माणूस

माणूस

Submitted by Meghvalli on 21 March, 2024 - 00:51

माणसांच्या जातीत माणसे आहेत थोडीच , उरलेली सर्व आहेत न उलघडणारी कोडीच
माणसाने कसं माणसासारखं वागावं , चोऱ्यामाऱ्या कराव्यात आणि दुसऱ्याला नागवावं
माणसांच्या वस्तीत माणूसच नसतो , चुकून जर भेटलाच तर आपणच टाळत असतो
माणसाला नेहमीच अनंताची गोडी , मिळवण्यासारखं अनंत असतं पण वेळ असते थोडीच
एकटा असताना माणूस केविलवाणा दिसतो , माणसांच्या गर्दीत तो माणूसघाणा होतो
माणसाचं माणसाशी नातं तसं एकच असतं , एकमेकां वाचून त्यांचे काहीच चालत नसतं
माणसाचं स्वतःचे असे एक तत्वज्ञान असतं ,बोलायचे एक आणि करायचं दुसरंच असतं

नदी आणि विकास

Submitted by नानबा on 4 May, 2023 - 04:35

नदी आणि विकास
~ शिरीष कोठावळे

नको ग! नको ग!
आक्रंदे नदी ही
पायाशी लोळत
नमून विनवी

काँक्रीट ओतशी
वेगात वरून
आणिक खाली मी
चालले मरून!

फोडीशी खडक
चोरिशी वाळू ही
कशाचा विचार
नाही तो जराही!

नको ग! नको ग!
आक्रंदे नदी ही
बेभान होऊन
कापिशी झाडे ही

तोंडचा तोबरा
नदीत टाकून
उर्मट माणूस
गर्जला माजून

दुर्बळ! अशीच
ओरड खुशाल
पहात रहा तू
माझी ही कमाल!

आपसूक

Submitted by mi manasi on 9 May, 2022 - 22:25

तू फूल हो..
मग मार्गही सुगंधी होईल आपसूक
तू चूल हो..
मग भूकही माऊली होईल आपसूक
तू सूर हो..
मग दु:खही बासरी होईल आपसूक
तू वृक्ष हो..
मग साथही सावली होईल आपसूक
तू चंद्र हो..
मग रात्रही चांदणी होईल आपसूक
तू प्रेम हो..
मग स्पर्शही मल्मली होईल आपसूक
तू यार हो..
मग यादही चंदनी होईल आपसूक
तू पार्थ हो..
मग दैवही सारथी होईल आपसूक
तू देव हो..
मग भक्तीही साजरी होईल आपसूक
तू ज्योत हो..
मग जन्मही आरती होईल आपसूक
माणूस हो..
मग पूर्तता जीवनी येईल आपसूक

मी मानसी...

शब्दखुणा: 

सुरळीत नियमित अव्याहत

Submitted by अदिती ९५ on 28 April, 2022 - 23:14

तुझं चालू आहे की सगळं
सुरळीत नियमित अव्याहत
वर्षामागून वर्ष जात आहेत
ऋतुमागून ऋतू बदलत आहेत
फाल्गुन संपला की चैत्राची चाहूल
नाविन्याकडे पुढलं पाऊल
शिशिरात सारं जीर्ण सोडून द्यायचं
आपली आपणच करायची डागडुजी
वसंतात पुन्हा बाळसं धरायचं
मोहोर, धुमारे, सुकुमार चैत्रपालवी
तू लाख शिकवशील हे सगळं, लाखवेळा
पण इथे वेड पांघरायच्या नाना कळा
तेव्हा तुझा आपलं चालू दे असंच
सुरळीत नियमित अव्याहत
कधीतरी येईल शहाणपण आम्हालाही
तुझ्याकडून काय, किती आणि कसं घ्यायचं?
कुठे वहात जायचं आणि कधी थांबायचं?

विषय: 

योगायोग x निवड

Submitted by Ameya Gokhale on 16 November, 2018 - 17:02

सर्वसामन्य माणसाला, अश्या काही गोष्टींचा जाज्वल्य अभिमान असतो, ज्यांची निवड तो स्वतः कधीच करत नाही. त्याउलट, ज्या घटकांची निवड तो स्वतः करतो, त्यांच्याविषयी, त्याला फारसा अभिमान राहिलेला दिसत नाही; किंवा अगदी अभिमान असलाच, तरी तो फार टेम्भा मिरवत नाही ..

खानदान, संस्कृति, जात, धर्म, राष्ट्रियत्व, वर्ण, कूळ, इतिहास यातलं काहीच आपल्या नियंत्रणात अगर निवाडीत नसतं. हा फ़क्त एक योगयोग असतो. लहान मूल जन्माला आलं, की या गोष्टी त्याला आपोआपच चिकटतात !! त्यामधे त्या लाहान मुलाला, कुठलाही पर्याय दिला गेलेला नसतो.

