माझा पहिला कथासंग्रह!

Submitted by ए ए वाघमारे on 1 October, 2014 - 01:10

तमाम मायबोलीकर दोस्तमित्रांना सांगण्यास आनंद होतो आहे की माझा पहिला कथासंग्रह "टर्मिनस" लवकरच प्रकाशित होतो आहे.

cover-500x500.jpg

प्रकाशक: शब्दांजली प्रकाशन,पुणे
ऑनलाईन बुकिंग: www.pustakjatra.com

http://www.pustakjatra.com/index.php?route=product/product&product_id=1849

कथासंग्रहाबद्दल थोडेसे:
या माझ्या पहिल्या कथासंग्रहाला गूढकथा, भयकथा, रहस्यकथा,विनोदी कथा असं सरसकट कुठलही लेबल लावणं मला अवघड वाटतं. हल्ली मराठीत कथांचे विस्मयकथा, संदेहकथा, क्षणकथा, रूपककथा इ.इ. इतके नवे प्रकार संपादकमंडळींनी जन्मास घातले आहेत की त्या गोंधळात न पडलेलेच बरे!

वास्तविक ललित लेखनाला प्रस्तावना हवी का आणि लेखकाने आपल्या लेखनाबद्दल बोलावं का? याबाबतीत माझ्या मनात जरा किंतु आहे. तरी आपल्या मायबोलीकर मित्रांच्या आग्रहावरून मी हे लिहित आहे.

तर या कथासंग्रहात एकूण १० कथा असून सर्व ओरिजिनल आहेत. त्यातील पाच पूर्वी प्रसिद्ध झाल्या असून उरलेल्या ताज्या आहेत. काही कथा मी महाविद्यालयीन विद्यार्थी असताना ०९-१०वर्षांपूर्वी लिहिलेल्या आहेत. त्या मी हेतुपुरस्सर फारसं एडिट/ पुनर्लेखन न करता तशाच ठेवल्या आहेत.

प्रत्येक कथा ही कथावस्तू ,निवेदक, निवेदनशैली, काळ, पात्रे इ.इ. बाबतीत दुसरीपासून वेगळी असावी असा माझा प्रयत्न आहे. उदा. 'काचेचे ग्लास' ही कुटुंबकथा असून 'सर्किट' ही वेगळ्या अर्थाने विज्ञानकथा आहे. 'पाऊलखुणा' ही कथा फ्युचर फॅण्टसी असून 'चूक?' आणि 'टर्मिनस' या कथा फिलॉसॉफिकल फॅण्टसी आहेत तर 'खोळ' ही एक चिंतनकथा[हा माझा शब्द Happy ] आहे. हे फारच ढोबळ वर्णन झालं,शेवटी कथेचं वर्गीकरण महत्वाचं नसून वाचकांना ती आवडणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे.

मायबोलीकरांसह समस्त मराठी वाचकांना काहीतरी वेगळं देण्याचा माझा प्रयत्न आहे.तो आपणास आवडेल अशी आशा आहे.

चोखंदळ मायबोलीकरांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन अभिनंदन !
पण थोडे डिटेल्सही येऊद्यात. वाचकांची उत्सुकता वाढवून त्यांना हे पुस्तक वाचण्यास उद्युक्त करावे या हेतूने Happy

अरे वा! अभिनन्दन आणी पुढील वाटचालीकता शुभेच्छा.:स्मित:

पण थोडे डिटेल्सही येऊद्यात. वाचकांची उत्सुकता वाढवून त्यांना हे पुस्तक वाचण्यास उद्युक्त करावे या हेतूने>>>> हे बरुबर, म्हणजे कथा गुढ आहेत की रोमॅन्टीक ते पण कळेल.

"एक विचारवंताचा मृत्यू" लिहील्यावर बरीच प्रगती केली म्हणायची !!

तुमच्या लिखाणाची झलक त्यात दिसलेलीत्यात, त्यामूळे, ............... बेस्ट ऑफ लक !!

अभिनंदन अभिनंदन !
पण थोडे डिटेल्सही येऊद्यात. वाचकांची उत्सुकता वाढवून त्यांना हे पुस्तक वाचण्यास उद्युक्त करावे या हेतूने

>> +१

सर्वांचे धन्यवाद!