मी आज/इतक्यात काय वाचले

Submitted by हर्ट on 21 September, 2014 - 10:54

मायबोलिवरचे वाचक मला माहिती आहेत त्यावरुन माझ्या असे लक्षात आले की मराठी भाषेतील सकस दर्जेदार साहित्य त्यांनी आत्तापर्यंत वाचले आहे. नवीन साहित्य मिळावे असे त्यांना मनापासून वाटते. किंवा जुन्यातील एखादे राहून गेलेले, कानाडोळा झालेले, न मिळू शकलेले साहित्य वाचायचे राहून गेले आहे.

आपण रोज काहीनाकाही वाचतो. आपल्यापैकी प्रत्येकाचे वाचन कधी नेटवर तर कधी पुस्तके घेऊन, कधी वर्तमानपत्रातून तर कधी एखाद्या ग्रंथालयात, मित्रांशी गप्पा मारताना.. वाचन काय कुठेही होऊ शकते. अर्थात, वाचनाची संधी तुम्हाला कुठेही मिळू शकतो. मध्यंतरी मी एका कोर्टात गेलो आणि तिथे भिंतीवर एक खूपच सुंदर कविता लिहिलेली होती. ती मी इथे नंतर देईल. आणि ती कविता कोर्टामधे इतकी फिट्ट बसत होती ना की मला तिथे ती कविता लिहिणार्‍याची कमाल वाटली.

तर मित्रांनू तुम्ही रोज अधूनमधून जे काही वाचता ते इथे लिहा. त्यातून इतरांना वाचन करायला थोडी मदत होईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ललिता+१
किंवा 'मी वाचलेले पुस्तक' सुद्धा याच धर्तीवर आहे. तिथेही लोकांच्या सध्या वाचलेल्या पुस्तकांविषयी पोस्ट्स असतातच की.

वेबसाइट चालेल का ?
http://www.marathi.aarogya.com/

ही मानसशास्त्रावरची माझ्यासारखीलाही कळेल अशा सोप्या भाषेतली उपयोगी साईट आहे. छान आहेत लेख.

हा एक सर्वांनी वाचण्यासारखा.
http://www.marathi.aarogya.com/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96/%E0%A4%AE%E0%...

म्हणजे आपल्याकडॅ स्वयंपाकाला ठेवलेल्या नारी कुक ला व्यवस्थित प्रमाणात साखर घालून गिळगिळीत नसलेलं व शिकरण करायला शिकवणे. Happy

मी अनु Lol
@धागाकर्ता - हर्ट नका होऊ गडे

अनु Lol

@धागाकर्ता - हर्ट नका होऊ गडे>>>>>>> हर्ट व्हायला ते आहेत का आता इथे?