पुस्तक परिक्षण

’दुर्दम्य’ - गंगाधर गाडगीळ. राजकारणाच्या विद्यापीठाबद्दल!

Submitted by मुग्धमानसी on 23 March, 2020 - 03:15

'राजकारण' या एकूणच विषयाबद्दल काहीशी नकारात्मक आणि परकेपणाची भावना घेऊन जन्माला आलेल्या आणि बहुतांश आयुष्य़ जगलेल्या एका पिढीत आणि वर्गात आपल्यातील बर्‍याच जणांचा समावेश होतो. आपण ज्यांना खरोखर आदर्श ’नेता’ किंवा ’पुढारी’ म्हणून ओळखत होतो आणि अजूनही ओळखतो ते सारे आपल्या जन्माच्या कैक वर्षे आधीच निवर्तलेले होते किंवा त्यातले थोडके आपल्या बालपणीच संपून गेले. आपल्या पुढे ’राजकारण’ या क्षेत्रातला आदर्श म्हणावे असे खरे पाहता कुणीच हयात स्थितीत नव्हते.

शब्दखुणा: 

The Romanov Sisters - हरवलेल्या जीवनाची कहाणी

Submitted by वेदिका२१ on 7 January, 2015 - 00:28

इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने १८३७ ते १९०१ या काळात इंग्लंडवर (आणि भारतावरही!) राज्य केलं. मुंबईतील व्ही.टी. स्टेशन - व्हिक्टोरिया टर्मिनस (आताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस), कलकत्याचं व्हिक्टोरिया मेमोरियल आदी वास्तूंना याच व्हिक्टोरियाचं नाव दिलं गेलं होतं. या व्हिक्टोरियाने आपल्या मुलानातवंडांची लग्नं युरोपातील विविध राजघराण्यात लावून दिली. म्हणूनच तिला ’युरोपची आजी’ (Grandmother of Europe) असंही म्हणतात.

G.I. Brides - परीकथेपासून वास्तवापर्यंतचा प्रवास

Submitted by वेदिका२१ on 27 December, 2014 - 00:41

दुसऱ्या महायुध्दात जर्मनी इंग्लंडवर बॉम्बहल्ले करत होता. फ्रान्सचा आधीच पाडाव झालेला. इंग्लंडने अमेरिकेकडे मदतीची याचना केली आणि अमेरिकन सैनिक मोठया प्रमाणात युरोपात दाखल झाले. यापैकी अनेक ’सैनिक’ हे सैनिकी करीयर असलेले नव्हते तर सर्वसामान्य तरुणांनाही या काळात सैन्यात भरती होणं भाग होतं. दीर्घकाळ चाललेल्या या युध्दात अखेर जर्मनीचा पाडाव झाला. विजयी अमेरिकन सैनिक मायदेशी परतले.

प्रतिमा-प्रचीती

Submitted by शर्मिला फडके on 14 June, 2014 - 14:06

प्रतिमा-प्रचीती
नितीन दादरावाला
लोकवाङ्मय गृह

छायाचित्रकारांवर लिहिले गेलेले पुस्तक वाचताना तुमच्या मनात काय अपेक्षा असतात? असाव्यात?

सृजनाचे साक्षात्कार

Submitted by नीधप on 1 November, 2011 - 04:02

पुस्तकाचे नाव - सृजनाचे साक्षात्कार; दृश्य कथा कार्यशाळेतील कलाकार स्त्रियांची संपादित मनोगतं
मूळ लेखन - सी. एस. लक्ष्मी
अनुवाद - उर्मिला भिर्डीकर, उज्ज्वला मेहेंदळे
संपादन - अंजली मुळे
प्रकाशक - स्पॅरो SPARROW
प्रथम आवृत्ती - ऒगस्ट २०००
--------------

विषय: 

पुस्तक परिक्षण: "द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी" आणि त्या पुस्तकाच्या पुढच्या मालिका..

Submitted by निमिष_सोनार on 4 August, 2010 - 11:20

नुकतेच "द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी" चे मराठी भाषांतर विकत घेतले आणि आताच वाचून संपवले.
(संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली)
हे एक अप्रतिम पुस्तक आहे. त्याचे लेखक आहेत रॉबिन शर्मा. दक्षिण अमेरिकेतील "शर्मा लिडरशीप इंटरनॅशनल " चे चालक, मालक, संस्थापक. त्यांची व्याख्याने जगभर होतात-व्यक्तीमत्त्व विकास आणि लिडरशीपचे बद्दलचे धडे याबद्दल.
आणखी माहिती रॉबिनशर्मा डॉट कॉम वर वर मिळेलच.
या लेखाचा मूळ उद्देश्य म्हणजे या पुस्तकाबद्दल मला आलेले अनुभव-
बाजारात व्यक्तीमत्त्व विकास आणि लिडरशीपचे बद्दलचे तसे अनेक पुस्तके येतच असतात. प्रत्येक पुस्तक बेस्ट्सेलर असल्याचा दावा करत असते.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - पुस्तक परिक्षण