काव्याचा मराठीत अनुवाद करण्याचा हा प्रयत्न.

ओ जोनाकी-

सांग काजव्या कसल्या आनंदाने इवले पंख पसरिशी?
सांजेला अंधारवनांतुन उल्हासाने कसा विहरिसी?

तू न दिवाकर वा रजनीकर
आनंद तुझा कमी न कणभर
स्वतः उजळुनी जीवन अपुले पूर्णत्वा नेसी |

तुझ्याजवळि जे, तुझेच ते धन
नसे शिरी तव कोणाचे ऋण
राहतोस अंतरातल्या शक्तीच्या आदेशी |

तमोघटाची शकले करिसी
वामन तू परि 'वामन' ठरसी
अपुल्याशा केल्यास जगातिल तेजाच्या राशी |

पुस्तक परिचय: आव्हान जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे

Submitted by नरेंद्र गोळे on 12 May, 2014 - 23:29

मूळ इंग्रजीत प्रकाशित झालेल्या, ब्रिगेडिअर हेमंत महाजन लिखित पुस्तकाचा, श्री.नरेंद्र गोळे ह्यांनी केलेला, ’आव्हानः जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे’, हा मराठी अनुवाद १०-०५-२०१४ रोजी पुण्यात प्रकाशित झाला. हे पुस्तक माधवी-प्रकाशन-पुणे येथे, खालील पत्त्यावर विक्रीस उपलब्ध आहे.

चंद्रशेखर जोशी
दत्तकुटी, १४१६ सदाशिवपेठ, पुणे ४११०३०

॥ रावण विरचित शिव तांडव स्तोत्र ॥ - मराठी अनुवाद

Submitted by नरेंद्र गोळे on 28 November, 2012 - 08:19

॥ रावण विरचित शिव तांडव स्तोत्र ॥ http://hindi.webdunia.com/religion/occasion/vijayadashami/0710/19/107101...

मूळ संस्कृत श्लोक व मराठी अनुवाद
जटाटवीगलज्जल प्रवाहपावितस्थले
गलेऽवलम्ब्य लम्बितां भुजंगतुंगमालिकाम्‌

डमड्डमड्डमड्डम न्निनादवड्डमर्वयं
चकार चंडतांडवं तनोतु नः शिवः शिवम्‌

जटांमधून धावत्या जलांनि धूत-कंठ जो
धरीत सर्पमालिका, गळ्यात हार शोभतो

डुम्मूडुम्मू करीत या, निनाद गाजवा शिवा
करीत तांडव प्रचंड, शंकरा शुभं करा
जटा कटाहसंभ्रमभ्रम न्निलिंपनिर्झरी
विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धनि

धगद्धगद्धगज्ज्वल ल्ललाटपट्टपावके

शब्दखुणा: 

स्वप्न माझे आसवांनी बुडवले...

Submitted by मंदार शिंदे on 19 June, 2012 - 00:44

स्वप्न माझे आसवांनी बुडवले
निष्ठेने माझ्याच एकटे पाडले

जीवनातली तहान नाही सरली
गीत प्रेमाचे न पूर्ण जाहले

वार त्याचा हा असेल अखेरचा
आशेवर या वार सारे सोसले

नष्ट केले मी जरी माझे मला
दोघांमधले अंतर नाही संपले

(हसन कमाल यांच्या 'दिल के अरमां' या प्रसिद्ध हिंदी गाण्याचं मराठी रूपांतर)

गुलमोहर: 

कालाय तस्मै नमः | ------- १

Submitted by श्यामजी कुल on 10 May, 2012 - 03:03

जन्माने रशियन पण नंतर अमेरिकेचे नागरिक प्राप्त वैज्ञानिक जॉर्ज गॅमो (George Gamow)
यांनी १९३८ मध्ये अवकाशाचे वक्रत्व व अवकाशाची प्रसरणशीलता या सापेक्षतेच्या सिद्धांताशी निगडित
असणाऱ्या कल्पना सर्वसाधारण माणसाला समजणाऱ्या भाषेत कथेच्या माध्यमात सांगण्याचा प्रयत्न केला..या कथेतील तो माणूस म्हणजे बॅंकेत कारकून असणारा सी.जी.एच. टॉमकिन्स हा तरुण ! ही कथा त्यानी हार्पर्स मॅगेझिन या प्रसिद्ध मासिकाकडे पाठवली व पूर्वपरंपरेनुसार ते साभार परत आले..ते मग त्यानी बासनात बांधून ठेवले.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

षट्पदी स्तोत्राचा मराठी अनुवाद

Submitted by चैतन्य दीक्षित on 8 January, 2011 - 04:24

आदि शङ्कराचार्यांच्या 'षट्पदी' स्तोत्राचा मराठी अनुवाद.

हरि मम अविनय विष्णो, दमन मना करि हरि विषयी तृष्णा ।
भूतदया वितरी रे, तारी संसारसिंधुतुनी ॥१॥

दिव्य जया मकरंदू, परिमळ ज्या एक सच्चिदानंदू ।
सकलभवभयच्छेदू, हरिपदकमळासि त्या वंदू ॥२॥

जरि 'मी-तू'पण गेले, तरि मी नाथा तुझा, न तू माझा ।
लाट महोदधिपासुनि, न च लाटेचा कधी उदधी ॥३॥

गिरिधर हे इंद्रानुज, दैत्यकुलारे, रवि-शशि नेत्र तुझे ।
कृपाकटाक्षे तव भव-बंधन माझे तुटे सहजि ॥४॥

मत्स्यादिक अवतारी, अवतरुनी रक्षिलेस विश्व सदा ।
त्वा मजसी भवतप्ता, रक्षावे सदैव परमेशा ॥५॥

मनरमणा गुणसदना, सुंदरवदना दयाघना कृष्णा ।

गुलमोहर: 

रविंद्रनाथांच्या कविता - ३ - तुझे प्रेम ...

Submitted by vaiddya on 2 September, 2010 - 04:11

तू गेल्यावर
तुझे इथे
हे प्रेम कसे राहिले ?
रस्ते हरवून
तुझे परतणे
दूर कसे राहिले ?

हृदयामध्ये
तुला घेऊनी
फिरतो आता दुनिया ...
खळखळ पाणी
अवखळ पाने
वसंतवेडी माया !

सांडून गेलेले
प्रेमाचे तारे
वरती हसले ..
तिथेच कोठे
तुझ्या घराचे
दार मला का दिसले ?

मूळ कविता : रविंद्रनाथ टागोर
मुक्त मराठी अनुवाद मी चैत्र या नाटकासाठी केला.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - मराठी अनुवाद