माणूस

Submitted by महादेव सुतार on 3 August, 2018 - 11:41

माणसातील माणुसकी आता बघायला
कमीच मिळते 
स्वतःच्या  मनाची भावना महत्वाची
दुसऱ्याची भावना कोणाला कळते 
काहींना न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळते
खरंच  माणसातील माणुसकी बघायला कमीच मिळते  गरिबांना त्रास देणारा श्रीमंतांचा खास असतो कारण तो व्यक्ति पैशासाठी माणुसकी विसरत असतो
गरीब मात्र बिचारा लाजार होऊन बसतो
नशिबी  येतं दुःख सारं 
हाक मारून उघडत नाही कोणी दारं 
स्वतःचं घर बांधताना
दुसऱ्याचं घर मोडणारी माणसं
घरात नात्यात भांडण लावणारी माणसं
का कोणाच्या आयुष्याशी खेळतात ही माणसं

विषय: 
शब्दखुणा: 

माणसे...

Submitted by आदित्य जाधव on 11 December, 2016 - 11:22

सबंध रात्रभर,आकाश
पाताळ एक करून
खऱ्या जाणिवेचा,
त्यांच्या सत्याच्या शोध
घेतात ही माणसे...

कधी ऐकलं नाही
कधी बोललं नाही
असं काहीतरी वेगळं
सांगतात ही माणसे...

तहान,भूक
त्यांना लागत नसे
तशावेळी,कुठेतरी
एकटक नजर लावून
असतात ही माणसे...

काय बरे
विचार करतात ?
दिवसभर कुठे
असतात ही माणसे...

कशी असतात...?
कशी दिसतात...?
माणसांसारखीच
वागतात
का ही माणसे...

@आदित्य अ. जाधव,उमरगा;
०९४०४४००००४,
दि,०६-१२-२०१६,पुणे;
वेळ-१२:०७मि,रा;

शब्दखुणा: 

मी, एक माणूस

Submitted by pkarandikar50 on 26 February, 2016 - 01:27

मी, एक माणूस

बहुतेकदा, जन्मदत्त नात्यांनी बंदिस्त गोतावळ्यात,
मी एक कर्तव्यदक्ष सगा-सोयरा, भाईबंद असतो,
किंवा सर्वसंमत व्यवहाराच्या रेट्याने जुळवलेला,
विश्वासू सहकारी, मित्र आणि शेजारी अचूक असतो.

मी कुठे नि केंव्हा माणूस असतो?

मी एकतर भाबडे गरजू गिर्‍हाईक,
किंवा आशाळभूत मतदार असतो.
आगा-पीछा हरवलेल्या गर्दीतला एक थेंब,
फलाटावर, मोर्चात किंवा वारीत धक्के खातो.

मी कुठे नि केंव्हा माणूस असतो?

दिवसा-उजेडी, जगात रीतसर वावरताना,
किंवा रात्री, बिछान्यात शिरल्यावर,
माझे आपले अगतिक स्खलन होतच असते.
कशाचेच मुळी सूतक मला कधी लागतच नाही.

शब्दखुणा: 

चर्निंग ऑफ द सिटी (पुस्तक परिचय)

Submitted by आतिवास on 6 July, 2014 - 07:09

तो लेखक आहे. आणि चित्रकारही. त्याचं नाव भारत. (की भरत? इंग्रजी अनुवाद वाचताना नावांची ही अशी पंचाईत होते! पण बहुधा ‘भारत’ असावं!)

ब-याच दिवसांनी तो घराबाहेर पडतो तर त्याला शहर बदललेलं दिसतं. काय आहे भवताली?

आता शहराच्या हद्दीत हसायला बंदी आहे.

‘कुणालाही मदत करू नका, कारण एकदा मदत केली की लोक तुमच्या मदतीवर अवलंबून राहतात’ असं सांगणा-या मुलांसारख्या दिसणा-या मुली आहेत; मुलीच्या वेशात नोकरीचा शोध घेणारा मुलगा आहे. खरं सांगायचं तर स्त्रिया आणि पुरुष यांच्या दिसण्यातला फरक नाहीसा झाला आहे आता.

विषय: 
शब्दखुणा: 

समाधानाचा शोध

Submitted by चैतू on 24 March, 2014 - 15:02

माणूस निघतो समाधानाच्या शोधात
सगळीकडे फिरतो, खूप खूप शोधतो
पण समाधान काही सापडत नाही
वाटेत त्याला अनेक माणसं भेटतात
त्याच्यासारखीच, पण वाट चुकलेली
सगळे एकमेकांना विचारत राहतात
पण समाधान कोणाकडेच असत नाही
समोर असतात असंख्य वाटा
कोणती वाट पकडायची कळत नाही
पकडलीही एखादी वाट तरी
पार कशी करायची उमगत नाही
त्या वाटेवरसुद्धा असतात अनेक वाटाडे
वाट दाखवण्याचं आश्वासन देत
आधी पोहचवलेल्या माणसांच्या
कहाण्या सांगत आणि फुशारक्या मारत
माणसे त्यांच्यावर विश्वास ठेवतात
पण माणसांचा शिधा हडप करुन
वाटाडे गडप होतात आणि
माणसे मात्र फिरत राहतात
पुन्हा त्याच अनोळखी वाटांवर

Subscribe to RSS - माणूस